सुंदर चेहरा आणि मोहक हास्याने अनेकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम (Yami Gautam). काही वर्षांपुर्वीच तिचं आदित्य धर यांच्याशी लग्न झालं असून आता या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. विशेष म्हणजे Article 370 या चित्रपटाचं शुटिंग (shooting) सुरू असतानाच यामीला तिच्या प्रेग्नन्सीची (pregnancy) बातमी कळाली. त्यानंतरचा सगळा प्रवास खूपच वेगळा आणि अतिशय चॅलेंजिंग होता. ते सगळे अनुभव इतके वेगळे होते की मी त्यावर एखादं पुस्तक लिहू शकेल, असं यामीने सांगितलं आहे.
यामीची प्रमुख भूमिका असणारा Article 370 हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कामांमध्ये ती सध्या व्यस्त आहे.
३, ५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमकं कधी खावेत? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
त्याच दरम्यान झालेल्या तिच्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नन्सीच्या काळात शुटिंग करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी माहिती दिली. Rediff.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार यामीच्याच भाषेत सांगायचं झाल्यास "It was challenging. It was mentally draining too. I could write a thesis on it" अशा शब्दांत तिने या अनुभवाचं वर्णन केलं आहे. ती म्हणते की या सगळ्या काळात माझा नवरा आणि घरातले सगळे माझ्या सोबत होते, हा माझ्यासाठी खरोखरच मोठा आधार होता.
Article 370 या चित्रपटात यामीला अनेक ॲक्शन सीन द्यायचे होते. त्यासाठी तिचं मागच्या काही दिवसांपासून ट्रेनिंगही सुरू होतं. अतिशय अंग मेहनत घेऊन तिला हे सीन द्यावे लागले.
फक्त ३ स्टेप्समध्ये करा बीटरुटचं मिनी फेशियल, व्हॅलेटाईन्स डे ला चेहऱ्यावर येईल मस्त गुलाबी ग्लो
ती म्हणाली की मला जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीची बातमी कळाली तेव्हा सुदैवाने जवळपास सगळे ॲक्शन सीन शूट करून झाले होते. काही सीनमध्ये फक्त डबिंग करणं आणि माझा आवाज देणं बाकी होतं. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला शूट करत होते, तेव्हापासूनच माझं बाळ माझ्या सोबत होतं. माझा हा अनुभव मला अभिमन्यूच्या गोष्टीची आठवण करून देताे... यामीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा असून तिचे चाहतेही तिच्या भुमिकेबाबत उत्साही आहेत.