Lokmat Sakhi >Health > पोट डब्ब होतं-गॅस पास होत नाही? घरातल्या २ साध्या गोष्टी खा; ॲसिडिटीही होईल कमी

पोट डब्ब होतं-गॅस पास होत नाही? घरातल्या २ साध्या गोष्टी खा; ॲसिडिटीही होईल कमी

Simple 2 Home Remedies For Bloating : सतत ॲसिडिटीच्या गोळ्या घेण्यापेक्षा करा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 03:44 PM2024-04-12T15:44:10+5:302024-04-12T15:44:56+5:30

Simple 2 Home Remedies For Bloating : सतत ॲसिडिटीच्या गोळ्या घेण्यापेक्षा करा घरगुती उपाय

Simple 2 Home Remedies For Bloating | पोट डब्ब होतं-गॅस पास होत नाही? घरातल्या २ साध्या गोष्टी खा; ॲसिडिटीही होईल कमी

पोट डब्ब होतं-गॅस पास होत नाही? घरातल्या २ साध्या गोष्टी खा; ॲसिडिटीही होईल कमी

'लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे' ही म्हण आपल्या सर्वांना ठाऊक आहे (Health Care). या म्हणीमागे विशेष महत्व आहे. या म्हणीप्रमाणे वागल्याने आरोग्याला फायदेच फायदे मिळतात. पण सध्या रात्री उशिरा जेवण करणं, उशिरा झोपणं, शिवाय सकाळी उशिरा उठणं हे कॉमन झालं आहे. अयोग्य खाणं-पिणं, जंक फूडच्या वाईट सवयींमुळे वजन तर वाढतेच, शिवाय पोटाचे विकारही वाढतात (Stomach Problems).

ॲसिडिटी, अपचन, आंबट ढेकर येणे आणि उलटी होणे यापासून प्रत्येक जण त्रस्त आहे. ॲसिडिटीवर (Acidity) उपाय म्हणून आपण औषधं खातो. पण या औषधांमुळे  शरीरात व्हिटॅमिन बी १२, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यासह अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते(Simple 2 Home Remedies For Bloating).

या औषधांच्या अतिसेवनाने शरीरात अशक्तपणा, थकवा, उर्जेची कमतरता निर्माण होते. त्यामुळे औषधांवर अवलंबून न राहता आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकता. योग तज्ज्ञ हीरा योगी यांनी ॲसिडिटीवर २ प्रभावी उपाय सांगितले आहेत. ज्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत नाही.

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

गॅस ॲसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय

जिरे

ॲसिडिटीवर उपाय म्हणून आपण जिरे खाऊ शकता. यासाठी जेवण करण्यापूर्वी थोडेसे जिरे चावून खा. चावून खाल्ल्यानंतर थोडे कोमट पाणी प्या. आपण याचा चहा देखील तयार करून पिऊ शकता. जिऱ्याच्या पाण्यात अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, फायबर इत्यादी गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात. शिवाय पचनक्रियाही सुधारते.

थंड दूध

अनेकदा आपण ऐकलं असेल कच्चे दूध प्यायल्याने पोटाचे विकार दूर राहतात. यामुळे ॲसिडिटी देखील कमी होते. खरंतर दुधामध्ये आढळणारी अल्कली पोटात तयार होणारे अतिरिक्त ऍसिड काढून टाकते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात. यासह  फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते. जर आपल्याला फक्त थंड दूध पिण्याची इच्छा होत नसेल तर, त्यात गुलकंद मिसळून प्या.

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

आपण डॉक्टरकडे कधी जावे?

मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार, दोन्ही उपाय केल्याने जर फरक पडत नसेल तर, आणि लक्षणे अधिक तीव्र होत असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

Web Title: Simple 2 Home Remedies For Bloating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.