Lokmat Sakhi >Health > भाजीत-पदार्थात मीठ कमी असो-नसो, तुम्ही वरुन मीठ घालूनच खाता? आरोग्यासाठी ‘असं’ करणं घातक?

भाजीत-पदार्थात मीठ कमी असो-नसो, तुम्ही वरुन मीठ घालूनच खाता? आरोग्यासाठी ‘असं’ करणं घातक?

What about adding salt on top diet tips : दिवसभरात शरीरात किती मीठ जायला हवे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 06:34 PM2024-09-25T18:34:42+5:302024-09-25T18:37:53+5:30

What about adding salt on top diet tips : दिवसभरात शरीरात किती मीठ जायला हवे याविषयी...

What about adding salt on top diet tips : Whether or not there is less salt in vegetables, do you eat them with salt on top? Is it dangerous to do that for health? | भाजीत-पदार्थात मीठ कमी असो-नसो, तुम्ही वरुन मीठ घालूनच खाता? आरोग्यासाठी ‘असं’ करणं घातक?

भाजीत-पदार्थात मीठ कमी असो-नसो, तुम्ही वरुन मीठ घालूनच खाता? आरोग्यासाठी ‘असं’ करणं घातक?

मीठाशिवाय पदार्थाला चवच येत नाही हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण प्रत्येक पदार्थात शिजवताना आवर्जून मीठ घालतो. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तरच पदार्थाची रंगत वाढते. नाहीतर पदार्थ खारट होतो किंवा कमी मीठ असले तर बेचव होतो. मीठ कमी असेल तर काही जण जेवताना भातावर किंवा अन्य पदार्थांवरही वरुन मीठ घालून खातात. असे केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो असे अनेकदा सांगितले जाते  (What about adding salt on top diet tips). 

त्यामुळे घरातील जो व्यक्ती पदार्थांवर मीठ घालून खातो त्याला इतरांचा ओरडाही बसतो. अशाप्रकारे पदार्थावर वरुन मीठ घालणे आरोग्यासाठी खरंच हानीकारक असते का? वरुन मीठ घातल्याने नेमके काय होते, मीठाचे प्रमाण किती असायला हवे, सोडीयमची पातळी योग्य राखायची असेल तर काय करायला हवे याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात...

(Image : Google)
(Image : Google)

१. वरुन मीठ घालून खाल्ल्यावर आरोग्याला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचेल हे कितपत खरे आहे. याबाबत त्या म्हणतात एखादवेळी अन्नपदार्थात मीठ कमी असेल तर ते बेचव लागते. अशावेळी वरुन थोडे मीठ घातले तरी हरकत नाही. 

२. पण आपण खूप जास्त मीठाचे पदार्थ खात नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी. कारण शरीरातील सोडीयमची पातळी योग्य ठेवणे आवश्यक असल्याने त्याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे.  


३. मात्र दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घालणे उपयोगी नाही. कारण आपल्याला दिवसभर खात असलेल्या इतर पदार्थांमधूनही सोडीयम मिळते. त्यामुळे केवळ वरुन मीठ घातल्यानेच सोडीयम मिळते असे नाही. म्हणूनच मीठाचा वापर योग्य त्या प्रमाणात असायला हवा. 
 

Web Title: What about adding salt on top diet tips : Whether or not there is less salt in vegetables, do you eat them with salt on top? Is it dangerous to do that for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.