Join us   

world breastfeeding week : आईचे दूध सहा महिने न पिणारे बाळ होते अशक्त, मेंदूही राहतो कमकुवत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2024 8:00 AM

world breastfeeding week : आईचे दूध म्हणजे बाळासाठी वरदान, ६ महिन्यानंतर बाळाला कसा आहार द्याला हवा ते पाहा.

ठळक मुद्दे दुधाची बाटली आणू नका.

डॉक्टर हेमंत जोशी/ डॉ.अर्चना जोशी (बालरोगतज्ज्ञ)

भारतात रोज दहाहजार मुले मरतात. त्यात सर्वाधिक आईचे दूध न मिळणारे असतात. या माहितीअभावी आज दहापैकी ९ मुले त्यांच्या दुसऱ्या वाढदिवसाला अशक्त आहेत.  ते व त्यांचा मेंदू कमकुवत राहतो. हे आपण बदलू शकतो. आईचे दूध अमृत आहे. आईचे दूध नसेल तर मुलाचे जगणे खूप कठीण आहे. 

आईच्या पोटातून बाहेर येताच मूल रडते. त्याला आईच्या पोटावर ठेवा आणि ते बाळ दूध शोधून पिते. पहिले ६ महिने फक्त आईचेच दूध द्या. त्यासाठी आमच्या सूचनेवरून आईला आता ६ महिन्यांची रजा मिळते. नंतर ज्यादिवशी आईला वाटेल की तिचे दूध कमी आहे, तेव्हा तिने मुलाला घरचे अन्न देणे सुरू केले पाहिजे.

बाळाला वरचा आहार कसा द्याल? १. बाळाला तुमच्या मांडीवर बसवा आणि मुलाच्या ओठांवर मऊ डाळ, भात, रव्याची खीर, उपमा, केळी, चिकू पपई असे अन्न लावा. मूल ते जिभेने चाटून खातात. २. आईने प्रत्येक वेळी आपले दूध देण्याआधी हे खायला द्यावे. अन्न आणि औषधांमध्ये आईचे दूध घाला. मुले ते अधिक आनंदाने घेतात. लहान मुलांचे अन्न चमच्यात घ्या. तो वाकडा करा. ते खाली पडले तर त्यात पाणी जास्त आहे. असे अन्न देऊ नका. ३. प्रत्येक वेळी भातात थोडे तेल किंवा तूप घाला. काही भाज्या, फळे देखील घाला. लवकरच मुले घरचे सर्व अन्न आपल्या हाताने घरचे सर्व अन्न खाऊ लागतात.

४. नवीन मुलाच्या छातीत दुधाची गाठ येते. त्याला हात लावू नका. ते दूध पिळल्याने तेथे जखम होते. तेथील दूध ग्रंथी खराब होते. अशा मुली नंतर आपल्या मुलांना दूध देवू शकत नाहीत. ५. घरच्या अन्नापेक्षा बाजारचे अन्न डबे शंभरपट जास्त महाग आहेत. घेऊ नका. आपण जे काही खातो ते सर्व आपल्या मुलाला द्या. ६. दुधाची बाटली आणू नका ती नवीन पुतना मावशी. तिला होळीत जाळावे. ही माहिती सर्वांना द्या. ही सर्वोत्तम देश सेवा आहे.

टॅग्स : जागतिक स्तनपानआरोग्यलहान मुलंमहिलामहिला आणि बालविकास