Lokmat Sakhi >Health > हिवाळ्यात व्यायाम करायचा असं ठरवता पण जमत नाही? फक्त १० मिनिटे रोज चाला, पाहा जादू..

हिवाळ्यात व्यायाम करायचा असं ठरवता पण जमत नाही? फक्त १० मिनिटे रोज चाला, पाहा जादू..

Winter Exercise Health चालण्यासारखा उत्तम आणि अजिबात खर्चिक नसलेला व्यायाम नाही, सुरुवात तर करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 02:31 PM2022-10-31T14:31:40+5:302022-10-31T14:32:49+5:30

Winter Exercise Health चालण्यासारखा उत्तम आणि अजिबात खर्चिक नसलेला व्यायाम नाही, सुरुवात तर करा..

Want to exercise in winter but can't? Just walk for 10 minutes everyday, see the magic.. | हिवाळ्यात व्यायाम करायचा असं ठरवता पण जमत नाही? फक्त १० मिनिटे रोज चाला, पाहा जादू..

हिवाळ्यात व्यायाम करायचा असं ठरवता पण जमत नाही? फक्त १० मिनिटे रोज चाला, पाहा जादू..

सध्या हिवाळा सुरु झाला आहे. या हिवाळ्यात काही प्रमाणात आळस येतो. त्यामुळे अनेक जण स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. व्यायामशाळा असो या योगा लोकं त्याठिकाणी जाऊन व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. करायची इच्छा असते पण जमत नाही असंही काहींचं होतं.  जर, तुम्हाला व्यायामशाळेत जाऊन किंवा योगा क्लासमध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा आला असेल. तर तुम्ही जवळच्या परिसरात जाऊन १० मिनिटे वाॅक करू शकता. शरीरासाठी चालणे देखील खूप महत्वाचे आहे. चालण्याचे खूप फायदे आहेत. चालण्याने शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो. शरीरातील इतर अवयांची हालचाली होतात. जे खूप महत्वाचे आहे. दिवसातून १० मिनिटांचे वाॅक तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

हाडं मजबूत

वाढत्या वयानुसार शरीरातील हाडं कमजोर होऊ लागतात. त्यासाठी नियमित चालणे खूप गरजेचं आहे. फिजिकल ॲक्टिविटी कमी केल्याने अनेक आजारांना आपण निमंत्रित करतो. त्यामुळे आपण वयाच्या आधीच अनेक आजारांनी ग्रासले जातो. त्यासाठी चालणे खूप महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारापासून आपण बचावले जातो. त्यामुळे नियमित चालणे महत्वाचे आहे.
 

मूड  खुश 

नियमित चालणाऱ्या व्यक्तींचा चेहरा हा नेहमी हसरा असतो. दररोज चालल्याने आपल्या चेहऱ्यासह आपले हृदय देखील आनंदी राहते. चालल्याने शरीरातील रक्तपुरवठा हा योग्यरित्या चालू राहतो. सकाळी सकाळी नियमित चालल्याने फ्रेश ऑक्सीजन आपल्या शरीराला मिळते. त्यामुळे आपला पूर्ण दिवस हा आनंदित पार पडतो. त्यामुळे निदान १० ते २० मिनिटे तरी चालणे आवश्यक आहे.

आजारांपासून मुक्ती

दररोज चालल्याने लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत अनेकांना याचा लाभ मिळतो. यासह अनेक आजारांशी दोन हाथ करायला देखील खूप मदत करतो. याशिवाय कैंसर आणि कार्डियोवैस्कुलसारख्या आजारांपासून देखील काही प्रमाणात दिलासा आणि आराम मिळतो. वयोवृद्ध लोकांनी नियमित चालले पाहिजे. जेणेकरून त्यांना दीर्घायुष्य आणि इतर आजारांपासून आराम मिळेल.

वाॅक करत असतानाचे नियम

वाॅक करण्याची जागा ही आपल्या घरापासून लांब नसावी. 

वाॅक करण्याच्या आधी सोबत एक पाण्याची बाॅटल ठेवावी.

जिथे खड्डे आणि चिखल अधिक असेल तिथे चालणे टाळावे

टाईट कपडे घालू नयेत.

ज्याठिकाणी अधिक प्रदूषित हवा असेल तिथे चालणे टाळावे. जिथे फ्रेश हवा असेल तिथेच चालावे.

Web Title: Want to exercise in winter but can't? Just walk for 10 minutes everyday, see the magic..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.