Lokmat Sakhi >Health > पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

Health Tips For  PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 09:43 PM2022-11-08T21:43:32+5:302022-11-08T21:44:52+5:30

Health Tips For  PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे.

What are the reasons for PCOD and PCOS? Expert's opinion about the remedies of PCOD and PCOS | पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

Highlightsडायबिटीजप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स हे या आजाराचं कारण आहे. फक्त यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे फक्त त्या स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांमध्येच असतं.

आपली जीवनशैली जशी बदलत चालली आहे, तसंतसे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. कारण रोजच्या रोज आपण अनेक चुकीच्या गोष्टी वारंवार करत आहोत. कधी आहार घेण्यात चुकतंय तर कधी व्यायामात आपण कमी पडतो. त्यामुळे मग वेगवेगळे आजार मागे लागतात, शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. फक्त स्त्रियांच्या (menstrual health issues) बाबतीत बोलायचं झाल्यास पीसीओडी आणि पीसीओएस हे त्यापैकीच काही आजार आहेत. सध्या महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळेच हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करावं (reasons for PCOD and PCOS), याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी The Mindful Diet या यु ट्यूब पेजवर दिलेली ही खास माहिती. 

 

पीसीओडीचा त्रास होण्यामागची कारणं
डायबिटीजप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स हे या आजाराचं कारण आहे. फक्त यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे फक्त त्या स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांमध्येच असतं. पीसीओडी या आजारात ओव्हरीमध्ये ग्लुकोजला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ओव्हरीचं कार्य नीट होत नाही आणि मग मासिक पाळीविषयीचे अनेक त्रास सुरू होतात. 

 

लक्षणं
१. हिरोसिटीझम- शरीरावर पुरुषांप्रमाणे केस दिसून येतात. उदा. गालावर, पोटावर, हातापायांवर, हनुवटीवर, कपाळावर केस येतात. कारण टेस्टोस्टरॉन हा हार्माेन वाढू लागतो.

तुम्हीही नेहमी रेडी टू इट पदार्थ, पाकिटबंद सूप, फ्रोझन पिझ्झा खाता? तातडीने हा अभ्यास वाचा...

२. पाळीमध्ये अनियमितता असते. 

३. एलएचएफ, प्रोलॅक्टीन हार्मोन्स कमी जास्त झाल्याचे रक्त तपासणीत दिसू येतं.

४. मुडस्विंग्स खूप जास्त वाढतात.

५. मासिक पाळीत खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्त्राव होणं.

६. चेहऱ्यावर पिंपल्स, ॲक्ने येण्याचं प्रमाण वाढतं.

७. वजन खूप कमी होतं किंवा खूप जास्त वाढतं.

 

उपाय
1. इन्सुलिन रेझिस्टन्स करण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजेच प्रोसेस्ड फूड खाण्याचे प्रमाण कमी करावं.

2. शारिरीक हालचाल वाढवावी. जेणेकरून शरीरातील ग्लुकोज योग्य पद्धतीने वापरलं जाईल.

"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

4. साखर खाणं पुर्णपणे टाळा.

5. घरी केलेलं ताजं अन्न खा. ३ तासांपेक्षा जास्त वेळापासून करून ठेवलेलं अन्न खाणं टाळा. 

 

 

Web Title: What are the reasons for PCOD and PCOS? Expert's opinion about the remedies of PCOD and PCOS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.