Lokmat Sakhi >Health > गरोदरपणात डोहाळे लागण्याची काही भन्नाट कारणं, असे चित्रविचित्र डोहाळे लागलेच तर काय कराल?

गरोदरपणात डोहाळे लागण्याची काही भन्नाट कारणं, असे चित्रविचित्र डोहाळे लागलेच तर काय कराल?

गरोदरपणात काही पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते तर काही पदार्थांची डोक्यात तिडिक जाते.  हे असं घडण्यामागे हार्मोन्स बदल हे मुख्य कारण आहे. पहिल्या तीन महिन्यांत हे खाण्याचे डोहाळे संपतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 PM2021-05-11T16:07:25+5:302021-05-11T16:31:09+5:30

गरोदरपणात काही पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते तर काही पदार्थांची डोक्यात तिडिक जाते.  हे असं घडण्यामागे हार्मोन्स बदल हे मुख्य कारण आहे. पहिल्या तीन महिन्यांत हे खाण्याचे डोहाळे संपतात.

specific reasons behind the food cravings in pregnancy But what to do with the strange carvings happen narikaa | गरोदरपणात डोहाळे लागण्याची काही भन्नाट कारणं, असे चित्रविचित्र डोहाळे लागलेच तर काय कराल?

गरोदरपणात डोहाळे लागण्याची काही भन्नाट कारणं, असे चित्रविचित्र डोहाळे लागलेच तर काय कराल?

Highlights शरीराला जीवनसत्वं आणि खनिजांची गरज तयार झालेली असते.गरोदरपणात  ग्लायसेमिक इंडेक्स असणारा आहार म्हणजे ज्या अन्नातून ग्लूकोजचा चांगला पुरवठा शरीराला होईल असं अन्न खावं.बरेचदा माती, खडू, धान्यातले खडे असे खाण्याच्या गटात न मोडणार्‍या चिजा गरोदरपणी स्त्रियांना खाव्या वाटतात. याला 'पिका' म्हणतात. हे खाणं आरोग्यास अपायकारक आहे.

चहाची तल्लफ येते असं आपण म्हणतो, तसं कधीकधी विशिष्ट पदार्थांबाबतीतही प्रचंड आसक्ती वाटते. गरोदर स्त्रियांना बर्‍याचदा असं ‘फूड क्रेव्हिंग’ जाणवतं . गरोदर स्त्रीला तिच्या आणि तिच्या होणार्‍या बाळाच्या वाटचं खायचं असतं. हा मुद्दा लक्षात घेऊन अन्नाचं प्रमाण आणि त्यातील पोषक मूल्यांचं प्रमाणही ठरवावं लागतं. पहिल्या तीन महिन्यांत हे खाण्याचे डोहाळे संपतात. या काळात जीभ व नाक भलतंच जोरदार काम करत असतं. तर खाण्याचं क्रेव्हिंग होणं किंवा काही वासांबाबतीत व पदार्थांबाबतीत अगदीच अनिच्छा तयार होण्याबद्दल आता काही जाणून घेऊया.


फूड क्रेव्हिंग

नेहमीचं जेवणखाण नको वाटतं.

- वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे पदार्थ आजमावून बघावेसे वाटतात.
- आइसक्रीम, चॉकलेट, मासे, फळं, डेअरी उत्पादनं आणि डेझर्ट्स यांच्याबाबतीतली इच्छा वाढते.
- काही पदार्थांबद्दल तिटकाराच वाटायला लागतो व काही पदार्थांच्या वासांनी डोक्यात तिडिक जाते.



असं का होतं?
- गरोदरपणादरम्यान हार्मोनल बदल प्रचंड प्रमाणात होतात.
- असंतुलित आहार
- शरीराला जीवनसत्वं आणि खनिजांची गरज तयार झालेली असते.
- बाळ वाढवण्यासाठी पोषक तत्त्वाचं पुरेसं प्रमाण आवश्यक असतं ती मागणी शरीर करतं, शिवाय चयापचयाची क्रिया वेगवान होते म्हणूनही हे घडतं.

आरोग्याला अपायकारक क्रेव्हिंग्ज
- साखरेचं प्रमाण जास्त असणारे अन्नपदार्थ, सॉफ्ट चीज, सुशी, अंड्याचा न शिजवता वापर वगैरे.
- अर्धवट शिजवलेले कोणतेही पदार्थ, विशेषत: मांस.
- सॅल्मोनेला, इ-कोलाय असणारे पदार्थ
- अल्कोहोल किंवा त्यासंबंधित कुठलेही द्रव पूर्णत: टाळावेत.

गरोदर स्त्रीला बर्‍याचदा खालील गोष्टी नकोशा वाटतात.
- अधिक प्रमाणात चहा, कॉफी.
- मांस व अंडी. कांदा, लसूण.
- काही मसालेदार जिन्नस



आरोग्यास नकोशी क्रेव्हिंग्ज कशी टाळावीत?
- संतुलित व पोषक आहार घेतला जावा याची काळजी घ्यावी.
- तीन वेळा पोटभर जेवण्यापेक्षा अन्नाची दिवसभराच्या सहा वेळेस वाटणी करून खावं.
- खूप मसालेदार, चरबीयुक्त अन्न टाळावं.
- हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं भरपूर खावी.
- जेवणात खूप अंतर ठेवू नये, फार काळ पोट रिकामं ठेवू नये. अती खाणंही टाळावं.
- होल ग्रेन्स, भाजलेले पदार्थ यातून एकाची निवड करावी.
- कडधान्यं, विविध तर्‍हेच्या खिरी अथवा लापशी खाण्यात असू द्यावी.
- शांत स्वस्थ झोप घ्यावी. झोप अपुरी असणार्‍या गरोदर स्त्रियांकडून जंक फूड खूप खाल्लं जातं.
- ग्लायसेमिक इंडेक्स असणारा आहार म्हणजे ज्या अन्नातून ग्लूकोजचा चांगला पुरवठा शरीराला होईल असं अन्न खावं.

बरेचदा माती, खडू, धान्यातले खडे असे खाण्याच्या गटात न मोडणार्‍या चिजा गरोदरपणी स्त्रियांना खाव्या वाटतात. याला 'पिका' म्हणतात. हे खाणं आरोग्यास अपायकारक आहे. जर अशा खाण्याची उबळ खूपच असेल तर चांगले डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ गाठावेत व त्यांच्या सल्ल्यानं संतुलित व पोषक आहाराचं नियोजन करावं. तसं झाल्यास अशी विचित्र ‘क्रेव्हिंग्ज’ टाळता येतात.

Web Title: specific reasons behind the food cravings in pregnancy But what to do with the strange carvings happen narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.