Lokmat Sakhi >Health > साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा पलाओ डाएटमुळे मृत्यू झाल्याची चर्चा, नेमके असते काय हे डाएट?

साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा पलाओ डाएटमुळे मृत्यू झाल्याची चर्चा, नेमके असते काय हे डाएट?

What is Paleo Diet: हे वृत्त आल्यापासून पलाओ डाएट paleo diet म्हणजे नेमकं काय, ते एखाद्याच्या मृत्यूचं खरोखरच कारण ठरू शकतं का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 06:25 PM2022-11-01T18:25:00+5:302022-11-01T18:26:07+5:30

What is Paleo Diet: हे वृत्त आल्यापासून पलाओ डाएट paleo diet म्हणजे नेमकं काय, ते एखाद्याच्या मृत्यूचं खरोखरच कारण ठरू शकतं का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. 

South Actor Bharat Kalyan's wife Priyadarshini's death at the age of 43 due to Paleo diet?? | साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा पलाओ डाएटमुळे मृत्यू झाल्याची चर्चा, नेमके असते काय हे डाएट?

साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा पलाओ डाएटमुळे मृत्यू झाल्याची चर्चा, नेमके असते काय हे डाएट?

Highlightsपलाओ डाएट म्हणजे काय, त्यात काेणते पदार्थ खातात आणि कोणते टाळतात, याविषयीची ही माहिती. 

सध्या बरेच जण हेल्थ कॉन्शस झाले आहेत. त्यामुळे डाएट, डाएटिंग (Paleo diet) हे आपल्या चांगल्याच परिचयाचे शब्द. त्यातही डाएटींगच्या बाबतीत तर महिला जरा जास्तच अग्रेसर असतात. वजन कमी करण्यासाठी (diet for weight loss) कोणतं डाएट करावं, काय खावं, याचा काही जणी सतत शोध घेतात. अनेक जणी तर तज्ज्ञांचा सल्ला न घेता मनानेच डाएटिंग सुरू करतात. पण डाएटिंगच्या या अतिप्रकारामुळेच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण (Bharat Kalyan) यांच्या पत्नीचा (Priyadarshini's death) वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी मृत्यू झाला, असं वृत्त आलं आणि त्या करत असलेल्या पलाओ डाएटविषयी अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. पलाओ डाएट (Paleo diet) म्हणजे काय, त्यात काेणते पदार्थ खातात आणि कोणते टाळतात, याविषयीची ही माहिती. 

 

पलाओ डाएटची संकल्पना 
Paleolithic diet, Stone Age diet, hunter-gatherer diet,  cave man diet अशा वेगवेगळ्या नावांनी हे डाएट ओळखलं जातं. साधारण १० हजार वर्षांपुर्वी मनुष्य ज्या पद्धतीचे अन्न ग्रहण करायचा, त्या पद्धतीचे अन्न घेणे हा या डाएटचा मुख्य उद्देश आहे.

दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

 कारण या आहारानुसार मानवाच्या शरीर रचनेसाठी अशाच पद्धतीचे अन्न जास्त फायदेशीर आहे, असं मानलं जातं. जगभरात हा एक वादाचा मुद्दा आहे. कारण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मानवाच्या शरीरात सातत्याने  बदल होत जातात. त्यामुळे अजूनही नविन पद्धतीचे अन्न पचविण्यासाठी मानवाच्या शरीरात निसर्गत:च काही बदल झालेले आहेत, असं हा डाएट प्रकार न मानणाऱ्या गटाचं म्हणणं आहे. फळं, भाज्या, मांसाहार, मासे, अंडी, सुकामेवा, ऑलिव्ह ऑईल, वॉलनट ऑईल या आहारात घेतलं जातं. वजन कमी करणे, रक्तदाब आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवणे या गोष्टींसाठी प्रामुख्याने पलाओ डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. 

 

पलाओ डाएटनुसार वर्ज्य पदार्थ
गहू, ओट्स, बार्ली
बीन्स, शेंगदाणे, डाळी

तुम्ही कधी खाल्लेत का पाणी- पकोडे? मास्टरशेफ पंकज भादोरिया सांगतात चटपटीत रेसिपी, खाऊन तर पहा..
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
साखर, मीठ
मका, वाटाणे, बटाटे अशा स्टार्च जास्त असणाऱ्या भाज्या
प्रोसेस केलेले सगळेच अन्नपदार्थ 

 

Web Title: South Actor Bharat Kalyan's wife Priyadarshini's death at the age of 43 due to Paleo diet??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.