Lokmat Sakhi >Health >Pregnancy > ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी...

ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी...

Is it safe to pump breast milk while breastfeeding : Is It OK to Just Pump and Not Breastfeed : ब्रेस्ट मिल्क पंपिंग करावे की करु नये याबद्दल अधिक माहिती घेऊयात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 03:24 PM2024-07-24T15:24:16+5:302024-07-24T15:50:51+5:30

Is it safe to pump breast milk while breastfeeding : Is It OK to Just Pump and Not Breastfeed : ब्रेस्ट मिल्क पंपिंग करावे की करु नये याबद्दल अधिक माहिती घेऊयात....

What’s Best for You? Exclusively Breastfeeding or Pumping? Is It OK to Just Pump and Not Breastfeed? | ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी...

ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी...

सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे, अनेक स्त्रियांना आपल्या बाळांना पुरेसा वेळ देणे काहीवेळा शक्य होत नाही. यातही जर बाळ आईच्या अंगावर स्तनपान करत असेल तर कामाच्या गडबडीत प्रत्येकवेळी स्तनपान करण्यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. विशेषत: ज्या स्त्रिया वर्किंग वुमन असतात त्यांना स्तनपानासाठी वेळ काढणे महाकठीण असते. अशावेळी आपल्या बाळाला (Pumping and storing breastmilk) दूध पाजण्यासाठी आईचे दूध पंपिंगचा (Pumping Breast Milk) वापर करून काढून स्टोअर केले जाते. यामुळे आई कामात बिझी असताना देखील बाळाला आईचे दूध मिळणे सहज शक्य होते(Is It OK to Just Pump and Not Breastfeed).

यासाठी आईचे ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पंप येतो. या पंपचा वापर आजकाल सर्वच स्त्रिया करताना दिसतात. ब्रेस्ट मिल्क पंप करणे हा एक उत्तम पर्याय असला तरीही ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी या पंपचा वापर करणे कितपत योग्य आहे की नाही असा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो. याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा यांनी अधिक माहिती दिली आहे. ब्रेस्ट मिल्क पंप करण्याचे फायदे व तोटे कोणते? किंवा ते करावे की करु नये याबद्दल अधिक माहिती घेऊयात(Is it safe to pump breast milk while breastfeeding). 

ब्रेस्ट मिल्क पंप करण्याचे फायदे कोणते ? 

१. आपल्या बाळाला दूध पाजण्याची फ्लेसिबलिटी :- जर तुम्हाला एखाद्यावेळी स्तनपान करणे सोयीस्कर वाटत नसेल तर तुम्ही पंप केलेले दूध बाटलीतून देऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाला कुठेही आणि कधीही दूध पाजण्याची फ्लेसिबलिटी मिळते.

२. दूध साठवणे :- जर तुम्हाला कामावर जायचे असेल किंवा काही काळासाठी बाळापासून दूर राहणे आवश्यक असेल तर तुम्ही पंप केलेले दूध साठवून ठेवू शकता जेणेकरून तुमच्या बाळाला तुमचे दूध मिळत राहील.

३. स्तनदाह टाळणे :- जर तुमच्या स्तनांमध्ये जास्त दूध भरलेले असेल आणि तुमचे बाळ ते पूर्णपणे पिऊन रिकामी करत नसेल तर स्तनदाह होऊ शकतो. अशावेळी नियमितपणे पंप केल्याने तुम्ही स्तनांमधील अतिरिक्त दूध काढून टाकू शकता आणि स्तनदाह टाळू शकता.

ब्रेस्ट मिल्क पंप करण्याचे तोटे कोणते ? 

१. वेदनादायी ठरु शकते :- काही महिलांना ब्रेस्ट मिल्क पंप करणे कठीण किंवा वेदनादायक वाटू शकते.

२. हानिकारक ठरु शकते :- वारंवार स्तनांतून दूध काढताना पंपचा वापर केल्याने स्तनाग्र आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते.

३. बाळासाठी हानिकारक ठरु शकते :- जेव्हा बाळाला आईचे दूध पंपाद्वारे दिले जाते तेव्हा बाळाला योग्य ती पोषक तत्व मिळत नाहीत.
आईचे दूध साठवून ठेवल्यावर या दुधात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे बाळाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

४. दूध साठवणे आणि हाताळणे :- पंप केलेले दूध योग्यरित्या साठवणे आणि हाताळणे महत्वाचे असते. नाहीतर हे दूध दूषित होऊ शकते आणि तुमच्या बाळाला पोटासंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

ब्रेस्ट मिल्क केव्हा पंप करावे ? 

१. ब्रेस्ट मिल्क पंपिंग वारंवार न करता अगदी आवश्यक असेल तेव्हाच केले पाहिजे.
२. आईचे दूध पंप करण्यापूर्वी, बाटलीसोबतच इतर उपकरणे देखील स्वच्छ करुनच घ्यावीत. 
३. ब्रेस्ट मिल्क पंपिंग केलेले दूध जास्त काळ बाटलीत ठेवू नये. 

तज्ज्ञांच्या मते, स्वच्छतेची विशेष काळजी घेतली तरच आईचे दूध पंप करणे सुरक्षित आहे. ब्रेस्ट मिल्क दररोज पंपिंग करणे सुरक्षित मानले जात नाही. त्यामुळे अगदी गरजेच्याच ब्रेस्ट मिल्क दररोज पंपिंग करावे. प्रत्येक आईने आपले दूध पंप करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि दूध पंपिंग करण्याची योग्य पद्धत शिकून घेतली पाहिजे.

Web Title: What’s Best for You? Exclusively Breastfeeding or Pumping? Is It OK to Just Pump and Not Breastfeed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.