पनीर-डाळ-सुकामेवा सगळं खा, पण ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय कराल? सिक्रेट सांगतो, अल्कलाइन पाणी प्या. त्यानं बॅलन्स साधला जाईल. आपण जे खातो ते ॲसिडिक असते. भाजी मात्र अल्कलाइन. शरीरात उत्तम रक्ताभिसरण हवं, अंगदुखी, डोकेदुखी, ॲसिडिटीचा त्रास नको तर अल्कलाइन पाणी प्यायला हवं!’ आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर सांगतात निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक सोपा गुरु मंत्र(Sri Sri Ravi Shankar explain the benefits of Alkaline Water).
आता हे अल्कलाइन पाणी नक्की काय असतं?
खरंतर अल्कलाइन डाएटमुळे शरीरातील पीएच लेव्हल संतुलन होते. ताजी फळे आणि ताज्या भाज्या अल्कलाइन डाएटसाठी महत्त्वाच्या. डेअरी प्रॉडक्ट्स, गोड पदार्थ, चहा, कॉफी हे टाळणं उत्तम. ॲसिडिटीही त्यानं कमी होते.
मुठभर शेंगदाणे गुळाच्या खड्यासह खाण्याचे ५ फायदे, आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा
अल्कलाइन पाणी तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात काकडीच्या फोडी व लिंबूच्या फोडी घालून रात्रभर झाकून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. त्यात आपण सैंधव मीठ देखील घालू शकता. हे पाणी जेवल्यानंतर दोन तासांनी प्या.
अल्कलाइन पाण्यामुळे शरीर डिटॉक्सीफाय होते सामान्य पाण्यातील पीएच स्तर ६ ते ७ च्या दरम्यान असते. तर अल्कलाइन वॉटरचा पीएच स्तर जवळपास ८.८ असते.
१ चमचा अळशी - चमचाभर दालचिनी पावडर, उपाय २ -बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी
अल्कलाइन वॉटरमुळे वजन कमी होते. वजन व बॅड कोलेस्टेरॉलही कमी होते.