Lokmat Sakhi >Health > गरोदरपणात स्तन दुखतात, जड भासतात हा आजार आहे की बदल?

गरोदरपणात स्तन दुखतात, जड भासतात हा आजार आहे की बदल?

बाळाच्या जन्माची चाहूल लागल्यापासून ते बाळाचं आगमन होईपर्यंत स्त्रीशरीरावरील स्तनांमध्ये बरेच बदल होतात. बाळाला दूध पाजता येण्यासाठी स्तन सक्षम व्हावेत यादृष्टीनं हे बदल असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 01:58 PM2021-05-07T13:58:05+5:302021-05-07T14:47:22+5:30

बाळाच्या जन्माची चाहूल लागल्यापासून ते बाळाचं आगमन होईपर्यंत स्त्रीशरीरावरील स्तनांमध्ये बरेच बदल होतात. बाळाला दूध पाजता येण्यासाठी स्तन सक्षम व्हावेत यादृष्टीनं हे बदल असतात.

Why do breasts become sore delicate and sensitive during pregnancy Is it a disease or a change narikaa | गरोदरपणात स्तन दुखतात, जड भासतात हा आजार आहे की बदल?

गरोदरपणात स्तन दुखतात, जड भासतात हा आजार आहे की बदल?

Highlightsस्तनांचं काम बाळासाठी जन्मानंतर दूध पुरवण्याचं असतं. त्यासाठी होऊ घातलेल्या बदलांची सुरूवात स्तन दुखरे होण्यापासून होते. पहिल्या तीन महिन्यात स्तन नाजूक होतात, सूज जाणवते. स्तनाग्राजवळ झिणझिण होते आणि तिथं पूर्वी कधी नव्हता असा चिकटपणा जाणवतो.अठ्ठाविसाव्या आठवड्यापासून बाळाच्या जन्मापर्यंतचा काळ हा स्तनपानासाठी स्तन तयार होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. 

दुखरे, हुळहुळे होऊन बसलेले, आकार बदललेले स्तन हे गर्भारपणाचं नेहमीचं लक्षण. गर्भधारणा झाल्यापासून पुढे पुढे त्यांचं नेहमीचं असणं पार बदलून जातं. मुळात शरीर नव्या जन्मासाठी तयार होत असतं. स्तनांचं काम बाळासाठी जन्मानंतर दूध पुरवण्याचं असतं. त्यासाठी होऊ घातलेल्या बदलांची सुरूवात स्तन दुखरे होण्यापासून होते.

 

गरोदरपण येऊ घातलंय हे कळतं कसं?

पाळी लांबते, मळमळ आणि उलटीची भावना होते, सकाळी उठल्यावर बेचैनी जाणवते, स्तन नाजूक होतात आणि दुखतात, त्यांना स्पर्श सहन होत नाही, ते जड वाटायला लागतात. स्तनाग्रांमध्ये झिणझिण जाणवते.

 

पहिल्या तीन महिन्यात काय घडतं?

स्तन नाजूक होतात, सूज जाणवते. स्तनाग्राजवळ झिणझिण होते आणि तिथं पूर्वी कधी नव्हता असा चिकटपणा जाणवतो.

दुसर्‍या तिमाहीत (13 ते 27 आठवड्यांदरम्यानचा काळ) काय घडतं?

पहिल्या तिमाहीपेक्षा स्तनांचा आकार वाढतो, त्यामुळे बरेचदा तो जडपणा जाणवत राहातो.

आधी जाणवणारा तीव्रपणा व झणझण जाते आणि सुजलेल्या स्तनांवरच्या नसा ठळक व्हायला लागतात.

स्तनाग्रं आणि त्याबाजूच्या वर्तुळाचा रंग गडद होतो. तो आकार वाढतो. या वाढलेल्या घेरात बारीक बारीक फोडांसारखे उठाव दिसायला लागतात.

काही स्त्रियांना आकार वाढलेल्या स्तनांवर स्ट्रेच मार्क्सही जाणवतात.

 

कोलोस्ट्रम

कोलोस्ट्रम म्हणजे प्रि मिल्क डिसचार्ज. बाळाला दूध देता येण्यापूर्वीचा दाटसर चिक म्हणू शकतो. स्तन ग्रंथींमधून पाझरणारा हा स्राव अँटिबॉडीजनी समृध्द असतो. या अँटिबॉडिज म्हणजे घातक अणूजीव नष्ट करणारं रक्तातलं महत्त्वाचं द्रव्य. हा स्राव दाट पिवळसर रंगाचा असतो. बाळाला दूध देण्यासाठी तुमचे स्तन तयार असल्याची ती निशाणी आहे. बाळ गर्भातून या जगात आल्या आल्या  आयुष्याच्या पहिल्या टप्प्यांमधून जाताना त्याचं आरोग्य चांगलं राहावं, आजार होऊ नयेत म्हणून हा स्राव त्याला मदत करतो. एकप्रकारे तो बाळाच्या पहिल्या जन्मचक्राचा रक्षकच असतो. 

 

तिसरी तिमाही

अठ्ठाविसाव्या आठवड्यापासून बाळाच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे हा शेवटचा तिसरा टप्पा. या काळात स्तनभार खूप वाढलेला असतो. स्तनपानासाठी स्तन तयार होण्याचा हा काळ खूप महत्त्वाचा.

स्तनात होणार्‍या बदलांच्याअस्वस्थतेला कसं सामोरं जावं? 

झोपताना ब्रा घालणं शक्यतो टाळावं. काही कारणांमुळे तसं शक्य नसेल तर स्लीप ब्रा वापरावी. ती नरम आणि हलकी असल्यानं त्रास होत नाही. सौम्य साबण वापरून कोमट पाण्यानं स्तन स्वच्छ करावेत. कोरडेपणामुळं येणारी खाज त्यातून टाळता येते.

एकूण बाळाच्या जन्माची चाहूल लागल्यापासून ते बाळाचं आगमन होईपर्यंत स्त्रीशरीरावरील स्तनांमध्ये बरेच बदल होतात. बाळाला दूध पाजता येण्यासाठी स्तन सक्षम व्हावेत यादृष्टीनं हे बदल असतात.

Web Title: Why do breasts become sore delicate and sensitive during pregnancy Is it a disease or a change narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.