Lokmat Sakhi >Health > तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार

तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार

Risks Of Eating Too Fast: एक घास ३२ वेळा चावून खावा, असं आपल्याला सांगितलं जातं ते काही उगाच नाही..(why chewing food slowly is important?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 02:47 PM2024-11-06T14:47:48+5:302024-11-06T16:21:50+5:30

Risks Of Eating Too Fast: एक घास ३२ वेळा चावून खावा, असं आपल्याला सांगितलं जातं ते काही उगाच नाही..(why chewing food slowly is important?)

side effects of fast eating, why chewing food slowly is important? main reason of weight gain and over eating  | तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार

तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार

Highlightsवारंवार अशा पद्धतीने जेवण केलं तर त्याचा पचन संस्थेवर खूप ताण येतो. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही

हल्ली स्वयंपाक करण्याची पद्धत जशी बदलली आहे, तशीच पद्धत जेवणाचीही बदलली आहे. पुर्वी जेवण करत असताना हातात कोणतंही गॅझेट नसायचं. कुटूंबातले सगळे जण एकत्रितपणे जमिनीवर मांडी घालून बसायचे आणि गप्पा मारत जेवण करायचे. आता असं चित्र बोटावर मोजण्याइतक्या कुटूंबातच दिसून येतं. मोबाईल, टीव्ही बघत लहान मुलांसकट मोठी माणसंही गपागप जेवतात. काही लोकांना ऑफिसच्या लंच टाईममुळे खूप भराभर जेवण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे अगदी १० मिनिटांच्या आता त्यांचं जेवण झालेलंही असतं. तुम्हालाही अशीच खूप भराभर जेवण करण्याची सवय असेल तर ती वेळीच सोडा (Risks Of Eating Too Fast). कारण ते आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं असं तज्ज्ञ सांगतात.(why chewing food slowly is important?)

 

खूप भराभर जेवण करण्याचे दुष्परिणाम

अवघ्या ५- १० मिनिटांत नेहमीच जेवण संपवत असाल तर त्याचे तब्येतीवर कसे दुष्परिणाम होतात, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ itsprashantdesai या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

बाळाच्या दुधाच्या बाटलीला कुबट वास येतो? दुधाची बाटली स्वच्छ ठेवण्यासाठी ५ सोप्या टिप्स

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून त्यामध्ये असं समोर आलं आहे की जे लोक खूप पटापट जेवण करतात त्या लोकांमध्ये पचन संस्था आणि चयापचय संस्था म्हणजेच मेटाबॉलिझमसंबंधी आजार निर्माण होण्याचा धोका ४०० पटींनी वाढलेला असतो. एवढेच नव्हे तर त्या लोकांना टाईप २ डायबिटीज होण्याचा धोकाही २०० पटींनी वाढतो.

 

या आजारांचा धोका वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भराभर खाताना घास पुर्णपणे चावला जात नाही. अन्न अगदी थोडेसे चावून तसेच गिळले जाते. वारंवार अशा पद्धतीने जेवण केलं तर त्याचा पचन संस्थेवर खूप ताण येतो. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही आणि त्यातूनच वेगवेगळे आजार निर्माण होतात.

इडली फुगत नाही- चिकट होते? ५ गोष्टी करून पाहा- मस्त फुगून कापसासारखी मऊ होईल

एवढंच नाही तर खूप जलद खाण्याच्या सवयीमुळे वजनही वाढते. चयापचय क्रिया व्यवस्थित न झाल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी वाढत जाते. जर तुम्ही सावकाश जेवण केलं तर तुमच्या मेंदूपर्यंत तुमचं पोट भरलं असल्याचा व्यवस्थित संदेश पोहोचतो आणि आपोआपच अतिखाणं टाळलं जातं. गरजेपुरतच अन्न पोटात गेल्यामुळे ओव्हरइटींगमुळे होणारे अनेक त्रास आपोआपच टाळले जातात. त्यामुळे सावकाश जेवा, जेवताना कोणतंही गॅझेट बघणं टाळा असं तज्ज्ञ सांगतात. 


 

Web Title: side effects of fast eating, why chewing food slowly is important? main reason of weight gain and over eating 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.