Lokmat Sakhi >Health > जुलाब झाल्यास मुलांना साखर पाणी देताय? तज्ज्ञ सांगतात 'ही' चूक मुलांच्या जिवावर बेतू शकते कारण..

जुलाब झाल्यास मुलांना साखर पाणी देताय? तज्ज्ञ सांगतात 'ही' चूक मुलांच्या जिवावर बेतू शकते कारण..

What foods and drinks to have and avoid if you have diarrhea : लहानग्यांसाठी साखर पाणी ठरते घातक, आजार झाल्यास घरगुती उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2024 02:50 PM2024-09-11T14:50:43+5:302024-09-12T10:44:32+5:30

What foods and drinks to have and avoid if you have diarrhea : लहानग्यांसाठी साखर पाणी ठरते घातक, आजार झाल्यास घरगुती उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या

What foods and drinks to have and avoid if you have diarrhea | जुलाब झाल्यास मुलांना साखर पाणी देताय? तज्ज्ञ सांगतात 'ही' चूक मुलांच्या जिवावर बेतू शकते कारण..

जुलाब झाल्यास मुलांना साखर पाणी देताय? तज्ज्ञ सांगतात 'ही' चूक मुलांच्या जिवावर बेतू शकते कारण..

जुलाब लागणे हा तसा गंभीर आजार नाही (Health Tips). योग्य उपचार घेतल्यास हा आजार लवकर बराही होतो. पण मुलांना जुलाब झाल्यास ते पूर्णपणे गळून जातात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते (Diarrhea). ज्यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. अशक्तपणामुळे मुलांना ऊर्जा मिळत नाही. काही पालक मुलांना जुलाब लागल्यावर साखर पाणी देतात (Health Care). पण ही चूक मुलांच्या जिवावर बेतू शकते.

मुलांना जुलाब झाल्यास कोणती काळजी घ्यावी? शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांना साखर पाणी देणं कितपत योग्य? याची माहिती बालरोगतज्ज्ञ पवन मांडविया यांनी दिली आहे(What foods and drinks to have and avoid if you have diarrhea).

मुलाला जुलाब होत असताना साखरेचे पाणी का देऊ नये?


यासंदर्भात, माहिती देताना डॉक्टर सांगतात, 'नुकतीच एक घटना घडली, ज्यामध्ये ९ वर्षाच्या मुलीला जुलाब सुरू झाले होते. मुलीच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ नये म्हणून, पालकांनी तिला रात्रभर साखर पाणी दिलं. रात्रभर साखर पाणी दिल्यामुळे, मुलीच्या शरीरातील साखरेची पातळी ५००च्या पुढे गेली होती. आणि यामुळे मुलगी कोमात गेली.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

शरीरात अचानक साखरेची पातळी वाढल्याने डायबेटिक कीटोॲसिडॉसिस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मुलांना साखरेच पाणी देण्याऐवजी ओआरएस द्या. जर मूल ओआरएस पाणी पीत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण मुलांना घरी बनवलेले साखरेचे पाणी किंवा लिंबूपाणी पिऊ देऊ नका.'

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

जुलाब झाल्यास काय खावे काय खाऊ नये?

- जुलाब झाल्यास पचायला हलके पदार्थ खावे. ऋतूमानानुसार येणाऱ्या भाज्या आपण खाऊ शकता.

- जर जुलाबमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी झाली असेल तर, दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. यामुळे पचन आणखीन खराब होऊ शकते. तसेच अशावेळी जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. 

Web Title: What foods and drinks to have and avoid if you have diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.