Lokmat Sakhi >Health > चष्म्याचा नंबर वाढतोय, नजर धूसर झाली? आचार्य बालकृष्ण सांगतात खा ' हे ' १ ड्रायफ्रूट रोज

चष्म्याचा नंबर वाढतोय, नजर धूसर झाली? आचार्य बालकृष्ण सांगतात खा ' हे ' १ ड्रायफ्रूट रोज

The Amazing Vision Benefits of Walnuts : 'या' एका ड्रायफ्रूटमुळे नजर तेज, वेट लॉस आणि शुगरही राहील नियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 05:33 PM2024-10-13T17:33:26+5:302024-10-13T17:35:16+5:30

The Amazing Vision Benefits of Walnuts : 'या' एका ड्रायफ्रूटमुळे नजर तेज, वेट लॉस आणि शुगरही राहील नियंत्रित

The Amazing Vision Benefits of Walnuts | चष्म्याचा नंबर वाढतोय, नजर धूसर झाली? आचार्य बालकृष्ण सांगतात खा ' हे ' १ ड्रायफ्रूट रोज

चष्म्याचा नंबर वाढतोय, नजर धूसर झाली? आचार्य बालकृष्ण सांगतात खा ' हे ' १ ड्रायफ्रूट रोज

आजकालच्या खराब जीवनशैली आणि लाईफस्टाईलमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो (Health Tips). शिवाय कमी वयातच चष्मा लागण्याची समस्या निर्माण होते. याशिवाय स्क्रीन टायमिंग वाढल्यामुळेही डोळे कमकुवत होतात (Screen Timing). अनेकांना लहानपणापासूनच डोळ्यांना चष्मा लागतो (Vision Benefits). चष्मा लागल्यानंतर डोळ्यांचे आजारही वाढतात. मोतिबिंदू किंवा ग्लुकोमा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी वेळीच लक्ष द्यायला हवं.

नजर चांगली व्हावी यासाठी, आपण ड्रायफ्रुट्स खातो. आयुर्वेदिकनुसार नजर तीक्ष्ण करण्यासाठी अक्रोड खाणं गरजेचं आहे. आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, जर आपल्याला नजर तीक्ष्ण करायची असेल तर, अक्रोड खाणं सुरु करा. अक्रोडमध्ये फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते'(The Amazing Vision Benefits of Walnuts).

अक्रोड खाण्याचे इतर फायदे

- नजर दीर्घकाळ तीक्ष्ण ठेवण्यासाठी आपण रोज अक्रोड खाऊ शकता. अक्रोड खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते. अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

- नियमित अक्रोड खाल्ल्याने स्किन तुकतुकीत आणि केसांनाही मजबुती मिळते.

- अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषकतत्त्वे मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते. नियमित अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.

- ज्या लोकांच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची प्रमाण जास्त आहे. त्यांनी नियमित अक्रोड खावे.

- अक्रोडमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळते. जे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

- अक्रोडमध्ये फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. नियमित ३-४ अक्रोड खाल्ल्याने टाईप - २ मधुमेहाचा धोका टळतो.

- वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अक्रोड खाऊ शकता. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. ज्यामुळे भुकेवर नियंत्रण राहते. आणि शरीराला पूर्णपणे उर्जा मिळते. 

Web Title: The Amazing Vision Benefits of Walnuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.