Lokmat Sakhi >Health >Pregnancy > आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

आपलं बाळ गोरं नसेल तरीही ते तितकंच सुंदर आहे याबाबत आपण खात्री बाळगायला हवी. रंग ही जन्मत: मिळालेली गोष्ट असून ती कोणीही बदलू शकत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 04:04 PM2022-04-12T16:04:41+5:302022-04-12T16:27:09+5:30

आपलं बाळ गोरं नसेल तरीही ते तितकंच सुंदर आहे याबाबत आपण खात्री बाळगायला हवी. रंग ही जन्मत: मिळालेली गोष्ट असून ती कोणीही बदलू शकत नाही.

Why all the fuss about getting your baby white? Sania Mirza also did home experiments for a white baby ... | आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

Highlights२०१८ मध्ये त्यांना मुलगा झाला असून या मुलाचे नाव इझान आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि सानियाचा नवरा शोएब मलिक याने याबद्दलचा खुलासा केला आहे. नुकत्याच त्याने दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याने सांगितलं.

आपण गोरे असलो की छान दिसतो. गोरा रंग नसेल तर आपल्या रुपाला काहीही किंमत नाही हे आपल्या मनावर अतिशय ठामपणे कोरले गेले आहे. इतकेच नाही तर आपले होणारे बाळही गोरे असावे, त्याचे गाल चित्रातील बाळासारखे लाल गुलाबी असावेत असे प्रत्येक आईला वाटते. पण जन्मत: आपल्याला मिळणारा रंग हा काही कोणी ठरवून देत नाही तर आपल्या आई-वडिलांच्या रंगाप्रमाणे किंवा इतर अनेक गोष्टींवरुन आपला रंग ठरत असतो. त्यामुळे आपला रंग कसाही असेल तरी आपण छानच आहोत हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तर आपलं बाळ गोरं नसेल तरीही ते तितकंच सुंदर आहे याबाबत आपण खात्री बाळगायला हवी. 

(Image : Google)
(Image : Google)

हल्ली आपल्याला होणारं बाळ गोरं व्हावं यासाठी महिला एक ना अनेक उपाय करताना दिसतात. काही गर्भवती स्त्रिया सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी पंचामृत खातात तर कोणी केशर दूध पिते. असे केल्याने बाळाचा वर्ण गोरा होतो असे म्हटले जाते. कोणी म्हणतं गर्भधारणा झाल्यावर पुढचे ९ महिने नियमित बदाम खाल्ले तर आपलं बाळ गोरं होईल तर कोणी म्हणतं रोज एक सफरचंद खाल्लं तरच बाळ गोरं होईल. आता हे असं सगळं खरंच होतं की नाही याला कोणतेही शास्त्रीय आधार नाहीत. पण बाळ गोरं होण्याच्या इच्छेपोटी आणि आपला विश्वास म्हणून हे केले जाते. यामुळे बाळ गोरं होऊ न होऊ पण सफरचंदामुळे लोह, कॅल्शियम व शरीलाला आवश्यक असणारे इतर घटक मिळत असल्याने सफरचंद हे एरवी आणि गर्भधारणेत फायदेशीरच असते.

(Image : Google)
(Image : Google)

आता हे सगळं आपल्यापर्यंत ठिक होतं. पण प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिलाही आपलं बाळ गोरं व्हावं असं वाटतं आणि विशेष म्हणजे त्यासाठी ती आपल्या आईने दिलेला सल्ला पूर्ण ९ महिने ऐकला. सानियाने ९ महिन्यातील बहुतांश दिवस सफरचंद खाल्ले. तर सानियाच्या आईच्या म्हणण्यानुसार दररोज सफरचंद खाल्ल्याने होणारं बाळ गोरं होतं. म्हणून सानियाने गर्भवती असताना सर्वाधिक सफरचंद खाल्ली आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि सानियाचा नवरा शोएब मलिक याने याबद्दलचा खुलासा केला आहे. नुकत्याच त्याने एआरवाय डिजिटल या चॅनलला शान ए सुहूर या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याने सांगितलं. आपली सासू सानियाला गर्भवती असताना नियमित सफरचंद खायला लावायची आणि त्यामुळे बाळ गोरं होतं असंही सांगायची असं तो म्हणाला.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांची २००३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर जवळपास त्यांचा २००९ पर्यंत विशेष संपर्क नव्हता पण २००९ मध्ये ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकमेकांना डेट करु लागले. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी रितसर लग्न केले. त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये त्यांना मुलगा झाला असून या मुलाचे नाव इझान आहे. 

Web Title: Why all the fuss about getting your baby white? Sania Mirza also did home experiments for a white baby ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.