Lokmat Sakhi >Health > शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी

शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी

Vitamin B-12 Foods : व्हिटामीन बी-१२ आपल्या शरीरात स्वत: तयार होत नाही म्हणून वेगवेगळ्या आहारातून हे आपल्याला घ्यावं लागतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:31 PM2024-11-19T12:31:27+5:302024-11-19T18:45:42+5:30

Vitamin B-12 Foods : व्हिटामीन बी-१२ आपल्या शरीरात स्वत: तयार होत नाही म्हणून वेगवेगळ्या आहारातून हे आपल्याला घ्यावं लागतं.

Vitamin B-12 Foods Deficiency of vitamin B-12 weakness the body Eat this fruit daily muscles will get a lot of strength | शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी

शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी

आपल्या  शरीराला अनेक व्हिटामीन्स आणि प्रोटीन्सचा आवश्यकता असते.  व्हिटामीन बी-१२ सायनोकोबालमिन  शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फार आवश्यक आहे (Vitamin B-12 Deficiency ). हे एक वॉटर सोल्यूबल आहे आणि रेड ब्लड सेल्सचं निर्माण करण्यासाठी, नर्व्स सिस्टिम चांगली  राहण्यासाठी तसंच मेंदूसाठीही आवश्यक आहे.

व्हिटामीन बी-१२ आपल्या शरीरात स्वत: तयार होत नाही म्हणून वेगवेगळ्या आहारातून हे आपल्याला घ्यावं लागतं. शरीरात व्हिटामीन बी-१२  ची कमतरता भासल्यास अत्याधिक थकवा येणं, मांसपेशी कमकुवत होणं,  मेमरी कमजोर होणं, डिप्रेशन, मूड स्विंग्स, तणाव आणि त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Vitamin B-12 Deficiency Can Cause Many Problems Include These Fruits In Your Diet)

डॉ. निधी धवन यांच्यामते व्हिटामीन -बी १२ आपल्या शरीरातल होमोकिस्टीन नावाचे अमिनो एसिड कंट्रोल करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी फळं आणि सप्लिमेंट्सचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.

व्हिटामीन बी-१२ चे फायदे

शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी व्हिटामीन बी-१२ फार मदत करते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे एनिमिया होऊ शकतो. थकवा, कमकुवतपणा येतो. नर्व्स सेल्स निरोगी ठेवण्यासाठी न्युरोट्रांसमीटर  योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक असते. एकाग्रता वाढवण्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटामीन बी-१२ फायदेशीर ठरते.  ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या समस्याही दूर ठेवता येतात. नखं आणि स्किन चांगली राहण्यासाठी व्हिटामीन बी-12 फायदेशीर ठरते.

संत्री

रेडक्लिफ लॅबच्या रिपोर्टनुसार  संत्र्यात व्हिटामीन बी-12 बरोबरच व्हिटामीन सी असते.  ज्यामुळे इम्यून सिस्टीम चांगली राहण्यास मदत होते. शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटामीन बी-१२ आवश्यक असते. आहारात  संत्र्याचा समावेश केल्यास शरीरातल पाण्याची कमतरता भास नाही. 

हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

केळी

केळी खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. केळी हा व्हिटामीन बी-12 चा थेट सोर्स नाही पण शरीरात व्हिटामीन बी-12 शोषून घेण्यास सहाय्यक ठरतो. केळ्यात कॅल्शियम, पोटॅशियम असते. जे हाडं आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असते.

आवळा

आवळ्यात व्हिटामीन बी-12 बरोबरच व्हिटामीन  सी असते. ज्यामुळे नर्व्हस सिस्टीम मजबूत राहते. हा व्हिटामीन बी-12 चा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे इम्यूनिटी बुस्ट होण्यास मदत होते. आवळ्याचे नियमित सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

जांभूळ

शरीरात व्हिटामीन बी-12 चा स्तर  चांगला ठेवण्यासाठी जांभूळ महत्वाचा असतो. ऊन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ खाल्ल्यानं  शरीराला अनेक फायदे मिळतात.  ज्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझ्म वाढतो. डायबिटीसमध्येही याचे अनेक फायदे होतात.

Web Title: Vitamin B-12 Foods Deficiency of vitamin B-12 weakness the body Eat this fruit daily muscles will get a lot of strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.