तोंड आणि दातांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असते. दररोज ब्रश करुन आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण दातांची काळजी घेतो. दातांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर दातांवर पिवळे थर जमून तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्या सुजणे, दातदुखी अशा अनेक समस्या फार मोठ्या प्रमाणांत दिसून येतात. पिवळ्या दातांची समस्या असो किंवा तोंडाला दुर्गंधी येणे असो यासाठी प्राचीन आयुर्वेदिक उपाय असणारे 'ऑईल पुलिंग' अत्यंत उपयोगी ठरते. 'ऑईल पुलिंग' करण्याने दात आणि तोंडाच्या अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. दात घासल्यानंतर तोंडात नारळाचे तेल घेऊन गुळणी केली जाते. यालाच आजच्या माॅर्डन भाषेत 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling) असंही म्हणतात(How do you properly do oil pulling).
सध्या 'ऑइल पुलिंग' ही संकल्पना फारच चर्चेत असल्याचे दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीज देखील या 'ऑइल पुलिंग' (How to Do Oil Pulling) चा आपल्या डेली रुटीनमध्ये समावेश करताना दिसतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, तोंडाचे आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी देखील 'ऑइल पुलिंग' केल्याने अनेक फायदे होतात. तेलाच्या गुळणीचे फायदे मिळवण्यासाठी तेलाची गुळणी कशी करावी? काय काळजी घ्यावी हे समजून घेणं आवश्यक आहे. अनेक सेलिब्रिटींची योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने 'ऑइल पुलिंग' म्हणजे काय ? ते नेमकं कसं करावं याची सोपी पद्धत सांगितली आहे(How do you do oil pulling at home).
'ऑइल पुलिंग' करण्याची नेमकी पद्धत कोणती ?
स्टेप १ : 'ऑइल पुलिंग' करण्याआधी आपले दात ब्रश व टूथपेस्टने घासून स्वच्छ करुन घ्यावेत.
स्टेप २ : दात घासून स्वच्छ केल्यानंतर टंग क्लिनरने आपली जीभ स्वच्छ करुन घ्यावी.
स्टेप ३ : आता संपूर्ण तोंडाची स्वच्छता झाल्यानंतर एका चमच्यात होममेड किंवा नैसर्गिक खोबरेल तेल घ्यावे.
पोटभर खा गूळ मखाणे! ऐन थंडीत कडकडून भूक लागली की खा हा मस्त पदार्थ-पाहा सोपी रेसिपी...
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...
स्टेप ४ : खोबरेल तेल तोंडात घेतल्यांनंतर ते तसेच तोंडात धरुन ठेवा. खोबरेल तेल तोंडात असतानाच आपण हे तेल तोंडातून उजवीकडून डावीकडे अशाप्रकारे संपूर्ण गोलाकार फिरवू शकतो. या तेलाने आपले संपूर्ण तोंड स्वच्छ होईल अशाप्रकारे हे तेल संपूर्ण तोंडात फिरवून घ्यावे. ज्यामुळे तोंडातील घाण आणि जीवजंतू त्या तेलाला चिकटतील. असे किमान १० ते १५ मिनिटे करत राहावे.
स्टेप ५ : त्यानंतर हे तेल बेसिनमध्ये थुंकू नये. यामुळे आपले बेसिन खराब होऊन त्यावर चिकट, तेलकट डाग पडण्याची शक्यता असते. यामुळे तेलाची गुळणी केलेले हे तेल एका छोट्या भांड्यात काढून मग योग्य ठिकाणी फेकून द्यावे. जेणेकरुन आपले बेसिन खराब होऊन ब्लॉक होणार नाही.
'ऑइल पुलिंग' केल्याने होणारे फायदे :-
नारळाच्या तेलामध्ये अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात ते तेलावाटे तुमच्या तोंडामध्ये जातात. 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling) मुळे तुमच्या तोंडाची संपूर्ण स्वच्छता राखली जाते. शिवाय तोंडाचा आतील भाग निरोगीदेखील होतो. 'ऑइल पुलिंग'मुळे तोंडामधील जीवजंतू तेलावाटे बाहेर टाकले जातात. शिवाय यामुळे दात किडणे, तोंडाला दुर्गंध येणे, हिरड्यांचे विकार कमी करण्यास मदत होते. दात आणि हिरड्या मजबूत आणि स्वच्छ होतात. तोंडातून चांगला सुंगध येतो. तोंडाच्या आरोग्याचा तुमच्या पचनसंस्थेशी संबध येत असल्यामुळे हा उपाय करून तुम्ही तुमच्या अपचनाच्या समस्या कमी करू शकता. ज्यामुळे शरीर शुद्ध आणि डिटॉक्स होण्यास मदत होते. जीभ, तोंड, दात यांचा संबंध तुमचे पोट, पचनक्रिया आणि संपूर्ण शरीरावर होत असल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. वजन कमी करायचे असल्यास हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण पचनक्रिया सुधारल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. 'ऑइल पुलिंग' केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन आनंदी आणि उत्साहित राहण्यास मदत होते. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर नक्कीच होतो.