Lokmat Sakhi >Health > दातांना किड लागली? ४ उपाय, दातदुखी-हिरड्यांची सूज होईल कमी, दात राहतील ठणठणीत

दातांना किड लागली? ४ उपाय, दातदुखी-हिरड्यांची सूज होईल कमी, दात राहतील ठणठणीत

Teeth Cavity Remedies (dat kidane upay) : दातांनी किड लागल्यामुळे तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:25 PM2023-10-05T17:25:00+5:302023-10-06T11:52:24+5:30

Teeth Cavity Remedies (dat kidane upay) : दातांनी किड लागल्यामुळे तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Teeth Cavity Remedies : Four Home Remedies for get rid of cavity | दातांना किड लागली? ४ उपाय, दातदुखी-हिरड्यांची सूज होईल कमी, दात राहतील ठणठणीत

दातांना किड लागली? ४ उपाय, दातदुखी-हिरड्यांची सूज होईल कमी, दात राहतील ठणठणीत

स्वच्छ दात फक्त दिसायलाच चांगले दिसत नाही, तर यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो.  पिवळे दात, किड लागलले दात दिसायला चांगले दिसत नाहीत. याशिवाय दातदुखीचा खर्च वाढतो ते वेगळं. दातांमध्ये खड्डे तयार होतात. (Teeth Cavity Remedies) दातांनी किड लागल्यामुळे दात आतून पोकळ होतात. दातांनी किड लागल्यामुळे तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. टूथ कॅव्हिटीमुळे दात खराब होतात. दात किडू नयेत यासाठी काही सोपे उपाय पाहूया. ( Four Home Remedies for get rid of cavity)

मिठाचं पाणी

दातांमधील किड आणि वेदना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दूर होतात आणि कॅव्हिटीमधील चिकटपणा दूर होतो. मिठाचं पाणी एसिड दूर करून तोंडाचे पीएच लेव्हल सामान्य ठेवते. 

पोट सुटलंय, व्यायामाला वेळ नाही? बेडवर पडल्या पडल्या ३ योगासनं करा-पोट होईल एकदम फ्लॅट

लसूण

भारतीय स्वयंपाकघरात लसणाला फार महत्व आहे.  पदार्थाची चव वाढवण्यासाठी लसूण फायदेशीर मानला जातो. आरोग्यासाठी लसूण अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. यात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लसूण एखाद्या पेनकिलरप्रमाणे काम करतो. ज्यामुळे दातांतील किड दूर होते. 

लिंबू

लिंबू व्हिटामीन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. यातील एसिड जंतूंना मारून वेदना कमी करण्यात गुणकारी ठरतो. तोंडात लिंबाचा तुकडा ठेवून हा तुकडा चघळा त्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करता.  या उपायाने दातदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो.

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात... 

लवंग

लवंगाने फफक्त कॅव्हिटीज दूर होत नाहीतर अनेक ओरल प्रोब्लेम्सही दूर होतात यात एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे वेदना कमी करण्यास मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर करून तुम्ही दातांची किड काढून टाकू शकता.

दात किडू नयेत यासाठी काय करावे? (Ways to Prevent Tooth Decay Naturally)

१) खूप जास्त चॉकलेट्स, साखर, गूळ असलेले पदार्थ  खाणं टाळा

२) रोज दोनवेळा ब्रश करा. लहान मुलांनाही या सवयी लावा.

३) जास्त गरम किंवा थंड पदार्थ खाऊ नका यामुळे दात अधिक सेंसिटिव्ह होतात.

४) फास्ट फूड किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. दातांना पुरेपूर पोषण मिळेल असे पदार्थ खा.

५) दातांना किड लागणं, दात पिवळे होणं अशा कोणत्याही समस्या उद्भवल्यास आधी तज्ज्ञांशी संपर्क साधा.
 

Web Title: Teeth Cavity Remedies : Four Home Remedies for get rid of cavity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.