Lokmat Sakhi >Health >Pregnancy > ३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

Sonam Kapoor's Interview About Her Pregnancy: तिशी- पस्तिशीच्या वयात बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हालाही तेच ऐकावं लागू शकतं, जे सोनम कपूरला ऐकावं लागलं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 08:10 AM2022-08-25T08:10:10+5:302022-08-25T08:15:02+5:30

Sonam Kapoor's Interview About Her Pregnancy: तिशी- पस्तिशीच्या वयात बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हालाही तेच ऐकावं लागू शकतं, जे सोनम कपूरला ऐकावं लागलं.

Sonam Kapoor shared her experience about suffering from COVID and her age issue during pregnancy | ३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

Highlights करिअर किंवा अन्य काही कारणांमुळे आता बऱ्याच जणींकडून ही वयोमर्यादा ओलांडली जात आहे. याबाबत नेमका सोनमचा अनुभव काय, हे तिने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

अभिनेता अनिल कपूरची लेक अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा या जोडप्याला नुकताच मुलगा झाला. काही महिन्यांपुर्वी सोनमने तिचे प्रेग्नन्सी फोटो शूट सोशल मिडियावर शेअर केले आणि तेव्हापासून तिच्या गरोदरपणाविषयी चर्चा सुरू झाली. या चर्चेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो सोनमचं वय. वयाच्या ३७ व्या वर्षी सोनम आई (Sonam at the age of 37) झाली. तिशीच्या आत पहिलं मुल होऊ द्यावं, अशा विचारसरणीच्या भारतीयांना तिचं वय खटकणारच होतं. तिशीच्या आत पहिलं बाळ होणं हे आई आणि बाळ या दोघांच्याही तब्येतीच्या दृष्टीने योग्यच आहे. पण करिअर किंवा अन्य काही कारणांमुळे आता बऱ्याच जणींकडून ही वयोमर्यादा ओलांडली (late pregnancy) जात आहे. याबाबत नेमका सोनमचा अनुभव काय, हे तिने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. (Sonam Kapoor shared her experience about late pregnancy)

 

Vogue India यांना दिलेल्या मुलाखतीत सोनम सांगते की, प्रेग्नन्सी राहण्यासाठी सोनमला काही काळ हार्मोनल ट्रिटमेंट घ्यावी लागली होती. प्रेग्नंट असल्याचं जेव्हा समजलं तेव्हा नवरा आनंद याला कोविड झालेला होता. त्यावेळी लंडन शहरात कोविड  खूपच जास्त वाढला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सोनमलाही कोविड झाला. त्यामुळे ती खरोखरंच घाबरली होती.  आणि डॉक्टरांकडून तसेच गुगलवरूनही गरोदरपणात कोविड झालाच तर काय होऊ शकतं, याची जमेल तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तो सगळा काळच आपल्यासाठी अतिशय कठीण होता, असं ती म्हणते.

 

यानंतर तिच्या गरोदरपणाची बातमी जेव्हा मित्रमंडळींना आणि नातलगांना समजली तेव्हा सोनमचं वय हा त्यांच्यासाठी मोठाच चर्चेचा आणि चिंतेचा विषय होऊन बसला. त्यांची काळजी साहजिक होती, पण त्यामुळे सोनमला दररोजच उठता- बसता सारखेच सल्ले आणि सूचना ऐकाव्या लागल्या. शेवटी तिने सगळ्यांना सांगून टाकलं की वय वाढलं असलं तरी मी अजूनही तरुणच आहे, कारण माझ्यामध्ये माझ्या वडिलांचे जीन्स आहेत... सोनमसारखा अनुभव तिशीनंतर आई होणाऱ्या अनेकींना येतोच. आपल्या जवळच्या नातलगांना आपली काळजी वाटणं साहजिक आहे. पण सारख्या चिंतेमुळे समोरच्या गरोदर बाईला नेमकं काय वाटत असेल, याचाही विचार त्यांनी करावाच.. नाही का?


 

Web Title: Sonam Kapoor shared her experience about suffering from COVID and her age issue during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.