Lokmat Sakhi >Health > रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

Pregnant women : गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:18 PM2021-06-22T14:18:55+5:302021-06-22T16:06:52+5:30

Pregnant women : गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

Pregnant women : Study suggests online coaching can help pregnant women make improved choices | रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

Highlightsडॉ बोनी एनजी म्हणाले, "आमच्या चाचणीवरून असे दिसून आले आहे की डिजिटल हेल्थकेअर साधने महिलांना त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात."

प्रेग्नंसी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.  हा निर्णय घेण्याआधी आणि घेतल्यानंतर महिलांना वेगवगेळ्या प्रसंगातून जावं लागतं. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार असे सुचविण्यात आले आहे की महिला गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

रिप्रोडक्टिव्ह बायोमेडिसिन या ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं की, गर्भधारणेत महिलांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी डिजिटल आरोग्य सेवा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. असं NHS च्या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. ज्या ओव्हर वेट महिलांना प्रेग्नंसीत त्रास होत होता, ऑनलाईन कोचिंगनंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. 

साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या या अभ्यासात, 262 महिला सहभागी झाल्या ज्या गर्भधारणेची योजना आखत होत्या. तसंच ज्यांना गर्भधारणेसाठी किंवा वारंवार गर्भपात होण्याच्या अडचणी आल्या त्यापैकी एकीने ऑनलाइन जीवनशैली कोचिंग प्रोग्राम स्मार्ट अॅपमध्ये साइन अप केले. सर्व सहभागींनी सुरुवातीला चार-महिन्यांच्या चाचणी दरम्यान सहा आठवड्यांच्या अंतराने अ‍ॅपद्वारे प्रश्नावली पूर्ण केली.

प्रश्नावलीमध्ये त्यांचा आहार, फोलिक एसिडचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या विषयांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नावली नंतर, सहभागींपैकी निम्म्या लोकांना यांना त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे कोचिंग प्लॅटफॉर्मद्वारे स्वयंचलित सल्ला आणि शिफारसी पाठविल्या गेल्या. तर इतर महिलांना पेरिकॉन्सेप्टेन्टल केअर कशाप्रकारे घ्यावी यासाठी एनएचएस वेबसाइटची मदत  घेण्यास सांगून मार्गदर्शन दिले. 

प्रश्नावलीवरील प्रतिसादाच्या विश्लेषणावरून असे दिसून आले की स्मार्ट प्रेग्नेंन्सी प्लॅटफॉर्मद्वारे सल्ला प्राप्त करत महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला होता. महत्वाचं म्हणजे २५ पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स असलेल्यांसाठी धुम्रपान आणि मद्यपान कमी केल्याचा फायदा झाला. या अॅप्सच्या वापरामुळे गर्भवती महिलांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडून आला. 

साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल सायन्समधील तज्ज्ञ डॉ बोनी एनजी म्हणाले, "आमच्या चाचणीवरून असे दिसून आले आहे की डिजिटल हेल्थकेअर साधने महिलांना त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात."

ते पुढे म्हणाले, "ही साधनं वापरुन स्त्रिया स्वत: च्या शरीरावर नियंत्रण मिळवू शकतात आणि डॉक्टरांना भेटल्यावर त्यांना च्यांच्या त्रासाबाबत सविस्तर चर्चाही करू शकतात. मला आशा आहे की आपण सगळेच महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी या ई-आरोग्य व्यासपीठाचा उपयोग करू.  "

Web Title: Pregnant women : Study suggests online coaching can help pregnant women make improved choices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.