प्रसूती हा आता बराच खर्चिक विषय झाला आहे. त्यात सिझेरियन होऊन प्रसूती होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. यामुळे साहजिकच खर्चात वाढ झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये तर सिझेरियन बाळंतपणाचे दवाखान्याचे बिल सहज ५० हजाराचा टप्पा पार पाडते. त्यामुळे जोडप्यांवर बऱ्याच प्रमाणात आर्थिक ताण येतो. हा ताण कमी करायचा असेल तर मातृत्व विमा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या विम्यामध्ये प्रसूतीच्या काळातील संबंधित सर्व खर्च कव्हर केले जातात. त्यामुळे आर्थिक ताण न येता मातृत्वाचा आनंद घेता येतो.
मातृत्व विम्यामुळे कोणते लाभ मिळतात?
१. प्रसूतीपुर्व, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळातले खर्च यामध्ये कव्हर होतात.
५० वर्षांची असुनही भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर तिशीचा ग्लो! कारण साबण, फेसवॉशऐवजी वापरते 'हा' फेसपॅक
२. या पॉलिसीमध्ये प्रसूतीच्या काळात करावयाचे लसीकरण, इन्फर्टिलिटी बाबतचे उपचार यांचाही खर्च दिला जातो.
३. काही कंपन्यांच्या मातृत्व विमा अंतर्गत सरोगसी तसेच आयव्हीएफ उपचारांचा खर्चही दिला जातो.
योग्य मातृत्व विमा कसा निवडावा?
१. कोणत्याही कंपनीकडून मातृत्व विमा घेत असाल तरी सगळ्यात आधी पॉलिसीमध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केल्या आहेत, ते तपासून घ्यावे. ब्लड टेस्ट, अल्ट्रासाउंड टेस्ट आदी चाचण्यांचा समावेश त्यात असावा.
२. प्रसूतीपूर्व लसीकरण, नवजात शिशुचे लसीकरण याचाही त्यात समावेश असावा.
बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण ....
३. नवजात शिशुचे आजार आणि उपचार य बाबी पहिल्या दिवसापासून कव्हर होतील हे पाहावे.
४. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खोली भाडे, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, इतर सहरोगांवरील उपचार या गोष्टीही त्यात आहेत, याची खात्री करून घ्यावी.
५. पॉलिसीचा प्रतिक्षा कालावधी किती आहे हे पाहून घ्या. हा कालावधी २ ते ६ वर्षांच्या दरम्यान असावा.