Lokmat Sakhi >Health > पोट सुटलंय, मांड्या जाडजूड दिसतात? डॉक्टर सांगतात किचनमधल्या ४ पदार्थांची पावडर खा, पाहा फरक

पोट सुटलंय, मांड्या जाडजूड दिसतात? डॉक्टर सांगतात किचनमधल्या ४ पदार्थांची पावडर खा, पाहा फरक

Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss : किचनमधल्या काही पदार्थांचा वापर करून पावडर बनवून ती घेतल्यास तुम्हाला लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या आजारांपासून सुटका मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:49 PM2024-09-17T12:49:25+5:302024-09-18T17:45:37+5:30

Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss : किचनमधल्या काही पदार्थांचा वापर करून पावडर बनवून ती घेतल्यास तुम्हाला लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या आजारांपासून सुटका मिळू शकते.

What Are The Natural Treatment And Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss | पोट सुटलंय, मांड्या जाडजूड दिसतात? डॉक्टर सांगतात किचनमधल्या ४ पदार्थांची पावडर खा, पाहा फरक

पोट सुटलंय, मांड्या जाडजूड दिसतात? डॉक्टर सांगतात किचनमधल्या ४ पदार्थांची पावडर खा, पाहा फरक

आपल्या घरातील किचनमध्ये असा पदार्थ असतात ज्याच्या मदतीने आपल्या अनेक  शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. सर्दी, खोकला, पोटदुखी यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. गंभीर स्थिती उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. (Health Tips) किचनमधल्या काही पदार्थांचा वापर करून पावडर बनवून ती घेतल्यास तुम्हाला लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या आजारांपासून सुटका मिळू शकते. डॉक्टर वरूण यांच्यामते रोज फक्त १ चमचा या पावडरचे  सेवन केल्यानं अनेक आजारांपासून आराम मिळतो. (What Are The Natural Treatment And Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss)

घरच्याघरी वेट लॉसची पावडर कशी तयार करावी

घरात ही देशी पावडर बनवण्यासाठी तुम्हाला ५० ग्राम मेथी, ५० ग्राम हळद आणि ५० ग्रॅम ओवा आणि २५  ग्रॅम दालचिनी लागेल. हे सर्व पदार्थ बारीक करून एक पावडर तयार करा आणि एका डब्यात भरून ठेवा. ही पावडर रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही पाण्यात मिसळून पिऊ शकता. सकाळच्या नाश्त्यानंतर एक ग्लास पाण्यात ही पावडर मिसळून प्यायल्यानं शरीराला भरूपूर फायदे  मिळतील. याव्यतिरिक्त रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही ही पावडर प्यायलात तर चांगला परिणाम दिसून येईल. या पावडरचे सेवन १ ते २ महिने करावं लागेल.


डायबिटीस

या देशी ड्रिंकमध्ये ओव्यासह टेरपाीनिन असते जे डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत करते. हळदीत एंटी बॅक्टेरिअल तत्व असतात ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. मेथी ब्लड शुगरल नियंत्रणात ठेवण्यासह शरीराला डिटॉक्स करते. दालचिनी एंटीबायोटीक, एंटी इन्फेमेटरी एंटीऑक्सिडेंट्स गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहण्यास मदत होते. 

जर तुमच्या हाता-पायांमध्ये वेदना असतील तर तुम्ही जॉईंट पेनचा सामना करत आहात ही पावडर पाण्यात मिसळून प्यायल्यानं शरीराला आराम मिळतो. हळदीत एंटी इन्फ्लेमेटररी गुण असतात ज्यामुळे सांधेदुखीच्या वेदना आणि सुजेपासून आराम मिळतो. ओव्याच्या बिया सांधेदुखीच्या समस्यांपासून आराम देतात. मेथीतील  सेपोनिन आणि डायोसजेनिन नावाचे बायोटीक कंम्पाऊंड्स सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम देतात.
वजन कमी करण्यासाठी हे देशी ड्रिंक फायदेशीर ठरू शकतं.

हळदीत करक्यूमिन नावाचे एक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात ज्या सूजविरोधी आणि एंटीऑक्सिडेंट्स गुण असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ओव्यात थायमोल नावाचे इसेंशियल ऑईल असते ज्यामुळे वजन कमी होते. मेथीत भरपूर  फायबर्स असतात  ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि दालचिनी मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत करते ज्यामुळे शरीरात फॅट जमा होत नाहीत. 

Web Title: What Are The Natural Treatment And Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.