सद्गुरू आणि त्यांचे आरोग्यदायी उपाय लोकांना नेहमीच आवडतात ते नेहमीच लोकांना फिट राहण्याचा सल्ला देतात. सद्गुरू लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहायला शिकवतात. सद्गुरू लोकांना नेहमीच चांगलं अन्न खाण्याचा सल्ला देतात. सध्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींना सद्गुरू अन्हेल्दी मानतात. हेल्थसंबंधित व्हिडिओज ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Sadhguru Suggest Most Powerful Source Of Protein 2 Things Kulthi And Peanuts House Gram Benefits)
सद्गुरू लोकांना त्यांच्या वयानुसार खाण्याचा सल्ला देतात. सद्गरू सांगतात दिवसाची सुरूवात हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊन करावी. सद्गगुरू सांगतात की मोड आलेली कुळिथाची डाळ मोड आलेले शेंगदाणे खाल्ल्याने हेल्थ चांगली राहण्यास मदत होते. सद्गुरूंनी हे २ पदार्थ प्रोटीनचा चांगला स्त्रोत असल्याचं सांगितलं आहे.
शरीर कमजोर झालंय? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाडं; फिट-तरूण दिसाल
कुळीथाच्या डाळीने शरीराला होणारे फायदे
सद्गुरू सांगतात की कुळीथाची डाळ प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ही डाळ घोड्याला खायाल दिली जाते. म्हणूनच याचा हॉर्स ग्राम असंही म्हणतात. व्यक्तीनं ही डाळ खाल्ली तर हार्ट डिसीज, डायबिटीजस अस्थमा, किडनी स्टोन, लठ्ठपणा आणि खोकला, सर्दीसह अनेक आजारांपासून बचाव होतो. कुथिळची डाळ प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. या डाळीत एंटीऑक्सिडेंट्सही असतात.
कुळीथाची डाळ कशी खावी?
सदगुरूंनी कुळीथाची डाळ खाण्याचा हेल्दी उपाय सांगितला आहे. एक वाटी पाण्यात कुळीथाची डाळ ६ ते ७ तासांसाठी भिजवण्यासाठी सोडून द्या. नंतर पांढऱ्या कापडात बांधून तसंच ठेवा. नंतर हळूहळू मोड येऊ लागतील नंतर हे खायला सुरू करा. कुळीथाच्या डाळीच्या सेवनानं शरीरात एनर्जी येते.
सद्गुरू सांगतात की त्यांनी अनेक वर्षांपर्यंत मोड आलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले आहे. ६ ते ८ तास भिजवल्यानंतर याचे सेवन करतात. मोड आलेले शेंगदाणे खाल्ल्यानं शरीरातील पित्त बाहेर येतं. सद्गुरू सांगतात की शेंगदाणे पूर्णपणे ऑर्गेनिक असायला हवेत. मार्केटमध्ये आता शुद्ध वस्तू येत नाहीत त्यामुळे कोणत्याही पदार्थांची निवड करताना काळजीपूर्वक करायला हवी.