Lokmat Sakhi >Health > सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा

सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा

What are the medicinal uses of Apta : हल्ली आपटा म्हणून कांचन वृक्षाची पानेही बाजारात विकली जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 03:21 PM2024-10-11T15:21:18+5:302024-10-11T15:22:28+5:30

What are the medicinal uses of Apta : हल्ली आपटा म्हणून कांचन वृक्षाची पानेही बाजारात विकली जातात.

What are the medicinal uses of Apta : Don't throw away leaves of Apta, use these leaves as they are beneficial for health | सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा

सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा

आपट्याच्या पानांना दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी विशेष महत्त्व असते. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी लहानांना ही आपट्याची पानं देतात. सोन्यासारखी भरभराट होऊदे असा आशिर्वादही त्यासोबत दिला जातो. वर्षभर या पानांकडे विशेष लक्ष दिले जात नसले तरी या दिवशी मात्र आपट्याच्या पानांना खूप भाव असतो. हल्ली आपटा म्हणून कांचन वृक्षाची पानेही बाजारात विकली जातात. मात्र त्याची योग्य ती पारख करुन मगच खरेदी करायला हवी. आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी देवाला वाहिली जातात आणि एकमेकांना दिली जातात (What are the medicinal uses of Apta) . 

ही पाने नंतर घरात इकडे तिकडे पडलेली दिसतात. मग ती एकतर निर्माल्यात जातात नाहीतर ओल्या कचऱ्यात टाकून दिली जातात. त्यामुळे ती वाया जातात. पण या पानांना आयुर्वेदात बरेच महत्त्व असून आरोग्यासाठी त्याचे भरपूर फायदे सांगितलेले आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने आणलेली ही पानं टाकून न देता त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा. त्यामुळे आपट्याचे गुणधर्म आपल्याला मिळतात आणि आरोग्याच्या विविध समस्यांवर ही पानं गुणकारी असतात. ती कशी पाहूया...

१. मधुमेहावर फायदेशीर 

(Image : Google)
(Image : Google)

मधुमेह ही सध्या मोठ्या प्रमाणात आढळणारी समस्या आहे. आपट्याची पाने मधुमेहाशी लढण्यास मदत करतात. रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. यातील काही घटक लिपिड पातळी सामान्य करण्याचे काम करते. त्यामुळे या पानांचा मधुमेहाशी संबंधित गुंतागुतींवर आणि लठ्ठपणावर उपचार म्हणून वापर केला जातो. सीरम ट्रायग्लिसराइड्स, एकूण कोलेस्टेरॉल, एलडीएल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारण्यास या पानांचा उपयोग होतो. 

२. युरीनशी निगडीत समस्या 

उन्हाळ्याच्या दिवसांत युरीनशी निगडीत समस्या भेडसावतात. ऑक्टोबर महिन्यात हवेत उष्णता जास्त असल्याने या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. युरीनला आग होणे, जळजळ होणे, युरीन खूप जास्त किंवा खूप कमी होणे अशा समस्यां उद्भवतात. आपट्याचे पान थंड प्रकृतीचे असल्याने या समस्यांवर उपाय म्हणून  या पानांचा चांगला उपयोग होतो. ही पाने भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून तो प्यायल्यास समस्या कमी होण्यास मदत होते. लघवीच्या वेळी येणारी कळ, कंड याने कमी होतो.  

३. उष्णतेचे विकार कमी होण्यास उपयुक्त 

(Image : Google)
(Image : Google)

काहींना उष्णतेमुळे तळपायाची आग होणे, सालपटे निघणे, तोंडाची आग होणे,  तोंड येणे, तोंडाला सतत कोरड पडणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपट्याच्या पानांत असतात. आपट्याच्या पानांचा रस प्यायल्यास या समस्या कमी होतात.

४. अपचनाच्या तक्रारींवर उत्तम उपाय

जुलाबाच्या समस्येमध्ये या पानांचा चांगला उपयोग होतो. तसेच बऱ्याच जणांना विविध कारणांनी पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपट्याची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. जंत, अजीर्ण यांसारख्या समस्यांवरही आपट्याच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.  
 

Web Title: What are the medicinal uses of Apta : Don't throw away leaves of Apta, use these leaves as they are beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.