Lokmat Sakhi >Health > Hot flashes- मेनोपॉजच्या काळात हा त्रास का होतो ? त्यावर उपाय काय ?

Hot flashes- मेनोपॉजच्या काळात हा त्रास का होतो ? त्यावर उपाय काय ?

रजोनिवृत्तीच्या काळात Hot flashes चा त्रास होतो हे माहित असतं. पण हे लक्षण छोटं नसून त्याची कारणं, लक्षणं अनेक असून त्यावर उपचारही आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:16 PM2021-04-28T17:16:51+5:302021-04-28T17:33:35+5:30

रजोनिवृत्तीच्या काळात Hot flashes चा त्रास होतो हे माहित असतं. पण हे लक्षण छोटं नसून त्याची कारणं, लक्षणं अनेक असून त्यावर उपचारही आहेत. 

What causes of hot flushes problem during menopause? Are there any solutions to this narikaa | Hot flashes- मेनोपॉजच्या काळात हा त्रास का होतो ? त्यावर उपाय काय ?

Hot flashes- मेनोपॉजच्या काळात हा त्रास का होतो ? त्यावर उपाय काय ?

HighlightsHot flashes त्रास प्रचंडच वाढल्याचं जाणवत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही हिताचं.त्रास जास्त असल्यास डॉक्टर अँटिडिप्रेसंट किंवा हार्मोनल थेरपीचा उपचार सुचवू शकतात.

Hot flashes  म्हणजे अचानकच छातीत, चेहर्‍यावर किंवा मानेच्या भागात गरम झळा आल्यासारखं वाटणं. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीच्या शरीरात होणार्‍या बदलांचं एक लक्षण म्हणजे Hot flashes.

 लक्षणं कोणती?
- शरीराचं तापमान अचानक वाढल्यामुळं शरीर लालसर होतं.
- धडधड अचानक वाढते.
- घामेघूम व्हायला होतं.
- शरीरभर झळा येऊन गेल्यानंतर अचानक थंडी वाजू लागते.

 कारणं काय?
- पुनरूत्पादनासाठी प्रेरक ठरणार्‍या हार्मोन्समध्ये घट होणं.
- शरीराचं तापमान वाढण्यातून संवेदनशीलता खूप वाढते.
- धूम्रपान हे ही एक कारण.
- स्थूलपणा वाढण्यातून हे घडतं.
- अस्वस्थता
- ताणतणाव
हॉट फ्लशेशमुळं या गुंतागुंती होऊ शकतात!
- रात्रीच्यावेळी अनुभवास येणार्‍या हॉट फ्लशेशच्या अनुभवामुळे विस्मरणाचा रोग जडतो. तो काळजी करण्याजोगा असतो.
- हृदयरोगाचा धोका वाढतो.
- हाडांमधील खनिजांमध्ये घट होऊन त्याचे विपरित परिणाम होतात.

हा त्रास टाळण्यासाठीचे उपाय
- आजूबाजूचं वातावरण थंड व उल्हासित ठेवणं.
- संतुलित व पोषक आहार घेणं.
- खूप गरम व मसालेदार अन्न, कॅफिनचं प्रमाण वाढवणारी पेयं, मादक पेयं या गोष्टी टाळाव्यात.
- मन शांत ठेवणं.
- धूम्रपान टाळणं.
- रोजच्यारोज भरपूर  व्यायाम करणं.
- बॉडी बीएमआय योग्य राखणं. आपलं वजन आपली उंची यांचं संतुलन ठेवणं.

 Hot flashesचा त्रास प्रचंडच वाढल्याचं जाणवत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही हिताचं. ते अँटिडिप्रेसंट किंवा हार्मोनल थेरपीचा उपचार सुचवू शकतात. लक्षणांप्रमाणे योग्य तो उपाय तज्ज्ञांकडून घेतला तर त्रास संपतो हे मात्र खरं.

Web Title: What causes of hot flushes problem during menopause? Are there any solutions to this narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.