डोळे शरीरातील सर्व अवयवांपैकी महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांशिवाय आपण सृष्टीवरील इतर गोष्टींबाबत कल्पनाही करू शकत नाही. आजकाल वाढत्या वयात नजर कमकुवत होणं खूपच कॉमन झालं आहे. लहान मुलं असो किंवा तरूण मुलं, वयोवृद्ध लोक प्रत्येकाच्याच डोळ्यांवर चष्मा असतो. (How to Remove Specs Permanently) डोळे कमकुवत होऊ नयेत यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. या टिप्स तुम्ही रोजच्या जीवनात फॉलो केल्या तर चष्म्याचा नंबर कमी होईल आणि दृष्टी सुधारेल. (Tips to Protect Your Vision)
फोनपासून दूर राहा
आजकाल लोक मोबाईलमध्ये दिवसभर रिल्स बघत बसतात. गरजेपेक्षा जास्त फोन वापरल्यामुळे डोळे कमकुवत होतात. एकदम मोबाईल बघत बसल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यातून पाणी येणं, धुसर दिसणं, डोळे लाल होणं अशा समस्याही उद्भवू शकतात. कालांतराने डोळ्यांना कमी दिसू लागतं. म्हणून डोळ्यांपासून चष्मा दूर ठेवण्यासाठी कमीत कमी मोबाईल फोन वापरा.
४९ व्या वर्षी सुपरफिट दिसणाऱ्या मलायकाचं ब्युटी सिक्रेट; ३ योगासन करा-पन्नाशीत विशीतले दिसा
हेल्दी आहार
डोळे चांगले ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं असतं. व्हिटामीन ए, फॅटी एसिड्स, व्हिटामीन सी, व्हिटामीन- ए यांसारख्या न्युट्रिशनयुक्त फळांचा आहारात समावेश करा. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मोतीबिंदूसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.
रोज व्यायाम करा
रोज ८ ते ९ तास तुम्ही स्क्रिनसमोर काम करत असाल तर मध्येमध्ये व्यायाम करत राहा. मानेचे व्यायाम करा, मानेची स्ट्रेचिंग करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन
चांगली झोप घ्या
मानसिक आरोग्याबरोबरच डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीही चांगली झोप घेणं गरजेचं आहे. म्हणूनच चांगली झोप घ्यायला हवी. दिवसभरात मेंदू आणि डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासााठी रात्री झोप घेणं गरजेचं आहे.
नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल
डोळे रोज स्वच्छ आणि साफ ठेवा. दिवसातून २ ते ३ वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. ऊन्हात जाताना चश्मा लावायला विसरू नका. डोळे चांगले राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, सिजनल फळांचा समावेश करा. लॅपटॉपचा वापर करताना प्रकाशात बसा. डोळ्यात कचरा, धुळीचे कण गेल्यास बोटांनी डोळे चोळू नका.