Lokmat Sakhi >Health > मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडला की दुखते मान- पाठ- कंबर, पाहा 'ही' आहे मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत!

मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडला की दुखते मान- पाठ- कंबर, पाहा 'ही' आहे मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत!

Wrong Ways of Holding or Watching Mobile : You're holding your phone wrong way : Better ways to hold your phone so you don't hurt yourself : अशा पद्धतीने मोबाईल पकडण्याची सवय तुम्हालाही आहे का ? अशी सवय असेल तर लगेच सोडून द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 02:44 PM2024-10-31T14:44:43+5:302024-10-31T19:02:24+5:30

Wrong Ways of Holding or Watching Mobile : You're holding your phone wrong way : Better ways to hold your phone so you don't hurt yourself : अशा पद्धतीने मोबाईल पकडण्याची सवय तुम्हालाही आहे का ? अशी सवय असेल तर लगेच सोडून द्या..

Wrong Ways of Holding or Watching Mobile You're holding your phone wrong way Better ways to hold your phone so you don't hurt yourself | मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडला की दुखते मान- पाठ- कंबर, पाहा 'ही' आहे मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत!

मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडला की दुखते मान- पाठ- कंबर, पाहा 'ही' आहे मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत!

आजकाल मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्या हातातच असतो. मोबाईलच्या सतत वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे.( Better ways to hold your phone so you don't hurt yourself).

मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा बॉडी पोश्चरकडे फारसे लक्ष देत नाही. यामुळे मान- पाठ- कंबर सगळंच आखडून जातं. कोणी पाठीवर झोपून हात वर करून मोबाईल बघतात. यामुळे हात दुखू लागतात, बोटंही आखडून जातात. यासाठीच मोबाईल बघण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती हे आपल्याला माहित असले पाहिजे. त्यामुळे तुम्हालाही मोबाईल खाली दिलेल्या चुकीच्या पद्धतीने पकडण्याची सवय असेल, तर ती लगेच सोडा. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास आपल्याला मान - पाठ आणि कंबरेच्या अनेक समस्या डोकं वर काढून वारंवार त्रास देऊ शकतात(Wrong Ways of Holding or Watching Mobile).

मोबाईल पकडण्याच्या चुकीच्या पद्धती नेमक्या कोणत्या ?

१. बेडवर पाठ टेकवून झोपायचे आणि दोन्ही हात वर करून हातात मोबाईल पकडायचा, अशी सवय अनेकांना असते. ही सवय अतिशय चुकीची आहे. कारण यामुळे खांद्यावर आणि मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो. वारंवार अशा पद्धतीने मोबाईल पकडून बघाल तर मानदुखी आणि खांदेदुखी मागे लागेल.

२. या दुसऱ्या पद्धतीमध्ये अनेक जण एका अंगावर झोपतात. एक हात कोपऱ्यात वाकवून तळहात डोक्याखाली ठेवतात आणि मग दुसऱ्या हाताने मोबाईल बघतात. ही सवयही खांदेदुखी आणि मानदुखी मागे लावणारी आहे. कारण अशा पद्धतीने मोबाईल बघताना जो हात डोक्याखाली ठेवला जातो तो आपण विरुद्ध दिशेने वळवलेला असतो. त्यामुळे खांद्याच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो, मानेचे स्नायूही ताणले जातात. 

३. या तिसऱ्या पद्धतीमध्ये पोटावर झोपतात. छातखाली उशी ठेवलेली असते. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवले जातात आणि मोबाईल पकडला जातो. यामुळे खांदे, हाताचे काेपरे यावर तर ताण येतोच. पण पाठीचा कणा आणि कंबर इथले स्नायूही ताणले जातात. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास मणक्यात किंवा कंबरेत गॅपही येऊ शकतो. अशा पद्धतीने मोबाईल बघण्याची किंवा पकडण्याची सवय बहुतांश तरुण मुला- मुलींमध्ये बघायला मिळते. 

मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

मग मोबाईल पकडण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ? 

डेली मेल यांनी केलेल्या रिसर्चनुसार, मोबाईल बघताना शक्यतो आपण मोबाईल हातात धरून आपली मान हलकेच पुढच्या दिशेने झुकवून खाली मान करून मोबाईल पाहतो, परंतु ही अतिशय चुकीची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल फोन वापरत असाल तर सर्वप्रथम तुमची मान पुढे झुकणार नाही याची काळजी घ्या. फोन बघताना आपली मान नेहमी नैसर्गिक स्थितीतच ठेवा. जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्या मानेवर अतिरिक्त दबाव पडणार नाही अशा प्रकारे तो तुमच्यासमोर ठेवा. याचबरोबर, मोबाईल बघताना पोटावर म्हणजेच पालथ झोपा. पाय गुडघ्यात वाकवून वर उचला आणि हाताचे कोपरे जमिनीला टेकवत, दोन्ही हातात मोबाईल धरून तो पाहा. यालाच garden pose किंवा sphinx pose असंही म्हणतात. ज्यांना तीव्र पाठदुखी आहे, ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी या अवस्थेत बसू नये. या पोझमध्ये बसताना खांदे सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: Wrong Ways of Holding or Watching Mobile You're holding your phone wrong way Better ways to hold your phone so you don't hurt yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.