Lokmat Sakhi >Health >  गरोदरपणात होतात हे 7 मानसिक-शारीरिक बदल. घाबरुन न जाता हे बदल कसे हाताळाल..

 गरोदरपणात होतात हे 7 मानसिक-शारीरिक बदल. घाबरुन न जाता हे बदल कसे हाताळाल..

गरोदरपणात शरीरातील बदलांमुळे स्त्रिया घाबरतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे बदल स्वाभाविक असतात. हे बदल धीरानं आणि समंजसपणे समजून घ्यायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:05 PM2021-06-18T15:05:21+5:302021-06-18T16:00:38+5:30

गरोदरपणात शरीरातील बदलांमुळे स्त्रिया घाबरतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे बदल स्वाभाविक असतात. हे बदल धीरानं आणि समंजसपणे समजून घ्यायला हवेत.

These 7 mental-physical changes occur in pregnancy. How to handle this change without panic .. |  गरोदरपणात होतात हे 7 मानसिक-शारीरिक बदल. घाबरुन न जाता हे बदल कसे हाताळाल..

 गरोदरपणात होतात हे 7 मानसिक-शारीरिक बदल. घाबरुन न जाता हे बदल कसे हाताळाल..

Highlights गरोदरपणात स्तनांचा आकार बदलतो.गरोदरपणात अनेक महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो.गरोदरपणात शरीरात हार्मोन्स बदलतात. त्यांच्यात असंतुलन निर्माण होतं. त्याचा परिणाम त्वचेवर होतो.


आपलं शरीर निसर्गनियमानुसार वागतं. या नियमाप्रमाणे शरीरात बदल होणं स्वाभाविक आहे. ते प्रत्येकाच्या शरीरात होतात. पण गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात एका मागोमाग बदल होतात. हे असं का होतंय? हे बदल कायम स्वरुपी आहेत की तात्पुरते या प्रश्नानं अनेकजणी वैतागतात. शरीरातील बदलांमुळे घाबरतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे बदल स्वाभाविक असतात. गरोदरपणाच्या आधी किंवा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच जर आपल्या शरीरात या अवस्थेत होणारे बदल नीट समजून घेतले तर या बदलांना गरोदर स्त्री धीरानं आणि समंजसपणे सामोरी जाते.

 

गरोदरपणात शरीरात काय बदल होतात?

  1. गरोदरपणात स्तनांचा आकार बदलतो. वाढणारे स्तन बघून अनेकींना चिंता वाटते ती स्तन बेढब होणाची. पण या अवस्थेत स्तनांचा आकार वाढणं स्वाभाविक आहे. गरोदरपणात एक एक टप्पा जसं पुढे जाऊ तसा गर्भातल्या बाळाचा विकास होतो. त्याचा परिणाम म्हणून स्तनांचा आकार वाढतो. गरोदरपणात महिलांचे स्तन स्तनपानासाठी विकसित होत असतात त्यामुळे त्यांचा आकार बदलणं स्वाभाविक आहे. तसेच स्तनांवर आणि स्तनांच्या टोकावर खाजही येते. ही खाजही गरोदरपणातील नैसर्गिक बदल असतो.
  2.  व्हेरीकोज व्हेन्स हा एक आजार आहे. या आजारात पायांच्या नसांमधे रक्त जमा होतं. पाय सूजतात आणि चालणं फिरणं अवघड होतं. गरोदरपणात अनेक महिलांना हा त्रास होऊ शकतो. या अवस्थेत गर्भाशयाचा आकार वाढतो. त्याचा परिणाम म्हणून रक्त प्रवाहाची गती मंदावते. म्हणून नसा सुजतात. या अवस्थेत हा त्रास त्रासदायक ठरतो.
  3.  सतत लघवीला येणंही गरोदरपणतील मुख्य समस्या असते. वाढणार्‍या गर्भाचा भार मूत्राशयवर पडतो आणि सतत लघवी आल्यासारखं होतं. हा त्रास कमी करण्यासाठी जमिनीवर बसून करण्याचे ओटीपोटाचे व्यायाम करावेत. या व्यायामांनी ही समस्या बरीच कमी होते.
  4.  वजन वाढणं हे वयाच्या कोणत्याही टप्प्यात आणि अवस्थेत स्त्रियांची काळजी वाढवणारंच असतं. गरोदरपणात वजन वाढण्याची चिंता करु नये. या अवस्थेत वाढणारं वजन हे गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असतं. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीचं शरीर हे गर्भाची देखभाल करण्यासाठी सक्षम होत असतं. त्याचा परिणाम म्हणून वजन हळुह्ळु वाढतं. पण वजन झपाट्यानं वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. एका र्मयादेत वाढणारं वजन हे आवश्यक असतं. पण ते जास्त आणि वेगानं वाढत असेल तर आहारासोबतच व्यायामाद्वारे होणार्‍या शारीरिक हालचालींकडेही लक्ष ठेवावं. या अवस्थेत शरीर चालत फिरतं ठेवणं गरजेचं असतं.
  5.  गरोदरपणात शरीरात हार्मोन्स बदलतात. त्यांच्यात असंतुलन निर्माण होतं. त्याचा परिणाम त्वचेवर होतो. अनेकजणींना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येतात. पण जसं जसं गरोदरपण पुढे सरकतं तशी त्वचेसंबंधीची समस्या कमी होते. अनेकजणींची या काळात त्वचा छान दिसते. त्यावर तेज येतं. गरोदरपणात त्वचेच्या थोड्या समस्या निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण ही समस्या जर खूपच असली तर त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

6. गरोदर स्त्रीचे मूड सतत बदलत असतात. तज्ज्ञ म्हणतात या अवस्थेतला हा बदल एक सामान्य बाब आहे. गरोदरपणात महिला सतत चिडतात, तणावाखाली असतात, त्यांना पोटातल्या बाळाची , सर्व काही सुरळीत पार पडेल ना याची चिंता असते. पण एकच मूड सतत टिकून राहात नाही. कधी आनंदी वाटणं, कधी उदास वाटणं, कधी शांत राहाणं तर कधी चिडचिडणं हे मूडमधले चढ उतार सतत होत असतात. गरोदरपणात बदलणारे हार्मोन्स हे त्यामागचं कारण. हे हार्मोन्स बदल इतके तीव्र असतात की काही महिलांना या काळात नैराश्याचाही त्रास होतो. बदलणारे मूड सतत चांगला विचार करुन, आनंदी राहून, स्वत:ला कामात व्यस्त ठेवून नियंत्रित करता येतात.

7. गरोदरपणात एका जागी बसलं की उठून दुसरीकडे जाण्याचा, शरीराची हालचाल करण्याचा कंटाळा येतो. त्याचा परिंणाम पचन संस्थेवर होतो. तसेच बदलणारे हार्मोंन्सही पचन क्रियेवर प्रभाव टाकतात. त्याचा परिणाम म्हणून या अवस्थेत बध्दकोष्ठाचा त्रास होतो. पण ही समस्या त्वरीत सोडवणं आवश्यक आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करता येतात दीनचर्येत व्यायाम आणि योग यांचा समावेश करावा. आहारात तंतुमय घटक असलेले पदार्थ खावेत. याचा परिणाम पोट स्वच्छ होण्यावर होतो.

Web Title: These 7 mental-physical changes occur in pregnancy. How to handle this change without panic ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.