आई होणे हा प्रत्येक स्त्री साठी आयुष्य बदलणारा आणि खडतर प्रसंगातून जाणारा अनुभव असतो. या वाटेत अनेक अडथळे येतात आणि महिलांना त्रासदायक मानसिक संकटांना तोंड द्यावे लागते. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटींनाही या प्रकारचे अनुभव आले आहेत. आपले सुखद दु:खद अनुभव लोकांसोबत शेअर करण्याचं धाडस फार कमी जण दाखवतात.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माता आदित्य चोप्राची पत्नी राणी मुखर्जी तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल एरवी कोणाशीही काही शेअर करत नाही. राणी मुखर्जी सोशल मीडियावरही फारशी एक्टिव्ह नसते. तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल चाहत्यांनाच्या मनात बरीच उत्सुकता असते. तिने अलिकडेच एका मुलाखतीत तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले आहे. राणीने सांगितले की कोरोना काळात ती गर्भवती होती पण पाचव्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये राणीने या शोकांतिकेबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. (Rani Mukerji reveals she had miscarriage in 2020)
राणी म्हणाली, “कदाचित मी पहिल्यांदाच हे स्पष्टपणे सांगत आहे, कारण आजच्या जगात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची सार्वजनिकपणे चर्चा केली जाते आणि अधिक लक्ष वेधण्यासाठी तुमच्या चित्रपटाबद्दल बोलणे महत्त्वाचे असते. हेच कारण आहे की मी माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना याबद्दल कधी बोलले नाही.
त्यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मी वैयक्तिक प्रसंगाचा वापर करत असल्याचे दिसले असते. कोविड-19 आला त्याच वर्षीची गोष्ट आहे. 2020 च्या उत्तरार्धात मी माझ्या दुसर्या मुलासह गरोदर राहिली आणि दुर्दैवाने पाच महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मी माझे मूल गमावले." (I got pregnant for 2nd time but lost my baby 5 months into pregnancy)
10 दिवसांनंतर निखिल अडवाणीने तिला फोन केल्याचेही राणीने सांगितले. "त्याने मला 'मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे' ची कथा सांगितली... भावना अनुभवण्यासाठी मला एक मूल गमवावे लागले असे नाही... पण काहीवेळा तुम्ही वैयक्तिकरित्या ज्या गोष्टीतून जात आहात, तो चित्रपट तुमच्यासमोर उलगडतो. जेव्हा मी ही कथा ऐकली तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. नॉर्वेसारख्या देशात भारतीय कुटुंबाला यातून जावे लागेल असे मला कधीच वाटले नव्हते.