सध्या स्क्रीनचा जमाना आला आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण मोबाईल फोनचा वापर करतो. बहुतांश लोकांची कामं देखील लॅपटॉप अथवा संगणकाद्वारे होते. स्क्रीन टायमिंग वाढले की, साहजिकच डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांवर ताण आला की, डोकेदुखीची समस्या उद्भवते. प्रत्येक डोकेदुखीला सामान्य आजार समजू नये. काही डोकेदुखी मायग्रेन या आजारामुळे देखील उद्भवते. पण या आजाराचा इलाज रबडी - जलेबी असेल तर?
रबडी-जलेबी हा कॉम्बिनेशन भारतात खूप प्रसिद्ध आहे. व याचा वापर आपण मायग्रेनचा ताण कमी करण्यासाठी करू शकतो. या संदर्भात, आयुर्वेद डॉक्टर मिहीर खत्री म्हणतात, ''जिलेबी-राबडी खाल्ल्याने वातदोष दूर होतो. त्यामुळे मायग्रेनच्या दुखण्यावर हा उपाय रामबाण उपाय ठरू शकतो''(Rabri Jalebi can cure chronic migraine! Viral post claims so).
न्यूरोलॉजिकल विकार वात दोषामुळे होते
डॉक्टर मिहीर खत्री यांच्या मते, ''न्यूरोलॉजिकल विकार वात दोषाशी संबंधित आहेत. ज्यामध्ये मज्जासंस्थेशी संबंधित सर्व आजार येतात. डोकेदुखी, मायग्रेन, अल्झायमर, बेल्स पाल्सी, टेंशन, स्ट्रोक इत्यादी त्रास होत असतील तर, रबडी-जलेबीचा उपाय उपयुक्त ठरू शकतो.''
तुम्ही उभं राहून पाणी पिता? उभं राहून पाणी पिणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात..
रबडी - जेलेबी मायग्रेनवर कशा प्रकारे काम करते
डॉक्टर मिहीर खत्री सांगतात, ''रबडी आणि जिलेबी यांचे मिश्रण कफवर्धक आहार मानला गेला आहे. जो वात शमन म्हणजे वात दोष कमी करण्यास मदत करतात. आपण याचे सेवन वात काल दरम्यान करू शकतो, हा उपाय मायग्रेन यासह इतर डोकेदुखीपासून आराम देतो.
रबडी - जेलेबीचे सेवन कधी करावे?
मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी हा उपाय रिकाम्या पोटी, वात काळात करावा. डॉक्टरांच्या मते, सूर्योदयापूर्वीच्या वेळेला वात काल म्हणतात, हा उपाय करण्याची हीच योग्य वेळ आहे. या उपायाचा फायदा मिळवण्यासाठी २ ते ३ आठवडे याचे सेवन करावे.
आपल्याला मायग्रेन तर नाही ना? सामान्य डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष, आजच तपासा
या लोकांनी या उपायाचा वापर करू नये
रबरी आणि जिलेबी या दोन्ही पदार्थांमध्ये साखर व लॅक्टोजचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा उपाय मधुमेह आणि लैक्टोज इनटॉलरेंस रुग्णांसाठी हानिकारक मानला गेला आहे.