Lokmat Sakhi >Health > काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक!

काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक!

आयुर्वेदानुसार केल्या जाणाऱ्या चिकित्सा, कर्म, विविध प्रकारच्या बस्ती पीसीओडी ते अनपत्यतेची कारणं यावर लाभदायक उपचार ठरतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:39 PM2021-07-15T17:39:00+5:302021-07-15T17:48:46+5:30

आयुर्वेदानुसार केल्या जाणाऱ्या चिकित्सा, कर्म, विविध प्रकारच्या बस्ती पीसीओडी ते अनपत्यतेची कारणं यावर लाभदायक उपचार ठरतात.

wrong-bad habits also causes infertility. Ayurveda treatment, panchkarma and therapy | काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक!

काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक!

Highlightsमानसिक तणाव ही गोष्ट अशी आहे की जी अनपत्यतेला कारणीभूत ठरू शकते किंवा अनपत्यता आहे.

वैद्य विनीता बेंडाळे

अनपत्यतेची चिकित्सा आयुर्वेदानुसार करत असताना पोटातून घेण्याची औषधे म्हणजे अभ्यंतर चिकित्सा, पंचकर्म आणि योनि धावन, योनि पिचू, उत्तरबस्ति, शिरो धारा या सारख्या इतर चिकित्सा, योग्य आहाराचे नियोजन, व्यायाम, प्राणायाम, तसेच झोपेच्या वेळा, झोपेची प्रत अशा जीवनशैलीमधील गोष्टींचा विचार आणि अंतर्भाव करून व्यक्तिनिष्ठपद्धतीने चिकित्सेची योजना करणे आवश्यक असते. आणि हो, या बरोबरच तितकीच महत्वाची गोष्टी म्हणजे काही विशिष्ट सवयी, ज्यामुळे शारीरीक किंवा मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होऊ शकतात त्या टाळण्यासाठी आवर्जून सल्ला देणे आवश्यक असते. माहिती नसल्यामुळे, वेळे अभावी, किंवा इतर काही कारणामुळे चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या जातात असं अनेकदा अनुभवास येत असतं. उदाहरणार्थ, खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात व्यायाम करणे, दिवसभरात वेळ न झाल्याने रात्री जेवणानंतर चालायला जाणे (शतपावली नाही, तर व्यायाम म्हणून), तहान नसताना दिवसभर आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पीत राहणे, नियमितपणे मिल्कशेक्स घेणे, गरम चहा आणि गार/ साधे पाणी एकत्र पिणे अशा स्वरुपाच्या अनेक गोष्टी व्यक्तिनिष्ठ पद्धतीने केस टेकिंग घेताना दवाखान्यामधे नोंद होत असतात. चिकित्सा नियोजन करताना या संदर्भातील मार्गदर्शन हा चिकित्सेतील एक फार महत्त्वाचा घटक असतो. पुढील उदाहरणावरून या गोष्टीचं महत्व समजून घ्यायला मदत होईल.

 

पाळी सुरु असताना सतत जंक फूड घेणे, चॅाकलेट्स, चिप्स, पनीर अशा स्वरूपाचा आहार घेणे, शारीरीक, मानसिक स्तरावर अधिक तणाव असणे याचा परिणाम हा पुढे होणाऱ्या बीजनिर्मितीच्या प्रक्रियेवर, बीजाच्या प्रतीवरही होऊ शकतो. त्यामुळे चिकित्सेमधील इतर गोष्टींबरोबर, जीवनशैलीमधील अशा स्वरूपाच्या गोष्टींमधे बदल करणे आवश्यक असेल त्या विषयी योग्य सल्ला देणे फार महत्त्वाचे असते.
स्त्री आणि पुरुष बीज निर्मितीची प्रक्रिया योग्य नसणे, दोन्ही बीजांची प्रत सुधारणे, गर्भशय्याची प्रत (Endometrium), योनी प्रदेश, गर्भाशय मुख (Cervix), गर्भाशय, येथिल संसर्ग दोष (infections), Thyroid ग्रंथीच्या कार्यातील बिघाड, Diabetes, स्थौल्य (Obesity) किंवा इतर संबंधित कारणांनुसार औषधे तर दिली जातातच. याव्यतिरिक्त आयुर्वेदामधील विविध कर्मांचा (therapies) विशेष उपयोग होताना दिसून येतो.
१. PCOD मुळे किंवा इतर काही कारणांमुळे स्त्रीबीजनिर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित होत नसताना 'बस्ति' या उपक्रमाचा विशेष उपयोग होतो. Follicles चा आकार वाढणे, Follicle rupture होणे, Endometrium ची वाढ होणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बास्ति प्रक्रियांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.
२. ‘उत्तर बास्ति’ या प्रक्रियेचे महत्व आयुर्वेदामधे अनन्यसाधारण आहे. Endometrium ची प्रत सुधारणे,स्त्री बीजनिर्मितीची प्रक्रिया सुधारणे, गर्भाशय आणि संबंधित प्रदेशातील वातावरण गर्भधारणा होण्यासाठी तसेच पुढील गर्भाच्या वाढीच्या दृष्टीने अनुकूल होण्यासाठी, गर्भाशय नलिकेतील अडथळे दूर करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उत्तर बस्तीची विचारपूर्वक योजना केली असतां योग्य परिणाम होऊ शकतो.
३. योनि प्रदेश, गर्भाशय मुख या प्रदेशांमधे काही संसर्गदोष (infections) असल्यास 'योनि धावन' करणे प्रभावी ठरते. खूप काळापासून (chronic) असणाऱ्या, तसेच वारंवार उद्भवणाऱ्या संसर्ग दोषांवरही याचा उत्तम परिणाम होताना दिसतो.
४.योनि पिचू (Medicated Vaginal tampons) याचाही प्रभावी उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी करता येतो. 'Vaginismus’ ही अशी बाब आहे, की ज्यामधे शारीरीक संबंध येताना योनिप्रदेशातील स्नायुंचा Involuntary संकोच होतो. त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही किंवा खूप वेदनायुक्त होऊ शकते. यासाठी ‘योनि पिचू' चा उत्तम वापर करता येतो. योनि प्रदेशातील स्त्राव अधिक अम्ल (acidic) असणे, तेथिल संसर्गदोष (infections) यासाठीही योनि पिचुची योजना उपयुक्त ठरते. Endometrium ची प्रत योग्य नसल्यामुळे वारंवार गर्भपात होत असेल, तर त्यासाठी योनि पिचू, उत्तरबस्ति, बस्ती यांची उपयुक्तता प्रत्ययास येते.

 

६. गर्भाशय नलिकांमधे अडथळा (Tubal blockage) असताना गर्भाशय नलिकेमधील कोणत्या प्रदेशात आणि किती प्रमाणात अडथळा आहे, त्याचे कारण काय आहे यांचा विचार करून विरेचन, बस्ति, उत्तर बास्ति यांचा योग्य वापर चिकित्सा योजनेमधे केल्यास गर्भाशय नलिकेतील अडथळा दूर व्हायला मदत होऊ शकते.
७. स्थौल्य (Obesity), Thyroid ग्रंथीच्या कार्यातील बिघाड, Diabetes या सारख्या आजारांमधे वमन, विरेचन, बस्ती यांची योजना उपयुक्त ठरू शकते.
८. ‘नस्य’ या पंचकर्मातील कर्माचा (Therapy) उपयोग Hypothalamus - Pitutary - Ovarian axis (HPO Axis) चे कार्य सुधारून Hormones मधे संतुलन निर्माण करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे रुग्णांमधील योजनेवरून आणि काही संशोधनांवरून दिसून येते.
९. मानसिक तणाव ही गोष्ट अशी आहे की जी अनपत्यतेला कारणीभूत ठरू शकते किंवा अनपत्यता आहे, या गोष्टीमुळे मानसिक ताण अगदी अतिरिक्त प्रमाणातही निर्माण होऊ शकतो. मनाचे स्वास्थ्य या गोष्टीचा अंतर्भाव हा आयुर्वेदाने गर्भधारणेसाठी आवश्यक गोष्टींमधे केला आहे, त्याचं महत्व अधोरेखित केलं आहे. 'मानसिक स्वास्थ्य' ही गोष्ट एकंदरित सध्या किती दुर्मिळ झाली आहे हे सर्व ज्ञात आहेच.
१०. 'शिरो धारा' ही प्रक्रिया मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतेच, त्या व्यतिरिक्त हॉर्मोन्स मधील संतुलन साधण्यासाठीही त्याचा उपयोग होताना दिसतो.
आयुर्वेदामधे वर उल्लेख केलेल्या कर्मांव्यतिरिक्तही कर्मे (Therapies) आहेत. औषधांचा तर जणू खजिनाच आहे. व्यक्तिनिष्ठ पद्धतीने योग्य निदान आणि चिकित्सा योजना या आयुर्वेदाच्या मूल तंत्राचा अवलंब अपत्यप्राप्तीसाठी विशेष उपयुक्त ठरू शकतो.

(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे)
०२० २५४६५८८६,
www.dyumnawomensclinic.com

                                         

Web Title: wrong-bad habits also causes infertility. Ayurveda treatment, panchkarma and therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.