कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांमध्ये ऑक्सिनजनची कमतरता असल्याचं दिसून येत आहे. ऑक्सिजनजची कमतरता दूर करण्यासाठी काय करता येईल याचे पर्याय लोक शोधत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात स्वतःला आणि कुटुंबियांना निरोगी ठेवण्यासाठी ऑक्सिजन युक्त पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.
जर तुम्ही शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहार घेत असाल तर लक्षात घ्या तुमच्या आहारात 80 टक्के अल्कलाईननं भरपूर असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असायला हवा. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा स्थर वाढण्यास मदत होईल. इतकंच नाही तर तुम्हाला ताजंतवानंही वाटेल. रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अल्कलाईनयुक्त आहाराचे फायदे
रक्तप्रवाहात ऑक्सिजनचा स्तर वाढवण्यास मदत होते.
लॅक्टिक एसिड जास्त प्रमाणात निर्माण होत नाही.
शरीरातील विविध कार्यांना प्रोत्साहन मिळतं.
पीएच लेव्हल सामान्य ठेवण्यात मदत होते.
अवयवांची कार्यक्षमता वाढते.
सकाळचा नाष्ता
अननस, पपई, मनुके या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. सकाळच्या नाष्त्याला अशा पदार्थांच्या सेवनाने ऑक्सिजनची पातळी वाढवली जाऊ शकते. या सर्व पदार्थांचे पीएच मूल्य 8.5 आहे. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे अ, बी आणि सीसह अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहेत. यामुळे, रक्तप्रवाह नियंत्रित करून रक्तदाब कमी करता येतो.
लिंबू
लिंबू हे ऑक्सिजन समृद्ध अन्न आहे. सहसा ते अम्लीय असते, परंतु त्याचे सेवन केल्यावर ते शरीरात जाते आणि अल्कलाईनमध्ये बदलते. खोकला, सर्दी, फ्लू, हार्ट बर्न आणि व्हायरस संबंधित आजारांकरिता हे खूप फायदेशीर आहे. यकृतासाठी हे सर्वोत्कृष्ट टॉनिक मानले जाते.
कलिंगड
कलिंगड सहसा सर्वजण खातात, परंतु बहुतेक लोकांना हे ठाऊक नसते की हे खाल्ल्याने रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पूर्ण होते. हे फळ 9 च्या पीएच मूल्यासह सर्वाधिक अल्कलाईन आहे. त्यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण ९२टक्के असतं. कलिंगडामध्ये फॅट आणि कॅलरीज अजिबात नसतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कलिंगड हे एक वरदान आहे. कलिंगडात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. व्हिटॅमिन बी ६ मुळे शरीरात लाल पेशी वाढण्यास मदत होते. तसेच अँटीबॉडीजचीही वाढ होते.
पपई
पपईमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ चे प्रमाण मुबलक असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. पपईचे काप खाल्ल्यास त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात. यामुळे रक्तातील पोषक घटकांची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.
गाजर
रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी गाजर, खजूर, मनुका, बेरी, केळी, लसूण, भाज्या किंवा कोशिंबीर खाणे आवश्यक आहे. वास्तविक, हे सर्व पदार्थ भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्सनी समृद्ध असतात, म्हणून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचे पीएच मूल्य 8 आहे.
ढोबळी मिरची
त्याचे पीएच मूल्य 8.5 आहे. जीवनसत्त्व ‘अ’ समृद्ध ढोबळी मिरची आपल्याला रोगांशी लढण्यास आणि तणाव निर्माण करणार्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. इतकेच नाही तर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ गुणधर्मांमुळे, इंडोक्राईन सिस्टिमसाठी हे खूप फायदेशीर आहे. या प्रकारच्या पदार्थाच्या सेवनानं रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते.