खजूर (Khajur) हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे (Dates). जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं (Khajoor for Weight loss). यामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात (Health Benefits). त्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. साखरेऐवजी आपण खजूर खाऊ शकता. पण खजूर खाण्याचीही योग्य पद्धत आणि प्रमाण माहित असायला हवं. जेणेकरून त्यातील गुणधर्म शरीराला पुरेपूर मिळतील.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, खजूराचे गुणधर्म उष्ण असतात. असं म्हणतात. परंतु, खजूर अतिशय थंड असते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास, मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या, अथवा खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं असेल, त्यांनी खजूर खावे. शिवाय हाडं बळकट होण्यासाठीही आपण खजूर खाऊ शकता.' पण खजूर खाण्याचीही योग्य पद्धत माहित असायला हवी(What is the Best Time to Eat Dates or Khajoor for Weight Loss).
खजूर खाण्याची योग्य पद्धत
- खजूर खाण्यापूर्वी चांगले धुवून घ्यावे. पण खजूर कोणत्याही वेळी खाऊ नये. खजूरमधील पौष्टीक घटक शरीराला मिळावे म्हणून, सकाळी खावे.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
- सकळी ब्रेकफास्टमध्ये खजूर खाणं फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. आपण गरम दुधातही खजूर घालून खाऊ शकता.
- खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. १०० ग्रॅम खजूर खाऊन २७७ कॅलरीज मिळतात. ज्यामुळे जलद वजनही वाढत नाही. आपण खजूर भिजवूनही खाऊ शकता.
दिवसभरात किती खजूर खावे?
दररोज ३ ते ४ खजूर खाणे आरोग्यदायी मानले जाते. तुमची एनर्जी लेव्हल वाढवण्यासोबतच तुमची पचनशक्तीही मजबूत करते.
खजूर कोणी खाऊ नये?
- ज्यांना पचनाचा त्रास आहे, त्यांनी खजूर खाऊ नये. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. पण पचन प्रक्रियेला खूप वेळ लागतो. त्यामुळे जर आपल्याला पचनक्रियेचा त्रास असेल तर, खजूर खाणं टाळा.
- जर आपल्याला एलर्जी असेल किंवा लूज मोशन होत असेल तर, खजूर खाणं टाळा. कारण त्यामध्ये सॉर्बिटॉल नावाचे साखरेचे अल्कोहोल असते, ज्यामुळे अस्वस्थता वाढते आणि आतड्यांसंबंधी हालचाल अधिक होते.