Lokmat Sakhi >Health >Pregnancy > Vaginal Laxity : व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके

Vaginal Laxity : व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके

व्हजायनल लूजनेस किंवा योनीत सैलसरपणा यासाठी जाहिरातींना भुलून गैरसमजातून कुठलेही उपचार करुन घेणं धोक्याचं, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, या त्रासाची खरी कारणं आणि उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:33 PM2022-07-19T15:33:52+5:302022-07-19T16:17:31+5:30

व्हजायनल लूजनेस किंवा योनीत सैलसरपणा यासाठी जाहिरातींना भुलून गैरसमजातून कुठलेही उपचार करुन घेणं धोक्याचं, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, या त्रासाची खरी कारणं आणि उपचार

Vaginal Laxity : loose vagina, myths and facts, symptoms and tretment | Vaginal Laxity : व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके

Vaginal Laxity : व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके

व्हजायनल लूजनेस(Loose Vagina) किंवा योनीत सैलसरपणा येणं ही समस्या आजकाल अनेक महिलांना सतावते. त्यात उलटसुलट माहिती वाचली जाते आणि मनावरचा ताण वाढतो. शरीरसुख घेण्यादेण्यात त्यातून आपण कमी पडतो का असाही समज-गैरसमज अनेकींच्या (आणि अनेकांच्याही) डोक्यात असतो. त्यामुळे योनीतली सैलसरपणा किंवा व्हजायनल लूजनेस याविषयी योग्य शास्त्रीय माहिती उपचार करुन घ्यायला हवी. मुळात हे कशानं होते आणि ते टाळण्यासाठी काय उपाय करायला हवेत यासंदर्भात ‘लोकमत सखी’ने स्त्री आणि प्रसुतीरोगतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांच्याशी संवाद साधला. (Vaginal Laxity  refers to a looseness of the vagina)

डॉ. गौरी करंदीकर सांगतात, ''व्हजायना बाहेरच्या ओपनिंगपासून साधारण गर्भपिशवीच्या मुखापर्यंत असते. ज्याला आपण योनीमार्ग म्हणतो. व्हजायनात एक प्रकारचे स्नायू असतात. ज्यात साडीच्या निऱ्यांप्रमाणे प्लेट्स असतात. पुढचा भाग कमी एक्सपांड होणारा असतो तर मागचा भाग जास्त वाढणारा असतो. निसर्गानुसार डिलिव्हरीदरम्यान बाळ बाहेर येण्यासाठी अशी फ्लेक्झिबल रचना असते. याला कव्हर करणाऱ्या भागाला म्युकस मेंबरेन म्हणतात. व्हजायनल ओपनिंगला लहान लहान ग्रंथी असतात त्याचबरोबर काही सिक्रिशन्स म्यूकस मेंबरेनमधून येतात ज्यामुळे योनीत ओलावा मेंटेन राहतो. (Loose vagina: Myths and facts) योनीमार्गातील म्यूकस मेंबरेनचे स्वास्थ्य, स्नायूंची टोन आणि स्ट्रेथ, तिथले रक्तप्रवाह, स्त्रीचे वय, हॉर्मोनल स्वास्थ्य हे व्हजानल टोन ठरवते. 

योनीत सैलसरपणा येण्याची कॉमन कारणं कोणती?

१.  हा आजार नसून शरीर रचनेतील बदल आहे. जन्मापासून वाढत्या वयानुसार योनीच्या आकारात थोडाफार बदल होतो. सेक्शुअल फंक्शनसाठी आणि डिलिव्हरीच्या वेळेस योनीमार्गाचे स्ट्रेचिंग होते. बाळाचं डोक बाहेर येण्यासाठी योनीमार्ग साडे नऊ ते दहा सेमीपर्यंत स्ट्रेच होतो. ही स्ट्रेचिंग क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये असते. डिलिव्हरी अवघड झाली, डिलिव्हरीला वेळ लागला तर स्नायूंवर दाब जास्त येऊन योनीमार्ग जास्त स्ट्रेच होतो त्यामुळे ओव्हर व्हजायनल लूजनेस येऊ शकतो. 

२. याशिवाय जसजसं वय वाढतं आणि मेनोपॉझ येऊ लागतो तसं हॉर्मोन्स (इस्ट्रोजन) कमी होतात. परिणामी नॅचरल हार्मोन्सचा इफेक्ट कमी होऊन ड्रायनेस येतो. वय आणि हार्मोन्समुळे स्नायू सैल होतात आणि मासिक पाळी पूर्णपणे थांबल्यानंतर इंटरनल मसल्स पॉवर कमी झाल्यानं व्हजायनल लूजनेस येऊ शकतो त्यालाच वैद्यकीय परिभाषेत vaginal laxity म्हणतात. 

३. या स्थितीत अनेक महिलांना वारंवार जोरात शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर, वजन उचल्यानंतर लघवी होवून जाते. त्याला urinary incontinence म्हणतात. लॅक्सिटीबरोबर ही वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते. कारण पिरिएड्सची जागा आणि लघवीची जागा याचे टिश्यू एकमेकांना जोडले असल्यामुळे असा त्रास जाणवतो.

व्हजायनल लूजनेसवर उपाय काय? (How can I tighten my loose vagina)

१. 'सगळ्यात आधी लूजनेस ही गोष्ट मनात आहे की वास्तवात आहे, हे लक्षात यायला हवं. माईल्ड, मोडरेट आणि सिव्हिअर अशा तीन स्ट्रेजमध्ये व्हजायनल लूजनेस मोडतो. अनेकदा सेक्शुअल प्लेजर मिळालं नाही किंवा समोरच्या पार्टनरला प्लेजर मिळालं नाही तर बायकांच्या मनात टाईटनेस वाटत नसल्याचं येतं. माईल्ड vaginal laxity असल्यास योगा, पेल्विक व्यायाम करूनही स्नायू बळकट करता येतात. या व्यायामामुळे त्या ठिकाणचा रक्त प्रवाह सुरळीत होतो. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पेल्विक व्यायाम करायला हवेत. यामुळे मसल्स स्ट्रेंथ वाढेल आणि रक्तप्रवाहही व्यवस्थित होईल.

२. सेक्शुअली ॲक्टिव्ह झाल्यापासून रोजच व्यायाम करायला हवेत. पोस्ट डिलिव्हरी पहिल्या दोन ती महिन्यात महिलांना हलूसुद्धा दिलं जात नाही. पण जर त्याचवेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं योगा, व्यायाम प्रकार सुरू केले तर मसल्स चांगले राहण्यास मदत होईल.

३. चाळीशी नंतर नियमित व्यायाम करायला हवेत अन्यथा साठीनंतर शरीरातील स्ट्रेंथ अधिकच कमी होऊ लागते. नॅच्युरल हॉर्मोन्स वाढवणारे पदार्थ अंडी, मासे, सोयाबीन, जवस आहारात असायला हवेत. माईल्ड केसेसमध्ये तुम्ही या उपायांची मदत घेऊ शकता.

४. मॉडरेट ते सिव्हीअर Vaginal laxity असल्यास फक्त डाएट आणि व्यायाम करून चालत नाही. त्यासाठी मेडिकल ट्रिटमेंट आहेत. जेल्स, पीआरपी, हार्मोन्स ट्रिटमेंट केल्या जातात. आजकाल लेजर ट्रिटमेंटद्वारे मसल्स स्ट्रेंथ, रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. 

५. व्हजायनल लेजर ट्रिटमेंट्स करताना स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा.  जाहीरातींच्या मोहाला बळी पडून चुकीच्या पद्धतीनं ट्रिटमेंट केल्यास तुमच्या युरीनरी सिस्टीमला धोका पोहोचू शकतो. 

६. सिव्हीअर स्टेजेससाठी सर्जरी करावी लागते. त्याला व्हजायनल टाईटनिंग प्रोसिजर असं म्हणतात. यावेळी डॉक्टरांकडून लॅक्सिटी कोणत्या सेंगमेटमध्ये आहे युरीनरी सिस्टिमध्ये काही त्रास आहे का, लॅक्सिटी कोणत्या कारणांमुळे उद्भवलीये हे पाहून सर्जरी प्रक्रिया ठरवली जाते.

७. स्वत:च्या मनानं, जाहिरातींना भुलून, डॉक्टरांचा सल्ला न घेता कुठलेही उपचार करु नयेत.

Web Title: Vaginal Laxity : loose vagina, myths and facts, symptoms and tretment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.