शरीर निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी चांगली लाईफस्टाईल गरजेची असते. पण अनेकदा झोपताना, बसता उठताना केलेल्या केलेल्या चुका शारीरिक आजाराचं कारण ठरतात. चुकीच्या पद्धतीनं झोपल्यानं पोटात गॅस तयार होणं, छातीत जळजळ, आंबट ढेकर येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. डॉ. जितेन शर्मा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना कोणत्या आजारापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीनं झोपावे याबाबत सांगितले आहे. (Right way to sleep for get relief from waist and back pain which disease)
छातीत जळजळ
जर तुम्हाला छातीत जळजळ एसिडीटी किंवा गॅसचा त्रास होत असेल तर एका कुशीवर झोपा. उशी थोडी उंचावर ठेवा जेणेकरून गॅस खालच्या बाजूला जाईल याशिवाय एसिड रिफ्लेक्सची समस्याही उद्भवणार नाही. या पद्धतीनं झोपल्याने छातीत जळजळ होणं, एसिड रिफ्लेक्स या समस्या दूर होतात.
पोटदुखी
पोटात दुखण्याची समस्या उद्भवत असेल तर पाठीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरते. यादरम्यान डोकं वरच्या बाजूला ठेवा. या उपायानं पोटदुखी कमी होते. काहीवेळानंतर ब्लोटिंगसुद्धा कमी होतं.
व्हॅरिकोज व्हेन्स
व्हेरिकोज वेन्सची समस्या उद्भवल्यास ब्लड वेसल्सवर ताण येतो. अशा स्थितीत तुम्ही पायाच्या खाली उशी ठेवायला हवी. असं केल्यानं ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि सूज, जळजळही कमी होते.
हाय बीपी
हाय बीपी ची समस्या उद्भवल्यास शरीर लूज पडते. यामुळे आरोग्याचे नुकसान होते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या पायांखाली उशी ठेवून झोपू शकता यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते, बीपी नियंत्रणात राहतो आणि हार्टवर अतिरिक्त दबावही येत नाही.
सायटिका पेन
सायटिका पेन होण्याचे मुख्य कारण पेशींमधला कोरडेपणा असू शकतो. याव्यतिरिक्त हाडांमध्ये वेदना जाणवतात. अशी समस्या उद्भवल्यास पायांमध्ये उशी ठेवा. यामुळे वेदना कमी जाणवतात आणि शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळतो.
प्रत्येक व्यक्तीचं स्लीप पॅटर्न वेगवेगळं असं. स्लिपिंग पोजिशन वेगवेगळी असते. यात पोटाची स्थिती, फ्री फॉल पोझिशन, शोल्डर पोझिशन, यॉर साईड पोजिशनचा समावेश असतो. जास्तीत जास्त लोक या स्थितीत झोपणं पसंत करतात. वास्तविक , एका कुशीवर झोपणे चांगले मानले जाते. बहुतेक लोक या स्थितीत झोपतात. म्हणूनच झोपण्याची ही योग्य स्थिती मानली जाते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रख्यात संशोधक विल्यम डिमेंट यांना झोपेवरील संशोधनात असे आढळून आले की सुमारे 54% लोक एका कुशीवर झोपणं पसंत करतात. या संशोधनासाठी त्यांनी 664 लोकांचा अभ्यास केला, त्यापैकी 54% कुशीवर, 33% पाठीवर आणि 7% लोक सरळ झोपले होते.