दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे दातांच्या सर्वाधिक समस्या उद्भवतात. दात किडले असतील आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले त्रास अधिक वाढत जातो. (Oral Health Tips) दातांमध्ये वेदना होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, दात पिवळे पडणं, तोंडातून दुर्गंध येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा स्थितीत दातांची किड आणि कॅव्हिटीजपासून तुम्ही त्रस्त असाल तर काही पदार्थांचा टिथ केअर रूटीनमध्ये समावेश करून दातांची किड आणि पिवळेपणा सहज दूर करू शकता. या पदार्थांच्या वापराचा कमालीचा परिणाम दातांवर दिसून येतो. (Tooth Cavity Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity)
ओशन डेंटलच्या अहवालानुसार बेकिंग सोडा, व्हिनेगर, यांसारखी उत्पादनं दात स्वच्छ करण्यासाठी उत्तम ठरतात हे अजूनही पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. दातांची कीड काढून टाकण्यासाठी नियमित दातांची तपासणी करा. फ्लोराईट टुथपेस्टनं दिवसांतून दोनवेळा दात घासा. दात स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंग किंवा इंटरडेंटर ब्रश वापरा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दंत वैद्यांना नियमित भेटा. कमी साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
दातांची किड काढून टाकण्याचे उपाय
१) लसूण
दातांची किड कमी करण्यासाठी आणि या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. दातांची किड लसणाच्या एंटीबायोटीक आणि एंटी इफ्लेमेटरी गुणांमुळे कमालीचा परिणाम दाखवतात. यामुळे इन्फेक्शन कमी होते. लसूण बारीक करून त्यात मीठ मिसळा नंतर ही पेस्ट दातांना काहीवेळासाठी लावून ठेवा नंतर तोंड स्वच्छ पाण्यानं धुवा.
२) लवंगाचे तेल
फक्त लसूणंच नाही तर लवंगाचे तेल सुद्धा दातांची किड रोखण्याचे काम करते. एनेस्थेटिक आणि एंटी बॅक्टेरिअल गुणांमुळे लवंगाचे तेल नर्व्हसना आराम देतं. मांसपेशी काही वेळासाठी सुन्न करते. ज्यामुळे दात दुखीच्या वेदनांपासून त्वरीत आराम मिळतो.
सतत आंबट करपट ढेकर येतात-पित्त खवळतं? ४ उपाय- पित्ताने होणारा त्रास चटकन कमी-पोटही होईल साफ
३) मीठाचे पाणी
नॅच्युरल एंटीसेप्टीकप्रमाणे मीठाचे पाणी तुम्ही वापरू शकता. मीठाचे पाणी दातांची किड दूर करते. सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा भरून मीठ घाला नंतर या पाण्याने काहीवेळानं गुळण्या करा. ज्यामुळे दातांची चांगली सफाई होईल आणि दातांची किड कमी होण्यास मदत होईल.
लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी
४) हळदीची पेस्ट
दातांची किड दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीची पेस्ट तयार करण्यासाठी थोडी हळद पाण्यात किंवा मोहोरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट वापरून दात स्वच्छ करा. एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे दात स्वच्छ होतात आणि किड निघून जाण्यास मदत होते. औषधी गुणांनी परीपूर्ण हळद वेदना कमी करण्यास मदत होते.