Join us   

सोनम कपूर गरोदरपणातही करतेय स्ट्रेचिंग, गरोदरपणात स्ट्रेचिंग करण्याचे काय फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 4:17 PM

सोनम कपूरचा (Sonam kapoor doing stretching) स्ट्रेचिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गरोदरपणात कोणते व्यायाम (exercises during pregnancy) करावेत, स्ट्रेचिंग करण्याचे (doing stretching during pregnancy) फायदे काय? स्ट्रेचिंग करताना ( tips for stretching during pregnancy ) काय काळजी घ्यायला हवी अशा मुद्यांवर चर्चा सुरु आहे. त्याबाबत गरोदर स्त्रियांना माहिती असणं आवश्यक आहे.

ठळक मुद्दे गरोदरपणात स्ट्रेचिंग करणं हे आई आणि बाळ या दोघांसाठी उपयुक्त असतं.गरोदरपणात स्ट्रेचिंग करण्याचे फायदे असले तरी स्ट्रेचिंग करताना काळजी घेणंही आवश्यक आहे.स्ट्रेचिंगसोबतच चालणे, कीगल एक्सरसाइज या व्यायाम प्रकारांचाही गरोदरपणात फायदा होतो. 

अभिनेत्री सोनम कपूर (Pregnant Sonam Kapoor)  गरोदर आहे. गरोदरपणात तिने नवऱ्यासोबत केलेल्या फोटोशूटला चाहत्यांची दाद मिळते आहे. तशीच दाद तिच्या एका पोस्टला मिळत आहे. सोनम कपूर स्ट्रेचिंग (Sonam Kapoor doing  stretching ) करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोनम कपूरच्या ट्रेनरनं आधी पोस्ट केला होता जो सोनम कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन पुन्हा पोस्ट केला आहे.  सोनम कपूर गरोदरपणात रोज न चुकता व्यायाम करते आणि घरगुती जेवण करण्यालाच महत्व देते असं तिनं तिच्या एका पोस्टमधून सांगितलं आहे. सोनम कपूरचा स्ट्रेचिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गरोदरपणात कोणते व्यायाम (exercises during pregnancy)  करावेत, स्ट्रेचिंग करण्याचे फायदे (benefits of stretching during pregnancy)  काय? स्ट्रेचिंग करताना काय काळजी (tips for stretching during pregnancy) घ्यायला हवी अशा मुद्यांवर चर्चा सुरु आहे. 

गरोदरपणात स्ट्रेचिंग का करावं?

गरोदरपणात स्ट्रेचिंग करणं हे आई आणि बाळ या दोघांसाठी उपयुक्त असतं. गरोदर आईनं स्ट्रेचिंग केल्यास स्नायुंना आराम मिळतो. पोटातील बाळाचा भार उचलण्यासाठी शरीरात लवचिकता येते. गरोदरपणात गर्भ आईच्या शरीरातून कॅल्शियम आणि पोषण मुल्यं घेतो त्याचा परिणाम म्हणजे गरोदर स्त्रीचे हाडं दुखतात, स्नायुंवर ताण येतो. अशा परिस्थितीत स्ट्रेचिंग केल्यास या समस्या दूर होतात. पण कोणत्याही गरोदर महिलेने व्यायाम असू देत किंवा खानपान याबाबत इतरांची काॅपी न करता याबाबत डाॅक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

गरोदरपणात स्ट्रेचिंग करताना..

एकूणच गरोदरपणात शरीराच्या हालचाली करताना काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात स्ट्रेचिंग करण्याचे फायदे असले तरी स्ट्रेचिंग करताना काळजी घेणंही आवश्यक आहे. 

1. गरोदरपणात स्ट्रेचिंग करताना शरीर जर तयार नसेल तर जबरदस्तीनं स्ट्रेचिंग करु नये. 

2. एखाद्या दिवशी थकवा वाटत असल्यास, वेदना होत असल्यास त्या दिवशी स्ट्रेचिंग करणं टाळून दुसऱ्या दिवशी स्ट्रेचिंग करावं. 

3. स्ट्रेचिंग करताना एका वेळेस एकाच प्रकारचे स्ट्रेचिंग करावे. एका वेळेस स्ट्रेचिंगचे अनेक प्रकार करणं टाळावं.

4. स्ट्रेचिंग पोजिशन ही एका मिनिटापेक्षा जास्त काळ होल्ड करुन ठेवू नये. स्ट्रेचिंग पोजिशन ही काही सेकंदात सोडून सामान्य स्थितीत यावं. 

5. स्ट्रेचिंग करताना थेट स्ट्रेचिंगला सुरुवात न करता आधी वाॅर्म अप करावं. 

Image: Google

चालण्याचाही होतो फायदा

गरोदरपणा स्ट्रेचिंग प्रमाणेच चालण्याचा व्यायाम केल्यानेही फायदा होतो. गरोदरपणात जास्तीत जास्त काळ पायी चालल्यास गर्भाला गर्भाशयाच्या खालच्या भागात जायला मदत मिळते. सामान्य प्रसूतीसाठी गरोदरपणात चालण्याचा व्यायाम महत्वाचा मानला जातो. 

Image: Google

कीगल एक्सरसाइज केल्यास..

डक वाॅक, कीगल एक्सरसाइज या व्यायामामुळे सामान्य प्रसूती होण्यास मदत मिळते. कीगल एक्सरसाइजमुळे पेल्विक फ्लोर स्नायू सक्रीय होतात, मजबूत होतात. सामान्य प्रसूतीसाठी कीगल एक्सरसाइजची मदत होते. पेल्विक स्नायू हे मजबुत करण्यासाठी डक वाॅक या व्यायाम प्रकाराची मदत होते. 

 

टॅग्स : प्रेग्नंसीफिटनेस टिप्सव्यायामसोनम कपूर