Lokmat Sakhi >Health > बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसतात ५ लक्षणे, वेळीच ओळखा - सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसतात ५ लक्षणे, वेळीच ओळखा - सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका

Signs of high cholesterol on face : जेव्हा बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 05:22 PM2024-11-06T17:22:24+5:302024-11-06T17:23:25+5:30

Signs of high cholesterol on face : जेव्हा बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात.

Signs of high cholesterol on face | बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसतात ५ लक्षणे, वेळीच ओळखा - सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसतात ५ लक्षणे, वेळीच ओळखा - सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉलची (Bad Cholesterol) समस्या वाढते. नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे (Health Tips) प्रमाण वाढल्यावर रक्ताभिसरणात अडचणी येऊ लागतात. ज्यामुळे हृदयविकाराचाही धोका वाढू लागतो. ब्लॉकेजमुळे हृदयाला धोका निर्माण होतो. अशा स्थितीत बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियमित तपासत राहणे गरजेचं आहे.

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. काही लक्षणे चेहऱ्यावरही दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर, समस्या टाळता येऊ शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर चेहऱ्यावर नक्की कोणती लक्षणे दिसतात? पाहूयात(Signs of high cholesterol on face).

चेहऱ्याभोवती बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर दिसणारी लक्षणे

डोळ्याभोवती पिवळे डाग

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, जेव्हा वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा डोळ्यांखाली किंवा पापण्यांभोवती लहान पिवळे डाग दिसू शकतात. हे पिवळे डाग त्वचेखाली चरबी जमा झाल्यामुळे तयार होतात. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

चेहऱ्यावर सूज येणे

चेहऱ्यावर दिसणारी सूज हेही उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यानं रक्ताभिसरणात अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे चेहऱ्यावर सूज निर्माण होते. त्यामुळे या लक्षणांना दुर्लक्ष करू नये.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

त्वचेचा पिवळसरपणा

चेहऱ्यावर पिवळसरपणा हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे त्वचेवर पिवळसरपणा दिसू लागतो. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

चेहऱ्यावर कोरडेपणा आणि खाज सुटणे

उच्च कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत, चेहऱ्यावर कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या असू शकते. खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे त्वचेमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

चेहऱ्यावर गुठळ्या

अनेक वेळा खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे चेहऱ्यावर लहान-लहान गुठळ्या दिसू लागतात. मुख्यतः, डोळ्याभोवती. सहसा, या गुठळ्या वेदनारहित असतात, म्हणून लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अशी लक्षणे दिसली तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: Signs of high cholesterol on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.