Lokmat Sakhi >Health > गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?

गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?

Sooji Vs Atta Which Is Healthier : रव्यात कार्बोहायड्रेट्स असतात. हा एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:56 PM2024-11-07T13:56:07+5:302024-11-07T16:43:46+5:30

Sooji Vs Atta Which Is Healthier : रव्यात कार्बोहायड्रेट्स असतात. हा एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे.

Sooji Vs Atta Which Is Healthier And Contains More Nutrition With The Comparison | गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?

गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?

भारतीय स्वंयपाकघरांमध्ये रवा आणि गव्हाच्या पीठाचा मोठ्या  प्रमाणात वेगवेगळे पदार्थ  बनवण्यासाठी वापर केला जातो (Health Tips). गव्हाच्या पिठाचा चपाती बनवण्यासाठी वापर केला जातो तसंच कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला रव्याची आवश्यकता भासू शकते. हे दोन्ही पदार्थ भारतीय घरांमध्ये असतात. गव्हाचं पीठ जास्त फायदेशीर किंवा रवा जास्त फायदेशीर याचं उत्तर अनेकांकडे नसते. (Sooji Vs Atta Which Is Healthier And Contains More Nutrition With The Comparison)

रवा आणि गव्हाच्या पिठाची न्युट्रिशनल वॅल्यू जाणून घ्यायला हवी. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अपोलो रुग्णालयातील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. गुप्ता इंद्रप्रस्थ यांनी सांगितले की या दोघांपैकी सर्वात जास्त फायदेशीर काय आहे. (Sooji Vs Atta)

रव्यातील पोषक मुल्य

रव्याला सूजी, सेमोलिना असंही म्हणतात.  याचं टेक्स्चर खडबडीत असतं. याचा वापर इडली, उपमा आणि हलवा बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय पास्त्यामध्येही वापरले जाते.

गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना-पाय खूप दुखतात? ग्लासभर दुधात ४ पदार्थ घालून प्या; दुखणं होईल कमी

१०० ग्राम रव्यात जवळपास  ३५०- ३६० कॅलरीज असतात. यात  १ ग्रॅम फॅट, १२ ग्रॅम प्रोटीन आणि ७२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. जवळपास ३ ग्राम फायबर्स असतात. याशिवाय आयर्न, मॅग्नेशियम, थायमिन, नियासिन यांसारखे व्हिटामीन्स असतात. 

रव्यात कार्बोहायड्रेट्स असतात. हा एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. रव्यापासून तयार झालेले पदार्थ खाणं नाश्त्यानंतर किंवा वर्कआऊटनंतर खाणं फायदेशीर ठरतं. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो.  रिफाईंड पिठाच्या तुलनेत ब्लड शुगर लेव्हल कमी असते. रव्यात प्रोटीन्स जास्त असतात.  ज्यामुळे मसल्स रिपेअर होतात आणि ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यास मदत होते आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

दिवाळीत खा-खा खाल्लं, आता वजन वाढलं? ७ दिवसांत वजन कमी करण्याचे ५ उपाय, स्लिम व्हाल

गव्हाच्या पिठातील पोषक तत्व

गहू बारीक करून गव्हाचं पीठ तयार केलं जातं. या पिठापासून तुम्ही चपाती, पराठे बनवू शकता.  गव्हाच्या पिठात जवळपास ३४० ते  ३५० कॅलरीज असतात. २ ग्रॅम फॅट, ७१ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १२ ते १३ गॅम प्रोटीन असते. रव्याच्या तुलनेत गव्हाच्या पिठात जास्त फायबर्स असतात. याशिवाय आयर्न, मॅग्नेशियम, खनिज आणि फॉलेट, रायबोफ्लेविन आणि नियासिन असते. गव्हाच्या पिठात मिनरल्स, व्हिटामीन्स आणि एंटी ऑक्सिडेंट्सही असतात.

रवा आणि गव्हाचं पीठ दोन्हींचा ग्लायसेमिक इंडेक्स मॉडरेट असतो. यात फायबर्स जास्त असतात. म्हणून ब्लड स्ट्रिम कमी साखर रिलिज करते. जे  डायबिटीक रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. रवा पचायला हकला असतो. म्हणूनच आजारी असल्यानंतर रवा खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे दीर्घकाळ भूक कंट्रोल करण्यास मदत होते. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रवा किंवा गहू यांचे नियंत्रित प्रमाणात सेवन  करू शकता.

Web Title: Sooji Vs Atta Which Is Healthier And Contains More Nutrition With The Comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.