Lokmat Sakhi >Health > १ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं..

१ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं..

What Happen when You Stop Eating Onion for a Month : कांद्यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचन चांगले राहते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 05:17 PM2024-05-19T17:17:53+5:302024-05-20T17:08:21+5:30

What Happen when You Stop Eating Onion for a Month : कांद्यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचन चांगले राहते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो.

What Happen when You Stop Eating Onion for a Month : Health Tips Raw Onion Health Benefits In Summer | १ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं..

१ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं..

भारतीय जेवणाच्या थाळीत कांदा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे. कांदा खाल्ल्याशिवाय  अनेकांना   जेवल्यासारखं  वाटत नाही. कांदा खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. (Health Tips) कांदा प्रत्येक घरात उपलब्ध होणारी भाजी आहे. भाजी, सॅलेड, पराठे या पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाते. काहीजण अजिबात  कांदा खात नाहीत, कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल दिसतात ते समजून घेऊ. (Health Tips Raw Onion Health Benefits In Summer)

कांदा अनेक प्रकारच्या व्हिटामीन्सचा खजिना आहे. यातील एंटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व शरीराला हेल्दी  ठेवण्यासाठी तसंच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कांद्यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचन चांगले राहते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. यात व्हिटामीन बी ६ आणि फॉलेट असते, शरीर इम्यून पॉवर वाढते. कांदयात एलिल प्रोफाईल डायसल्फाइड नामक एंटीऑक्सिडेंट्स  असतात ज्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होतो.  

३० दिवस कांदा न खाल्ल्यास काय होते

जर तुम्ही  ३० दिवस कांदा खाल्ला नाही तर याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. कांद्यातील फायबर्स पोट साफ ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. कांद्याचे अनेक दिवस न केल्यास इम्यूनिटी कमकुवत होते.  याशिवाय इन्फ्लेमेटरी पॉवरही कमी होते. कांद्यात सूज विरोधी गुण असतात. शरीरात सूजही येऊ शकते.  याचे सेवन न केल्यास ऑक्सिडेटिव्ह ताण येतो. 

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते ऊन्हाळ्यात अनेकांना आजारांचा धोका उद्भवतो. कच्चा कांदा खाल्ल्याने तापमान वाढत आणि आरोग्यही चांगले राहते. कांद्यात सूजविरोधी गुण असतात ज्यामुळे शरीराला सूज येऊ शकते. ज्यामुळे हिट स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवत नाहीत.  गरमीच्या दिवसांत आहारात कांद्याचा समावेश केल्यास शरीराला गारवा मिळतो आणि शरीर पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते.

कांद्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यात सेलेनियम असते. ज्यामुळे इम्यूनिटी बुस्ट होते आणि आजारही दूर होतात.  गरमीच्या दिवसांत कांदा खाल्ल्याने  अनेक आजारांपासून बचाव होतो.  जर कच्चा कांदा आणि लिंबू एकत्र सॅलेडमध्ये खाल्ले तर पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाचे त्रास उद्बवत नाहीत.

Web Title: What Happen when You Stop Eating Onion for a Month : Health Tips Raw Onion Health Benefits In Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.