28 जुलैला जगभरात जागतिक हिपॅटायटिस दिवसाच्या (World Hepatitis Day ) निमित्तानं या जीवघेण्या आजाराबाबात जनजागृती केली जाते. हिपॅटायटिस हा यकृताशी संबंधित असलेला हा आजार विषाणू संसर्गानं होतो. या आजारात यकृताला सूजदेखील येते. हिपॅटायटिस या आजाराच ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. या सर्व प्रकारात हिपॅटायटिस बी आणि सी च्या संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यातही गरोदर माता आणि जन्माला येणाऱ्या बाळाला हिपॅटायटिस बी च्या (Hepatatis B) संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्याबाबत गरोदर महिलांनी (Hepatatis B in pregnant women) काळजी घेणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास नवजात बाळाला तर हिपॅटायटिसचा धोका (Hepatitis B risks for new born baby) असतोच पण या आजारांच्या संसर्गानं यकृत दाह (लिव्हर सिरोसिस) आणि कर्करोगासारखे घातक आजार होण्याचा धोकाही वाढतो.
Image: Google
हिपॅटायटिस बी काय आहे?
हिपॅटायटिस बी एक संसर्गजन्य आजार आहे. या आजारात लिव्हरला सूज येते आण दाह होतो. हिपॅटायटिस बी हा आजार एचआयव्ही संसर्गापेक्षाही घातक मानला जातो. कारण या आजाराचे विषाणू शरीराच्या बाहेरही कमीत कमी 7 दिवस जिवंत राहातात आणि कोणत्याही सुदृढ व्यक्तीला त्याचा संसर्ग होवू शकतो. हिपॅटायटिस बी हा विषाणु एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात इंजेक्शन, असुरक्षित शरीर संबंध संक्रमित होतो . तसेच टूथब्रश, इंजेक्शन, टॅटू काढणे, शरीरावर टोचून घेणे या कारणांनीही हिपॅटायटिस बीचा संसर्ग होतो. गरोदर महिलेकडून नवजात बाळालाही हिपॅटायटिस बी ची लागण होवू शकते.
Image: Google
हिपॅटायटिसची लक्षणं काय ?
1. एक ते तीन आठवडे काविळ होणं.
2. लघवीचा रंग बदलणं.
3. 8-10 दिवसांपासून थकवा येणं, अंगदुखी अशी फ्ल्यूची लक्षणं जाणवणं.
4. उलट्या होणं, जीव मळमळणं.
5. अंगास खाज येणं.
6. भूक कमी लागणं किंवा भूकच न लागणं.
7. अचानक वजन कमी होणं ही लक्षणं प्रामुख्यानं आढळून येतात.
Image: Google
गरोदरपणात हिपॅटायटिस बी चा संसर्ग झाल्यास..
1. गरोदरपणात हिपॅटायटिस बी चा संसर्ग झाल्यास वेळेआधीच प्रसूती होण्याचा धोका असतो.
2. कमी वजनाचं बाळ जन्माला येण्याची शक्यता असते.
3. गरोदरपणात हिपॅटायटिस बी चा संसर्ग झाल्यास मधुमेह होवू शकतो.
4. गरोदरपणात हिपॅटायटिस बीची लागण झाल्यास प्रसूतीदरम्यान जास रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
Image: Google
जन्माला येणाऱ्या बाळाला हिपॅटायटिस बीचा संसर्ग होवू नये म्हणून..
1. गरोदरपणात आईला जर हिपॅटायटिस बी ची लागण झाली तर होणाऱ्या बाळातही त्याची लागण होण्याचा धोका असतो. तो टाळायचा असल्यास बाळ जन्माला येताच बाळाला हिपॅयाटटिसची लस देणं आवश्यक असतं.
2. जन्मल्यानंतर एक महिन्यांनी बाळाला पुन्हा लस देणं आवश्यक असतं. यानंतर दोन महिन्यांनी आणि नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर बाळाला हिपॅटायटिसची लस द्यायला हवी.
3. मूल एक वर्षाचं झाल्यानंतर बाळाची रक्त तपासणी करुन बाळाच्य शरीरात हिपॅटायटिस बी चे विषाणू आहे का , किती हे बघणं आवश्यक असतं. मूल 5 वर्षांचं झाल्यावर मुलाला हिपॅटायटिस बी लसीचा बूस्टर डोस देणं गरजेचा असतो.