पिरेड्स लांबले ? सारखं मळमळतंय ? गरोदर बाईला जे जे काही होतं.. ती सगळी लक्षणं दिसू लागली की आपसूकच कोणत्याही महिलेला आपण गरोदर आहोत की काय असा प्रश्न पडू लागतो. पण ही लक्षणं दिसणं म्हणजे आपण गरोदरच आहोत, असं समजणं अनेकदा चुकीचही ठरू शकतं. यालाच False pregnancy असं म्हटलं जातं. आपण प्रेग्नंट नसून आपली लक्षणं False pregnancy ची आहेत, हे समजल्यावर अनेकींना प्रचंड मानसिक धक्काही बसतो.
थोडक्यात सांगायचं म्हणजे गरोदर नसतानाही बाईला आपण गरोदरच आहोत, अशी सगळी शारीरिक लक्षणं जाणवायला लागणं म्हणजे False pregnancy. यामध्ये पाळी तर लांबली जातेच पण अनेक जणींना गरोदरपणाच्या सुरूवातीला जाणवतो तसा मॉर्निंग सिकनेसदेखील जाणवू लागतो. मळमळ होऊन उलट्याही होतात. गरगरायला लागतं, काही जणींच्या पोटाचा आकारही वाढतो तर काही जणींना चक्क बाळाची पोटात हालचाल होत आहे, असे वाटू लागते. गरोदरपणाच्या सुरूवातीच्या एक- दोन महिन्यात काही जणींचे स्तन दुखरे होऊन जातात. अगदी तसं देखील अनेकींना होऊ लागते. म्हणूनच तर खरीखुरी प्रेग्नन्सी आणि False pregnancy यातील फरक ओळखणं कधी कधी कठीण होऊन बसतं.
False pregnancy ची लक्षणं मासिक पाळी लांबणे पोट मोठे दिसणे स्तनांचा आकार वाढणे आणि ते दुखणे स्तनाग्रांचा आकार बदलणे गर्भाची हालचाल होत आहे, असे जाणवणे नॉशिया आणि उलट्या होणे वजन वाढणे मॉर्निंग सिकनेस भूक न लागणे
False pregnancy ची कारणे False pregnancy चा त्रास अनेक जणींना का होतो, याबाबत अजूनही संशोधनं सुरू आहेत. पण मानसिक अवस्था हे याचे कारण असावे, असा बहुतांश डॉक्टरांचा कयास आहे. डॉक्टरांनी खालील कारणांमुळे महिलांना False pregnancy चा त्रास होऊ शकतो, असे सांगितले आहे.
१. ज्या महिलांना बाळ हवे आहे, पण खूप प्रयत्न करूनही गर्भ राहत नाही, अशा महिलांना False pregnancy चा त्रास जाणवतो. २. ज्या महिलांचे नुकतेच ॲबोर्शन झाले आहे, अशा महिलांनाही False pregnancy जाणवू शकते. ३. गरोदर असणे ही प्रत्येकीसाठीच प्रत्येकवेळी आनंददायी बाब असू शकत नाही. ज्या महिलांना प्रेगन्सी नको आहे, ज्यांनी प्रेग्नन्सीचा धसका घेतला आहे, अशा महिलाही या त्रासातून जातात.