Lokmat Sakhi >Health > महिनाभर चहा सोडल्याने काय होते? वेट लॉस ते शांत झोप; चहा सोडून तर पाहा - मिळतील ४ फायदे

महिनाभर चहा सोडल्याने काय होते? वेट लॉस ते शांत झोप; चहा सोडून तर पाहा - मिळतील ४ फायदे

What Will Happen If You Quit Tea Completely For A Month : 'आजपासून चहा बंद' असं स्वतःला बोलून तल्लफवर कण्ट्रोल ठेवा; दिसतील आरोग्यदायी फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 05:10 PM2024-04-12T17:10:08+5:302024-04-12T17:10:53+5:30

What Will Happen If You Quit Tea Completely For A Month : 'आजपासून चहा बंद' असं स्वतःला बोलून तल्लफवर कण्ट्रोल ठेवा; दिसतील आरोग्यदायी फरक

What Will Happen If You Quit Tea Completely For A Month | महिनाभर चहा सोडल्याने काय होते? वेट लॉस ते शांत झोप; चहा सोडून तर पाहा - मिळतील ४ फायदे

महिनाभर चहा सोडल्याने काय होते? वेट लॉस ते शांत झोप; चहा सोडून तर पाहा - मिळतील ४ फायदे

भारतीयांसाठी चहा म्हणजे स्वर्गसुख (Quit Tea for Month). हिवाळा असो किंवा उन्हाळा घोटभर चहाशिवाय तल्लफ मिटत नाही (Tea). बघयला गेलं तर हे एक प्रकारचं व्यसनच. पण नियमित चहा पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत (Health Tips). काही जण तर चहाच्या व्यसनापासून सुटका करून घेण्यासाठी महिनाभर चहा न पिण्याचा संकल्पही करतात.

पण काहींची चहा सुटते, तर काहींना इच्छा असूनही, चहा सोडवत नाही. पण महिनाभर चहा सोडल्याने शरीरात अनेक सकारात्मक परिणाम घडतात. पण महिनाभर चहा सोडण्याचे फायदे किती? चहा सोडल्याने शरीरात कोणते बदल घडतात? पाहूयात(What Will Happen If You Quit Tea Completely For A Month).

महिनाभर चहा सोडल्याने कोणते बदल घडतात?

द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'चहा आणि कॉफी प्यायल्याने शरीरातील थकवा काही मिनिटांसाठी दूर होऊ शकतो. परंतु याच चहामुळे रक्तदाबही वाढू शकते . त्यामुळे ती चांगली सवय मानली जात नाही. चहामध्ये कॅफिन असते. शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे जर आपल्याला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचं असेल तर, महिनाभर चहा सोडून पाहा.

केसांची वाढ खुंटली? टक्कल पडण्याची भीती वाटते? कांद्याचा करा २ प्रकारे वापर-केस भरभर वाढतील

साखरेची पातळी नियंत्रणात राहील

जर आपण महिनाभरासाठी साखर सोडून पाहिली तर, रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. काही लोकांना साखरयुक्त चहा लागतो. नियमित याच्या सेवनाने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. त्याच वेळी, कॅफिन रक्तातील साखरेची पातळी आणि त्याच्याशी संबंधित समस्या देखील वाढवते. त्यामुळे महिनाभरासाठी चहा सोडून पाहिलं तर, नक्कीच फरक दिसेल.

शांत झोप लागेल

महिनाभर चहा सोडल्याने झोपेची समस्या सुटते. चहामध्ये कॅफिन असते, जे मेंदू सक्रीय ठेवते. ज्यामुळे कितीही प्रयत्न केल्यास झोप येत नाही. त्यामुळे कॅफिनयुक्त पेय टाळा.

पोट डब्ब होतं-गॅस पास होत नाही? घरातल्या २ साध्या गोष्टी खा; ॲसिडिटीही होईल कमी

वेट लॉससाठी मदत

महिनाभरासाठी चहा सोडल्याने वजन नियंत्रणात येऊ शकते. चहामध्ये बरेच जण साखरेचा वापर करतात. साखरयुक्त चहा प्यायल्याने वजन वाढू शकते. शिवाय चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो, आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे चहा सोडा आणि वेट लॉस करा.

Web Title: What Will Happen If You Quit Tea Completely For A Month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.