Lokmat Sakhi >Health > जेवण करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, योग शिक्षक सांगतात २ गोष्टी टाळायलाच हव्या, कारण..

जेवण करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, योग शिक्षक सांगतात २ गोष्टी टाळायलाच हव्या, कारण..

The Do's and Don'ts of Healthy Eating : जेवण करण्याची योग्य पद्धत कोणती, आपल्या शरीरावर जेवणाचा कोणत्या पद्धतीने परिणाम होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 02:54 PM2023-10-01T14:54:57+5:302023-10-01T14:56:55+5:30

The Do's and Don'ts of Healthy Eating : जेवण करण्याची योग्य पद्धत कोणती, आपल्या शरीरावर जेवणाचा कोणत्या पद्धतीने परिणाम होतो

The Do's and Don'ts of Healthy Eating | जेवण करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, योग शिक्षक सांगतात २ गोष्टी टाळायलाच हव्या, कारण..

जेवण करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, योग शिक्षक सांगतात २ गोष्टी टाळायलाच हव्या, कारण..

Highlightsजेवताना आपल्याकडून अशा काही चुका घडतात, ज्यामुळे आपले वजन तर वाढतेच शिवाय अन्य गंभीर आजार देखील निर्माण होतात.

जेवण आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळ, दुपार आणि रात्र या तीन सत्रात आपण जेवतो. काही लोकं वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता किंवा रात्रीचं जेवण स्किप करतात. किंवा जेवताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे आपले वजन तर वाढतेच शिवाय अन्य गंभीर आजार देखील निर्माण होतात.

जेवताना नकळत घडणारी चूक कोणती? जेवण करण्याची योग्य पद्धत कोणती? यासंदर्भातील माहिती योग शिक्षक आशिष चौधरी यांनी दिली आहे. त्यांच्या मते, जेवण करताना प्रत्येकांनी ६ गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यासह २ गोष्टी टाळायलाच हव्या(The Do's and Don'ts of Healthy Eating).

जेवण गरम असतानाच करावे

जेवण नेहमी ताजे असावे, व गरमच जेवण करावे. थंड करून कधीच अन्न जेवू नये. गरम अन्नआरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासह गरम अन्न खाल्ल्याने शरीराला पौष्टीक घटक मिळतात.

तेलकट-तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी का प्यावे? त्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते की वाढते?

पोर्शन कण्ट्रोल

अन्न नेहमी योग्य प्रमाणात खायला हवे. जितकी भूक आहे, तितकेच खावे. भूक क्षमली तर, अतिरिक्त खाऊ नये. जर जास्त प्रमाणात खाल्लात तर पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे ५० टक्के अन्न आणि २५ टक्के लिक्विड पदार्थ खावे. उर्वरित २५ टक्के पोट पचनासाठी खाली ठेवा.

पचन

जेवणाची वेळ पाळणे गरजेचं आहे. जेवणाच्यामध्ये वेळेचे अंतर असावे. म्हणजे आधीचे अन्न पचल्यानंतरच खावे. पूर्वीचे अन्न पचण्याआधीच जर एखाद्या व्यक्तीने अन्न खाल्ले तर, अनेक आजार उद्भवू शकतात.

बसूनच जेवण करा

योगशिक्षक आशिष यांच्या मते, 'आपण कुठे बसून जेवण करत आहोत, हे देखील पाहणे गरजेचं आहे. आनंददायी आणि तणावमुक्त वातावरणात आपण आहार घेत असाल तर, शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. तणावाखाली जेवण करणे टाळावे.

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

घाईत कधी जेवू नये

घाईघाईत कधी जेवू नये. असे केल्याने अन्न चुकीच्या पद्धतीने शरीरात प्रवेश करते. घाईघाईने अन्न खाल्ल्याने वात वाढून पचनावर परिणाम होतो.

अन्न पौष्टीक असावे

आयुर्वेदानुसार, आहारात सहा रसांचा समावेश असतो. आणि आपल्या आहारात या ६ रसांचा समावेश आहे की नाही याची खात्री करावी. यासह पौष्टीक अन्न खावे.

जेवताना टाळा २ चुका

योग शिक्षक सांगतात की, 'आपण जे खात आहोत ते पुढील २० मिनिटांत आपल्या शरीराचा एक भाग बनतो. म्हणून, जेवताना कधी बोलू नका, खाताना हसू नका. अन्न व्यवस्थित चावून खा.

Web Title: The Do's and Don'ts of Healthy Eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.