Lokmat Sakhi >Health > खाज, व्हजायनल इंफेक्शन टाळता येईल; फक्त इनरवेअर्सची निवड करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

खाज, व्हजायनल इंफेक्शन टाळता येईल; फक्त इनरवेअर्सची निवड करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Vaginal infection preventions : बॅक्टेरियांची वाढ जास्त प्रमाणात झाल्यानंतर यूटीआई (Urinary tract infection) या आजारांचा सामना करावा लागतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:49 PM2021-05-25T16:49:25+5:302021-05-25T17:36:06+5:30

Vaginal infection preventions : बॅक्टेरियांची वाढ जास्त प्रमाणात झाल्यानंतर यूटीआई (Urinary tract infection) या आजारांचा सामना करावा लागतो. 

Vaginal infection preventions : Underwear rules to live by for a healthy vagina | खाज, व्हजायनल इंफेक्शन टाळता येईल; फक्त इनरवेअर्सची निवड करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

खाज, व्हजायनल इंफेक्शन टाळता येईल; फक्त इनरवेअर्सची निवड करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Highlightsजे लोक आपले इनरवेअर्स व्यवस्थित साफ करत नाहीत, ओलसर इनरवेअर्सचा वापर करतात त्यांच्या कपड्यांमध्ये किटाणू वाढण्याचा धोका असतो. महिलांनी फक्त फॅशन आणि ट्रेंडच नव्हे तर त्यांचे आरोग्य ध्यानात ठेवून इनरवेअरची निवड करावी. नायलॉन किंवा मिक्स कॉटनची फॅन्सी इनरवेअर्स निवडण्यापेक्षा सुती कापडाचे आरामदायक  इनरवेअर्स खरेदी करणे चांगले आहे.

महिलांमध्ये युटीआय आणि वजायनल इंफेक्शनचा आजार उद्भवणं खूप सामान्य गोष्ट आहे. पण मासिक पाळी दरम्यान हा आजार उद्भवल्यास तीव्र त्रासाचा सामना करावाा लागू शकतो. प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता ठेवून तुम्ही अशा आजारांना लांब ठेवू शकता. जे लोक आपले इनरवेअर्स व्यवस्थित साफ करत नाहीत, ओलसर इनरवेअर्सचा वापर करतात त्यांच्या कपड्यांमध्ये किटाणू वाढण्याचा धोका असतो. बॅक्टेरियांची वाढ जास्त प्रमाणात झाल्यानंतर यूटीआई (Urinary tract infection) या आजारांचा सामना करावा लागतो. 

स्वच्छतेचा विचार करून इनरवेअर्स निवडा

महिलांनी फक्त फॅशन आणि ट्रेंडच नव्हे तर त्यांचे आरोग्य ध्यानात ठेवून इनरवेअरची निवड करावी. नायलॉन किंवा मिक्स कॉटनची फॅन्सी इनरवेअर्स निवडण्यापेक्षा सुती कापडाचे आरामदायक  इनरवेअर्स खरेदी करणे चांगले आहे. कारण उन्हाळ्याच्या हंगामात हे कपडे आपल्या त्वचेला श्वास घेण्यास पूर्ण संधी देतात. आपल्या शरीरातून घाम शोषून घेतात. चिकटपणापासून आपले रक्षण करते. हवा या कापडातून आत जाते आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

गरोदरपणात अशा अंडरवेअर्स घाला

आपण गर्भवती असल्यास गर्भधारणेदरम्यान आपण कॉटन ब्रा आणि पँटीज निवडा. यामुळे आपल्याला पुरळ आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवणार नाही. जर गरमीमुळे आपल्याला खाज सुटणे आणि लाल रंगाच्या पुळ्यांची समस्या येत असेल तर सूती कापडाचा भाग त्यावर मात करण्यास मदत करेल. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे काही महिलांना गरोदरपणात स्तनामध्ये देखील खाज सुटण्याची समस्या उद्भवते. हे टाळण्यासाठी सूती ब्रा खूप उपयुक्त आहेत.

शरीराचे नाजूक भाग स्वच्छ ठेवा

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, महिलांनी दिवसातून कमीतकमी दोनदा योनीतून स्वच्छ केले पाहिजे. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीला वाढायला वेळ मिळत नाही. धुऊन स्वच्छ अंडरगारमेंट्स दोन्ही वेळा परिधान केले पाहिजेत. हे लक्षात ठेवा की आपले आतील कपडे फार घट्ट नसावेत. यासह, जर आपण रात्री झोपायला जाण्यापूर्वी मेडिकेटेड वॉशनं आपले खाजगी भाग स्वच्छ केले तर ते आणखी चांगले होईल.

दिसू शकतात ही लक्षणं

उष्णतेमुळे, घाम येणे खूप आहे आणि यामुळे खाज सुटणे, संसर्ग होणे, स्त्राव होणे यासारख्या समस्या उद्भवणे खूप सामान्य आहे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्वच्छतेची काळजी घ्या आणि अधिकाधिक द्रव आहार घेत राहा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ऑफिस जात असलेल्या स्त्रियांना  आणखी काही अडचणींचा सामना करावा लागतो. कारण सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने योनीचे इन्फेक्शन होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. म्हणूनच, त्यांनी त्यांच्या स्वच्छतेबद्दल अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

वेजियानिसचं कारण असू शकते प्रेंग्नेंसी

जर तुमचे पिरिएड्स मिस झाले असतील तर लगेचच प्रेंग्नेंसी टेस्ट करायला हवी. कारण या दरम्यान वजायनल सीक्रेशन वाढू शकते. अशा स्थितीत में वेजिनाइटिस (वजाइनल इंफेक्शन) वाढण्याचा धोका असतो. म्हणून वजानल भाग नेहमी मेडिकेटेड वॉशनं क्लिन करायला हवा

बॅक्टीरियल वेजिनोसिसची कारणं आणि रिस्क फॅक्टर

बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) इंफेक्शन अशावेळी होतं. जेव्हा घातक बॅक्टेरियाचे असंतुलन होते. गार्डेनेराला नावाचा बॅक्टेरिया या इन्फेक्शनचं प्रमुख कारण असतो. शरीरात या बॅक्टेरियांची वाढ झाल्यानं चांगले बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे योनीमार्गाचे पीएच संतुलन बदलते. याचाच अर्थ असा की आपण डिओड्रेंटचा जास्त प्रमाणात वापर केल्यास तुम्हाला या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

Web Title: Vaginal infection preventions : Underwear rules to live by for a healthy vagina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.