Lokmat Sakhi >Health > चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

Why chai - chapati is the worst food combination : चहा चपाती खाणं योग्य की अयोग्य? शरीराला कोणता त्रास होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 04:05 PM2024-10-07T16:05:43+5:302024-10-07T18:03:11+5:30

Why chai - chapati is the worst food combination : चहा चपाती खाणं योग्य की अयोग्य? शरीराला कोणता त्रास होतो?

Why chai - chapati is the worst food combination | चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

चहा चपाती हा भारतीयांचा आवडीचा नाश्ता (Breakfast). नाश्त्याला पोहे - उपमा नसेल तर, बहुतांश लोक चहा चपाती (Chai Chapati) खाण्यास पसंती देतात. पण चहासोबत चपाती खाणं कितपत योग्य? (Health Tips) यामुळे आरोग्याचे बरेच नुकसानही होते. चहामध्ये साखर आणि कॅफिन असते. जे जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, पोषक तत्वांची कमतरता, यासह झोपेवरही परिणाम होऊ शकतो. जर आपण नियमित चहासोबत चपाती खात असाल तर, पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

संशोधनानुसार चहामध्ये असलेले फिनोलिक केमिकल्स पोटात आयर्न-कॉम्प्लेक्स तयार करण्यास उत्तेजन देतात, ज्यामुळे शरीरात लोहाचे शोषण होण्यास अडथळा येतो. त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे(Why chai - chapati is the worst food combination).

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

आपण रोज चहासोबत रोटी खाऊ शकतो का? यावर उत्तर देताना, आहारतज्ज्ञ दिव्या गांधी म्हणतात, चहासोबत चपाती खाल्ल्याने सकरात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम घडतात. चहा घ्यावा की नाही हे सर्वस्व आपल्या हेल्थवर अवलंबून आहे. चपाती खाण्याचेही अनेक फायदे आहेत. आपण शक्यतो चपाती भाजी खातो. पण चहा चपातीचे सेवन कमी प्रमाणात करावे.'

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम

पोषक तत्वांनी समृद्ध

चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात.

हायड्रेशन

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.

चहासोबत चपाती खाण्याचे नकारात्मक परिणाम

कॅलरीजचे प्रमाण जास्त

चहातील साखर आणि चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. खरंतर काही लोकांना खूप गोड चहा पिण्याची सवय असते. त्यात कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे चहा- चपाती एकत्र खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकते.

पोषक तत्वांची कमतरता

चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरात इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. आपण चहासोबत चपाती नसून, इतर पदार्थ खाऊ शकता. किंवा चपातीसोबत पौष्टीक भाज्या खाऊ शकता.

झोपेवर परिणाम

जर दररोज आपल्याला चहा चपाती खाण्याचे सवय असेल तर, याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. चहामध्ये भरपूर कॅफिन असते, साखरेचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रोज चहा आणि चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

प्रोटीन शोषून घेण्यास अडचण

चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी ३८% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो. त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे. 

Web Title: Why chai - chapati is the worst food combination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.