Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळाला दूधच पुरत नाही, पोट भरत नाही, तर स्तनदा मातेनं काय करावं?

बाळाला दूधच पुरत नाही, पोट भरत नाही, तर स्तनदा मातेनं काय करावं?

बाळाच्या पोषणाच्या बाबत आईच्या दुधाची कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असतं. आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्याचे घरगुती उपायही आहेत, ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईलासुध्दा होतो. काय आहेत हे उपाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 01:42 PM2021-07-10T13:42:58+5:302021-07-10T13:53:28+5:30

बाळाच्या पोषणाच्या बाबत आईच्या दुधाची कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असतं. आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्याचे घरगुती उपायही आहेत, ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईलासुध्दा होतो. काय आहेत हे उपाय?

What should a breastfeeding mother do if her baby is not getting enough milk and is not filling her stomach? | बाळाला दूधच पुरत नाही, पोट भरत नाही, तर स्तनदा मातेनं काय करावं?

बाळाला दूधच पुरत नाही, पोट भरत नाही, तर स्तनदा मातेनं काय करावं?

Highlights दूध वाढवण्यासाठी ओटस आणि केळाची स्मूदी ठरते फायदेशीर. जिरे, शतावरी यांचं चूर्ण आणि दूध घेतल्यानं दूध वाढतं . दूध कमी येत असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यासोबत एक लसणाची पाकळी खावी.

 

बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्यांदाच आई झालेल्या स्त्रियांना स्तनपानाबद्दल खूप चिंता वाटते. अर्थात गरोदर असताना घरातील आई, सासू आणि इतर जेष्ठ महिलांनी स्तनपानाबद्दल सांगितलेलं असतं. तसेच हल्ली महिला गुगल करुन बरीच माहिती मिळवत असतात. पण तरीही प्रत्यक्ष अनुभव घेणं ही वेगळी गोष्ट असते. त्यात जर ते पहिलं बाळांतपण असेल तर आनंद, भीती, चिंता, ताण अशा सर्व गोष्टींची सरमिसळ होते.

बाळासाठी आईच्या दुधाचं महत्त्वं किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण बाळाचं पोट भरेल इतकं दूध आईला येतंय का मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण पहिल्यांदा आई होणार्‍या महिलांना दूध कमी येण्याची समस्या असते. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेन्शन’च्या आकडेवारीनुसार 75 महिला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यातच बाळाला स्तनपान करणं सोडतात. कारण एकच दूध कमी येतं. आईला दूध कमी येत असेल तर बाळाचं पोट भरत नाही, त्यामुळे ते शांत राहू शकत नाही आणि त्याच्या पोषणावरही परिणाम होतो. आणि बाळाचं पोट भरत नाही हे बघून आईही अस्वस्थ होते. बाळाच्या पोषणाच्या बाबत आईच्या दुधाची कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असतं. आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्याचे घरगुती उपायही आहेत, ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईलासुध्दा होतो. हे उपाय म्हणजे ओटस आणि केळ यांची स्मूदी , जिरे आणि शतावरी चूर्ण आणि दूध तसेच इतर घरगुती उपाय.. यामुळे आईचं दूध झटपट वाढतं आणि बाळाचं नीट पोषण होतं.

दूध वाढवणारी स्मूदी

 

ही स्मूदी तयार करण्यासाठी एक पिकलेलं आणि फ्रिजरमधे ठेवून फ्रोजन केलेल एक केळ, पाव कप ओटस, दिड चमचा पीनट बटर, एक चमचा जवस, दिड चमचा कोकोआ पावडर, पाऊण कप दूध आणि दिड कप बर्फाचे तुकडे या सामग्रीची गरज असते.
ब्लेण्डरमधे ओटस आणि जव्स टाकून ते ब्लेण्ड करुन घ्यावं. मग उर्वरित सर्व साहित्य टाकून चांगलं ब्लेण्ड करावं. नंतर त्यात बर्फ घालून पुन्हा ब्लेण्ड केलं की ओटस आणि केळाची स्मूदी तयार होते.

स्मूदीमधील पोषक तत्त्वं

100 ग्रॅम स्मूदीमधे 88 उष्मांक, 3 ग्रॅम प्रथिनं, चार ग्रॅम चांगले फॅटस, 0.7 ग्रॅम संपृक्तता, 10 ग्रॅम कबरेदकं, 4 ग्राम साखर, 2.3 ग्रॅम तंतूमय घटक आणि 49 मिलीग्रॅम सोडियम असतं.

स्मूदीमधील केळाचं महत्त्व

 

* केळामधे मोठ्या प्रमाणात ऊर्ज असते. या ऊर्जेची आई झालेल्या स्त्रीला खूप गरज असते. प्रसूतीनंतर आणि बाळाची काळजी घेताना येणारा थकवा दूर करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा केळामधून मिळते.

* केळामधे पोटॅशियमही भरपूर असतं. शरीरातील इलेक्टोलाइट आणि द्रव यांच्यात संतुलन ठेवतं. केळामुळे रक्तदाबही नियंत्रित राहातो.
केळामधे मोठ्या प्रमाणात तंतूमय घटक असतात. त्याचा उपयोग पोट साफ होण्यासाठी होतो. तसेच केळामधे प्रोबायोटिक असतात जे आतड्यातील चांगल्या जिवाणुंची वाढ करतात. यामुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात.

* केळामधे ब6 जीवनसत्त्व असतं. केळ पोटात गेल्यानं ब 6 या जीवनसत्त्वाची 25 टक्के गरज पूर्ण होते. हे जीवनसत्त्व शरीरात प्रतिपिंड अर्थात अँण्टिबॉडीज तयर करण्यास मदत करतात. त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आईचं संरक्षण होतं, दूध वाढतं आणि बाळही सुरक्षित राहातं. ब6 हे जीवनसत्त्व रक्तातील हिमोग्लोबीन वाढवतं. हीमोग्लोबिनमधील प्रथिनं सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात.

* केळात ट्रिप्टोफेन नावाचं अमीनो अँसिड असतं. हे अँसिड सेरोटोनिन हार्मोन तयार होण्यासाठी महत्त्वाचं असतं. सेरोटोनिनमुळे आईचा मूड चांगला राहातो. आईला झोप चांगली लागते. त्यामुळे आई आनंदी राहाते आणि आई आनंदी असली की बाळही आनंदी राहातं.
बाळांतपणानंतर बाळाची काळजी घेणं आणि शरीरात होणारे बदल, संप्रेरकात होणारे बदल यामुळे आईला डिप्रेशन येण्याचा धोका असतो तो या स्मूदीमुळे कमी होतो.

जिरे -शतावरणी चूर्ण आणि दूध

 

हे दूध तयार करण्यासाठी आधी कढईत किंवा तव्यावर सहा चमचे जिरे मंद आचेवर भाजावेत. ते थोडे भाजले गेले की एका ताटात काढावेत. ते थंड झाले की मिक्सरमधून त्याची बारीक पूड तयार करावी. एका भांड्यात अर्धा चमचा जीरे पावडर घ्यावी आणि त्यात अर्धा चमचा शतावरी पावडर टाकावी. या दोन्ही पूड चांगल्या एकत्र कराव्यात. आणि रोज सकाळी उठल्यावर ही पूड खावी आणि त्यावर एक ग्लास दूध घ्यावं. संध्याकाळी किंवा रात्रीही हे चूर्ण आणि दूध घेतलं तरी चालतं. हा उपाय सलग सात दिवस करावा.

 

इतर उपाय

*  प्रसूतीनंतर पाच सहा दिवसांनी सुकामेवा आणि गुळ यासोबत जिर्‍याची पंजीरी बनवून खावी.
*  गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर कमीत कमी तीन चार महिने रोज दूध प्यायला हवं.
*  दूध कमी येत असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यासोबत एक लसणाची पाकळी खावी. लसूण खाल्ल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी थोडे बदाम खावेत.
*  तीळ आणि बडिशोप भाजून त्याची पूड करावी. आणि ही पूड रोज पाण्यासोबत घ्यावी. ही पूड भाजी करतानाही टाकू शकतो.

Web Title: What should a breastfeeding mother do if her baby is not getting enough milk and is not filling her stomach?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.