Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

World Thalassemia Day: गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता असेल तर ते बाळासाठी अतिशय घातक ठरू शकतं. बाळाला थॅलेसीमियासारख्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:12 AM2024-05-08T09:12:09+5:302024-05-08T09:15:02+5:30

World Thalassemia Day: गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता असेल तर ते बाळासाठी अतिशय घातक ठरू शकतं. बाळाला थॅलेसीमियासारख्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच....

World Thalassemia Day: pregnant women should take iron rich food to prevent her baby from Thalassemia | गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

Highlightsबहुतांश भारतीय महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. याचा परिणाम गरोदर महिलेच्या बाळावर होऊ शकतो

गराेदरपणाच्या काळात महिलांनी स्वत:कडे, स्वत:च्या आरोग्याकडे अतिशय बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. गरोदरपण म्हणजे आजारपण नाही. पण तरीही हा काळ असा असतो की त्या काळात आई जे काही करेल, त्या गोष्टींचा परिणाम सगळ्यात आधी तिच्या पोटातल्या बाळावर होऊ शकतो. त्यामुळे या काळात आईने स्वत:ला तर जपावेच, पण त्यासोबत आहाराकडेही लक्ष द्यावे. घरचं सकस, सात्विक अन्न घेण्यावर भर द्यावा. आजही बहुतांश भारतीय महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते (iron deficiency in pregnant women). याचा परिणाम गरोदर महिलेच्या बाळावर होऊ शकतो आणि त्यातूनच त्या बाळाला थॅलेसीमियासारखा (Thalassemia) आजारही होऊ शकतो.

 

भारतात थॅलेसीमिया या आजाराचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. National Health Mission यांनी जाहीर केलेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास दिड लाख बालकांना हा आजार असून या आजारात शरीरातील हिमोग्लोबिनमध्ये असणाऱ्या घटकांत ॲबनॉर्मल पद्धतीने बदल होतो.

बघा जपानी लोकांचा वेटलॉस फॉर्म्युला, वजन उतरेल झरझर

डॉ. राहूल भार्गव यांनी thehealthsite.com यांना दिलेल्या माहितीनुसार गरोदर महिलांच्या शरीरातील लोहाची गरज खूप जास्त वाढलेली असते. म्हणूनच त्यांनी लोहयुक्त खाण्यावर विशेष भर दिला पाहिजे.

 

गरोदर महिलांनी प्रत्येक दिवशी २७ मिलीग्रॅम एवढे लोह खावे. हे त्यांना हिरव्या पालेभाज्या, शेंगा तसेच वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळू शकते. गरोदर महिलांनी फक्त आहारातून मिळणाऱ्या लोहावर अवलंबून राहण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न सप्लिमेंट सुरू करणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी कधीही अधिक फायदेशीर आहे.

बाथरुमची फरशी, भिंती पिवळट पडल्या? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाथरुम चकाचक....

ज्या होणाऱ्या आईला मुळातच थॅलेसीमिया आहे, तिने तर तिच्या आहाराबाबत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टर असा सल्ला देतात की अशा महिलांनी लग्नानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने लोहाच्या गाेळ्या घ्यायला सुरुवात करावी. जेणेकरून त्या गरोदर राहीपर्यंत त्यांच्या शरीरात बाळाच्या दृष्टीने पुरेसे लोह असेल. कारण बाळाला थॅलेसीमिया होऊ द्यायचा नसेल तर ही गोष्ट आईने करणं अतिशय महत्त्वाचं आहे...
 

Web Title: World Thalassemia Day: pregnant women should take iron rich food to prevent her baby from Thalassemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.