आई (Mother) होणं हा अत्यंत सुखद अनुभव असतो. पण त्यासोबतच येतं ते म्हणजे नैराश्य. मूल हातात आल्यानंतर बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत महिलांना नेहमीच कुटूंबियांची साथ मिळतेच असं नाही. आई होण्याआधी नऊ महिन्यात बऱ्याच त्रासातून महिलांना जावं लागतं हे इथेच संपत नाही तर इथूच खरं स्ट्रगल सुरू होतं. बाळाचा सांभाळ व्यवस्थित करून स्वत:ची मानसिक स्थिती सांभाळणं महिलांसाठी खूप कठीण होतं कारण. आई होण्याबरोबरच शारीरिक, मानसिक बदलांचा सामना करावा लागतो. (What is Postpartum Depression Know Symptoms)
अशा स्थितीत अनेक महिला तणावाखाली जातात आणि सतत नकारात्मक विचार येतात. याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. नव्या आईला स्वत:ची काळजी घ्यावी की बाळाची याबाबत काहीच उमगत नसते. अशावेळी तिची होणारी चिडचिड समजून घेण्याची गरज असते. तिच्यावर रागवण्यापेक्षा तिला थोडं समजून घेतलं तर तिचा भार हलका होतो होतो आणी तणावही येत नाही. स्वत:मध्ये होणारे बदल आई आनंदाने स्वीकारते.
बाळंतपणानंतरच्या नैराश्याची कारणं काय, लक्षणं काय याबाबत मनोविज्ञान तज्ज्ञ स्नेहल जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे. बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्याचे निदान सहजा केले जात नाही. याची बरीच कारणं असू शकतात. आधी हे ओळखायचं कसं ते समजून घ्या. या प्रकारच्या नैराश्यात झोप न येणं, सतत निराशा वाटणं, रडू येणं, झोप न येणं, भूक न लागणं, सतत चिंता मनात येणं, बाळाशी आपलं काही नातं आहे असं न वाटणं, बाळाबद्दल माया-जवळीक न वाटणं, आत्महत्येचे विचार येणं, तुम्हालाही असं वाटत असेल तर आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा, काऊंसिलरशी संपर्क साधा. आजूबाजूला अशा बऱ्याच अनेक महिला आहेत ज्यांची बाळं लहान आहेत त्यांचाशी बोला. अशा स्थितीत एकमेकांची मदत घेणं खूप गरजेचं आहे.
याचे निदान का होत नाही
पहिलंच बाळ आहे. मग असा त्रास होणारच, हे नॉर्मल आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. तुझे हॉर्मोन्स वर खाली झाले आहेत. आई होणं सोपं नाही, बाळ झालं तर त्रास होणारच असंही म्हटलं जातं. तुम्हाला असं जाणवलं किंवा आजूबाजूला कोणालाही असा त्रास होत असेल तर त्वरीत स्त्री रोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.