Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की.....

प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की.....

Vaginal health tips : योनी हा महिलांच्या शरीरातील खूप नाजूक अवयव आहे. डिलिव्हरीदरम्यान महिलांची योनी पूर्णपणे खेचली जाते. कारण योनी मार्गातूनच बाळाला बाहेर काढलं जातं. यामुळे योनी कोरडी पडण्याची शक्यता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 04:01 PM2021-06-12T16:01:42+5:302021-06-12T16:20:56+5:30

Vaginal health tips : योनी हा महिलांच्या शरीरातील खूप नाजूक अवयव आहे. डिलिव्हरीदरम्यान महिलांची योनी पूर्णपणे खेचली जाते. कारण योनी मार्गातूनच बाळाला बाहेर काढलं जातं. यामुळे योनी कोरडी पडण्याची शक्यता असते.

Vaginal health tips : Changes in vagina after pregnancy and delivery | प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की.....

प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की.....

Highlightsगर्भधारणा आणि प्रसुतिनंतर योनी बर्‍याचदा कोरडी राहते. खरं तर, बाळंतपणानंतर, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनची कमतरता उद्भवते. प्रसुतीनंतरही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुम्हाला बराच काळ त्रास होत असेल तर एकदा नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गर्भावस्था आणि प्रसुती महिलांच्या आयुष्यातील एक असा क्षण असतो. ज्यावेळी महिला खूप जास्त आनंदी असतात. हा महिलांच्या आयुष्यातील खूप खास क्षण असतो. पण आनंदासह त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर शरीरामध्ये बदल दिसून येतात. बाळ जन्माला आल्यानंतर नाजूक भागांची लांबी वाढते. मासिना रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर भाविनी शाह बाळकृष्ण यांनी सांगितले की,  योनी हा महिलांच्या शरीरातील खूप नाजूक अवयव आहे. डिलिव्हरीदरम्यान महिलांची योनी पूर्णपणे खेचली जाते. कारण योनी मार्गातूनच बाळाला बाहेर काढलं जातं. यामुळे योनी कोरडी पडण्याची शक्यता असते.

काही काळानंतर लूज पडलेली ही त्वचा पुन्हा पूर्वरत होऊ लागते. काहीवेळा प्रसव प्रक्रियेदरम्यान योनी आणि किडनीच्या मधिल त्वचेवर एपीसीओटोमी (Episiotomy)  केली जाते. यामुळे प्रसव प्रक्रियेनंतर शारीरिक संबंध ठेवल्यास पेरिनियल पेन (Perineal Pain)  जाणवत नाही. मॅक्स सुपर स्पेशियलिटी रुग्णालयातील स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर चैताली त्रिवेदी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

योनी लूज पडणं

प्रसूती दरम्यान स्त्रियांच्या योनीमध्ये सर्वात सामान्य बदल म्हणजे त्यांची योनी सैल आणि रुंद होते. वास्तविक, मुलाला योनीतूनच आईच्या शरीरातून बाहेर काढले जाते. ज्यामुळे योनी रुंद होते आणि त्याचे आकार वाढतो. डॉ. चैताली त्रिवेदी स्पष्ट करतात की आधुनिक कॉस्मेटिक उपचार आणि कार्यपद्धतीमुळे योनी व्यवस्थित केली जाऊ शकते. 

योनी कोरडी पडणं

गर्भधारणा आणि प्रसुतिनंतर योनी बर्‍याचदा कोरडी राहते. खरं तर, बाळंतपणानंतर, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनची कमतरता उद्भवते. ज्यामुळे योनीमध्ये कोरडेपणा  येतो. या दरम्यान, कधीकधी योनीमध्ये वेदना होते. आपल्याला पुन्हा आपल्या योनीला मॉइश्चराईज करायचे असल्यास आपण यासाठी आपल्या स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधू शकता.

शारीरिक संबंधादरम्यान वेदना होणं

प्रसूतीनंतर स्त्रियांच्या योनीत कोरडेपणा येतो. ज्यामुळे नंतर शारीरिक संबंध ठेवताना त्यांना खूप वेदना जाणवतात. अशा परिस्थितीत आपल्या योनीमध्ये ओलावा येणे खूप महत्वाचे आहे. प्रसुतीनंतरही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुम्हाला बराच काळ त्रास होत असेल तर एकदा नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

योनीत सूज येणं

योनीतील दुखण्याबरोबरच सूज येण्यासारख्या समस्याही यात दिसू शकतात. प्रसुतीनंतर योनीभोवती सूज येऊ शकते. ही सूज 4-6 महिने टिकू शकते. त्यानंतर हळूहळू ती बरी होऊ लागते. यामुळे आपल्यासाठी वेदना देखील होऊ शकतात. तीव्र वेदना झाल्यास आपण डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

मुत्रावर नियंत्रण नसणं

गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान, स्त्रियांचे पेल्विक फ्लोर स्नायू देखील कमकुवत होतात. यामुळे, मूत्रमार्गातील असंयमची स्थिती स्त्रियांमध्ये दिसून येते. मूत्रमार्गातील असंयम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे मूत्रावर नियंत्रण नसते. प्रसुतीनंतर ही स्थिती महिलांमध्ये बर्‍याचदा दिसून येते. त्याचे स्नायू बळकट करण्यासाठी तुम्ही नियमितपणे योगासने करावी.

नाजूक भागांवर व्रण

मुलाला जन्म दिल्यानंतर बहुतेकदा स्त्रियांच्या नाजूक भागांवर म्हणजेच योनीच्या आजूबाजूला चट्टे येतात. हे फार त्रासदायक आहे. नाजूक भागांवरील हे डाग हळूहळू कमी होतात. पण जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योनीतून स्राव होणं

महिलांमध्ये योनीतून स्त्राव होणे हा एक सामान्य बदल आहे. हे बहुतेक स्त्रियांमध्ये पाहिले जाते. डॉ. चैताली त्रिवेदी म्हणतात की सुरुवातीला ते लाल रंगाचे असते आणि काही आठवड्यात ते रंगहीन होते. म्हणून आपल्याला घाबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची काही गरज नाही. प्रसुतीनंतर महिलांच्या योनीमध्ये हे बदल होणे खूप सामान्य आहे. परंतु दीर्घकाळापर्यंत आपल्याला वरील गोष्टीबाबत बदल दिसल्यास नक्कीच एकदा आपल्या स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधा

Web Title: Vaginal health tips : Changes in vagina after pregnancy and delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.